लहान मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज लहान मुलांना खायला द्या हे पदार्थ …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो लहान मुलांचे पालन करणे हा एक खूप महत्त्वाचा आणि गुंतागुतीचा विषय असतो. लहान वयात मुले कोणतीही गोष्ट झपाट्याने आत्मसात करतात. त्यामुळे त्यांचे संगोपन करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. लहान मुलांचे मन खूप चंचल असते. परंतु त्यांना योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. अनेक मुलांची स्मरणशक्ती अगदी सुरुवातीपासूनच तीक्ष्ण असते, तर काही मुले त्याबाबतीत थोडी कमकुवत असतात. त्यांना शाळेत अभ्यास आणि लेखनात अडचणींचा सामना करावा लागतो. कधीकधी अशा मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता देखील असते. पण मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याचे काही उपाय आहेत. आपण अशाच काही उपक्रम आणि पौष्टिक पदार्थांबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्या मदतीने मुलांची स्मरणशक्ती चांगली होऊ शकते.

परंतु मित्रांनो सध्या मुले मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खाण्याच्या ट्रेंडमध्ये अडकत आहेत. त्याचबरोबर आइसक्रीम, चॉकलेट यासारख्या गोष्टीही मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. मुले दिवसभर मोबाइल किंवा टीव्हीवर गेम खेळत बसतात. त्यामुळे व्यायामाचाही अभाव आहे. योग्य आहार आणि शारीरिक हालचाली मुलांच्या चांगल्या विकासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो पौष्टिक आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे मुलाचे शिकणे, लक्षात ठेवणे, लक्ष देण्याची क्षमता आणि वागणूक वाढण्यास मदत होते.

आणि संपूर्ण आणि निरोगी आहारामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूचे पोषण करतात आणि तणाव किंवा चिंतापासून संरक्षण करतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की कोण कोणते पदार्थ आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना खायला दिले पाहिजेत की ज्यामुळे त्यांच्या मेंदूचे विकासासाठी पोषक असणारे घटक त्यांना मिळतील आणि त्यांच्या बुद्धीचा विकासामध्ये यामुळे मदत होईल. तर मित्रांनो यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे दही होय मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु दह्यामध्ये असणारे पोषक घटक हे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप मदत करतात. मित्रांनो प्रथिने समृद्ध असलेले दही मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. दह्यामध्ये आयोडीन असते जे मेंदूला प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करते.

आणि मुलांना हिरव्या भाज्या द्याव्यात. हिरव्या भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि आहारातील फायबर मुलांची स्मरणशक्ती वाढवतात. त्यामुळे पालक, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, मोहरीची पाने, लेट्युसची पाने, बीटची पाने यांचा मुलांच्या आहारात समावेश करता येईल. आणि मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हिरव्या पालेभाज्या म्हणजे नेमकी कोणती पालेभाजी आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना द्यायचे आहेत तर ती आहे पालक मित्रांनो पालक ही आपल्याला बाजारामध्ये किंवा भाजी मंडई मध्ये सहज उपलब्ध होते तर मित्रांनो पालकमध्ये असणाऱ्या आवश्यक घटकांमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास लवकर होण्यास मदत होते.

आणि त्यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे अंडी मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की अंडी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु मित्रांनो अंड्यामध्ये असणारे काही पोषक घटकांमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास लवकर होतो आणि त्याचबरोबर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासही यामुळे मदत होते आणि म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज किमान एक तरी अंडी आपण लहान मुलांना खाण्यासाठी नक्कीच दिले पाहिजे, आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे फिश किंवा मासे मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की माशांमध्ये असणारे प्रथिने आणि प्रोटीन यामुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास लवकर होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेक डॉक्टर सुद्धा पालकांना सांगत असतात की जर लहान मुलांच्या मेंदूचा विकास करायचा असेल तर त्यांना माशांचे सेवन करणे गरजेचे आहे.

आणि पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा परंतु त्याच बरोबर आपल्या सर्वांना माहीत असणारा पदार्थ आहे की आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मदत करतो तो म्हणजे ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुकामेवा मित्रांनो आपल्यातील अनेक जण असे म्हणतात की बदाम खाल्ल्याने बुद्धी येते म्हणजेच बदाम खाल्ल्यामुळे आपली बुद्धी वाढते तर मित्रांनो हे खरच आहे सुकामेवा मध्ये असणारे पोषक घटकांमुळे आपल्या मेंदूला चालना मिळते आणि त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती मध्ये ही वाढ होते आणि म्हणूनच आपणही आपल्या मुलांना सुका मेवा खाऊ घातला पाहिजे, परंतु मित्रांनो सुकामेवा आपल्याला रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि सकाळी त्याचे सेवन करायचे आहे.

तर मित्रांनो हे काही पदार्थ आहेत हे जर आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या खाण्यासाठी दिले तरी यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. आणि त्याचबरोबर या पदार्थांचे रोजच्या सेवनामुळे मुलांच्या बौद्धिक विकास होतो आणि त्यांची स्मरणशक्ती ही चांगली होते तर मित्रांनो असे हे जे पदार्थ आहेत हे तुम्ही तुमच्या लहान मुलांना खाण्यास द्या आणि त्यांच्या बौद्धिक विकास करण्यास मदत करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *