मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी केस हे एक महत्त्वाचा भाग आहे. केस लांबसडक, काळेभोर आणि केसांना एक विशिष्ट प्रकारची चमक असेल तर आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. तुम्हाला तुमचे केस तुम्हाला कायमचे काळे करून पाहिजे असतील, तुमचे केस खूप पांढरे असतील व सतत तुम्हाला असे वाटत असेल की, आपण कुठे जायला नको किंवा आपल्या डोक्यावर टोपी घालून जावे. कारण आपले केस पांढरे असतात किंवा गळत असतात. अनेकांना असे वाटत असते की आपले केस मोठे असावेत. आपले केस चांगले शाईन मारायला पाहिजे व आपल्या डोक्यात कासलाही कोंडा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो.
परंतु मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की, आज-काल केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या या ताण-तणावाच्या जीवनामुळे आपण आहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ठिकाणी तर, असेही दिसून आले आहे की, अनेक लोकांना टक्कल ही पडले आहेत.
त्याचबरोबर केस पांढरे होण्याची ही समस्या भरपूर जणांना असते आणि लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. केस गळती व केस पांढरे होण्याचे कारण म्हणजे आपले आहाराकडे लक्ष न देणे, थायरॉईड मुळे ही केस गळतीचे प्रमाण वाढते.
मित्रांनो या समस्येवर आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.
तर मित्रांनो कोणताही उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दोन चमचे कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये जो कांदा असतो तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा रस दोन चमचे काढून घ्यायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो हा रस आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला विटामिन ई ची एक कॅप्सूल मध्ये असणारा गर काढून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. मित्रांनो विटामिन ई ची गोळी तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये अगदी दोन रुपयाला सहज उपलब्ध होईल.
तिथून त्या आणून एका गोळीचा गर तुम्हाला या कांद्याच्या रस मध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. म्हणजेच अर्ध्या लिंबाचा रस मित्रांनो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.
मित्रांनो त्यानंतर त्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा घटक आपल्याला ऍड करायचा आहे तो म्हणजे आवळा पावडर. मित्रांनो एक चमचा आवळा पावडर देखील आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चार पदार्थ आपल्याला एका वाटीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याचे जे मिश्रण किंवा पेस्ट तयार होईल. याचा वापर आपल्याला आपले केस काळे करण्यासाठी करायचा आहे.
तर मित्रांनो असे हे मिश्रण तुम्हाला तुमच्या संपूर्ण केसांवर लावायचे आहे आणि किमान एक ते दोन तासापर्यंत आपल्याला हे मिश्रण आपल्या डोक्यावर राहू द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हे मिश्रण आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.
मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मिश्रण धुताना कोणत्याही शाम्पूचा वापर करू नये. आठवड्यातून तीनदा एक महिना अशा पद्धतीने हा उपाय करा. नक्कीच तुमचे केस गळतीचे प्रमाण कमी होईल व केस काळेभोर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.