मित्रांनो आपल्या आसपास आपल्याला विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात आणि ही झाडे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो आणि यासाठी आपल्या खूप खर्च देखील पैसा होत असतो. तर आज मी तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहे. ही वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. तर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जांभळाचे जाड प्रत्येकाने पाहिलेच असेल. हे जांभळाचे झाड आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि जांभळाची जी काही पाने आहेत ही देखील आपल्याला खूपचफायदेशीर ठरतात.
तर जांभळाच्या झाडाची पाने आपल्याला कशा प्रकारे फायदेशीर ठरतात जाणून घेऊयात. तर अनेक जणांना डोळ्याबाबतीत खूप साऱ्या समस्या असतात म्हणजेच डोळ्यांमध्ये आपल्याला जळजळ होत असेल तसेच अंधुक पणा वाटत असेल तर तुम्ही जांभळाच्या झाडाची कोवळी पंधरा ते वीस पाने तोडून आणायची आहेत आणि ती चार ग्लास पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहेत आणि त्यातील एक चतुर्थांश भाग राहिल्यानंतर त्या पाण्याने आपल्या डोळ्यांना धुवायचे आहे.
त्यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होईल. तसेच डोळ्याबाबतीत असणारे सर्व विकार पूर्णपणे कमी होतात. तसेच अनेक वेळा आपल्या जेवणामध्ये खूप फरक झाल्यामुळे आपल्या तोंडामध्ये छाले पडतात आणि आपल्याला खूपच त्रास होतो. तर अशावेळी तुम्ही जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस करून त्याने चुळा भरल्या तरी देखील आपल्या तोंडामध्ये असणारे जे काही छाले आहेत हे नक्कीच कमी होतात.
तसेच तुम्हाला उलटीचा खूपच त्रास असेल तर तुम्ही आंब्याच्या झाडाची पाने आणि जांभळाच्या झाडाची पाने हे समप्रमाणात घ्यायची आहेत किंवा तुम्ही वीस ग्रॅम या मात्रांमध्ये ही पाने घ्यायची आहेत आणि 400 ml पाणी घेऊन त्यामध्ये ही पाने उकळवायची आहेत आणि चौथाही भाग राहिल्यानंतर हे पाणी म्हणजेच हा काढा तुम्ही गाळून घ्यायचा आहे आणि हे प्यायचे आहे.
यामुळे तुमचा जो काही उलटीचा त्रास असेल तो नक्कीच दूर होणार आहे. तसेच तुम्हाला डाग, खाज, खुजली होत असेल तर तुम्ही जांभळाच्या झाडाची पाने बारीक वाटून घेऊन ती आपल्या शरीरावरती ज्या ठिकाणी खाज खुजली आहे त्या ठिकाणी लावल्यास दोन-तीन दिवसातच तुमचा हा त्रास कमी होईल.
तर अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही जर जांभळाच्या झाडाच्या पानांचा जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केला तर यामुळे आपला खूप सारा त्रास कमी होणार आहे आणि जास्त पैसे देखील आपल्याला खर्च करावे लागणार नाहीत. तर अशाप्रकारे हे घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.