मित्रांनो, भारतात बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. परंतु जर आपणास आपले आरोग्य टिकवून ठेवायचे असेल आणि गोड पदार्थ देखील खायचे असेल तर गूळ हा एक हेल्दी पर्याय असू शकतो. भारतीय संस्कृतीत गूळाचे स्वतःचे खूप महत्त्व आहे. गूळ आणि साखर दोन्ही उसाच्या रसापासून बनविलेले असतात. पण साखर बनवताना त्यात असणारे लोह घटक, पोटॅशियम सल्फर, फॉस्फरस आणि कॅल्शियम इत्यादी नष्ट होतात. पण गूळामध्ये हे घटक नष्ट होत नाही. गूळामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. एका संशोधनानुसार, गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
हे विशेषतः पुरुषांसाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया फुटाणे आणि गूळ खाण्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे.मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना पोटाला संबंधित अनेक तक्रारी असतात यामध्ये अपचन आणि त्याचबरोबर बुद्धकोष्टता, वेळेवर पोट न साफ होणे यांसारख्या अनेक समस्या वारंवार होत असतात. तर अशावेळी नेमक्या कोणता उपाय करावा आणि कोणते औषधे घ्यावेत हे कळत नाही. परंतु मित्रांनो अशा वेळी जर आपण दररोज मुठभर फुटाणे आणि गुळ खाण्यास सुरुवात केली तर यामुळे आपल्या पोटा संबंधित सर्व समस्या नष्ट होतातच. त्याचबरोबर आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते.
परंतु मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फुटाणे आणि गुळ खाण्याची योग्य पद्धत. मित्रांनो सकाळचे वेळी काहीही न खाता पिता म्हणजे अनुशापोटी आपल्याला मुठभर फुटाणे आणि गुळ खायचे आहे. तर मित्रांनो अजून कोण कोणते फायदे आपल्याला गुळ व फुटाणे खाल्ल्याने होतात. याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात.मित्रांनो गुळ आणि फुटाणे खाल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला फायदा आपल्या शरीराला असा होतो की, यामुळे गुळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने पचन प्रक्रिया योग्य राहते. गूळ शरीराचे रक्त स्वच्छ करतो आणि चयापचय ठीक करतो.
यामुळे गॅसची समस्या उद्भवत नाही. ज्यांना गॅसचा त्रास होतो. त्यांनी दररोज जेवणानंतर थोडासा गूळ आणि फुटाणे नक्की खावेत.गूळ हा लोहचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे गूळ हा अशक्तपणा असणाऱ्या रूग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. विशेषत: स्त्रियांसाठी, गूळ आणि फुटाण्याचे सेवन फार महत्वाचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो गूळ आणि फुटाणे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. गूळ रक्तातील वाईट विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. ज्यामुळे त्वचेला चमक येते आणि मुरुम देखील होत नाही. गूळ आणि फुटाणेमध्ये जस्त देखील भरपूर प्रमाणात असते.
त्याचबरोबर मित्रांनो सर्दी आणि कफपासून बचाव करायचा असेल तर गूळ आणि फुटाणे याचे सेवन केल्याने आराम मिळतो. जर आपल्याला सर्दी दरम्यान फक्त गूळ खायचा नसेल तर आपण याचा वापर चहामध्ये किंवा लाडू तयार करून देखील करू शकता. फुटाणे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि तुम्ही फुटाणे आणि गूळाचे लाडू बनवू शकता. हे अन्न चवदार असेल आणि सर्दीपासून आराम देखील देईल. जर तुम्हाला खूप थकवा व अशक्तपणा जाणवत असेल तर फुटाणे व गूळ सेवन केल्यास तुमची उर्जा पातळी वाढते. गूळ लवकर पचतो आणि साखरेची पातळी देखील वाढत नाही. गूळ आणि फुटाणे शरीराचे तापमान नियंत्रित करतात.
कारण मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी एलर्जी घटक उपलब्ध असतात. म्हणून दमा असणाऱ्या रूग्णांसाठी याचा उपयोग खूप फायदेशीर आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो
गूळ आणि फुटाणे मध्ये भरपूर पोटॅशियम आढळते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. एवढेच नाही तर यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते.जो व्यक्ती फुटाणे आणि गूळ सेवन करतो तो स्वतःला नेहमीच तरूण समजतो. पुरुष रोगांमध्ये, विशेषत: फुटाणे आणि गूळ यांचे सेवन करायला सांगितले जाते. हे शरीराची कमजोरी दूर करते आणि ताकद वाढविण्यात मदत करते.
मित्रांनो गुळ आणि फुटाणे यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर असल्यामुळे अपचन गॅस बुद्धकोष्टता यांसारख्या पोटात संबंधित प्रमुख आजारांपासून आपल्याला त्वरित आराम मिळतो. मित्रांनो गुळ आणि फुटाणे यामध्ये आपल्या शरीराला उपयुक्त असणारे असे काही द्रव्य असतात की, ज्यामुळे जर याचे सेवन आपण नियमितपणे केले तर यामुळे डिप्रेशन ताणतणाव यांसारख्या गंभीर आजारांवर सुद्धा आपण मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो जर तुम्हालाही वारंवार ताण जाणवत असेल किंवा तुम्हालाही कामाचे खूप टेन्शन येत असेल तर अशावेळी तुम्ही सुद्धा मूठभर फुटाणे आणि गुळ खाणे सुरू केले पाहिजे.
त्याचबरोबर गूळ आणि फुटाणे मध्ये प्रथिनेंचे प्रमाण खूप जास्त आहे , जे पुरुषांना बॉडी मसल्स आणि शरीरामध्ये टाकत निर्माण करण्यास मदत मिळते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आपले वजन वाढवायचे आहे किंवा आपले मसल्स बिल्ड करायचे आहेत. त्यांनी गूळ आणि फुटाणे नक्की खावेत. यामुळे आपल्या मसल्स बनविण्यास मदत होते. म्हणून, ज्या पुरुषांना जिममध्ये जाऊन परिपूर्ण शरीर तयार करायचे आहे त्यांनी गुळ व फुटणे खाण्यास सुरवात केली पाहिजे. ज्या पुरुष लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले आहेत आणि त्यांचे वजन कमी करायचे आहे त्यांनी नियमितपणे फुटाणे आणि गूळ खाण्यास सुरुवात करावी. हे शरीराची चयापचय वाढवते आणि लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.