मित्रांनो प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर असावा तसेच गोरा असावा असे वाटतच असते. त्यामुळे प्रत्येक जण अनेक क्रीमचा तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. परंतु मित्रांनो या क्रीम्सचा अनेकांना साईड इफेक्ट देखील होत असतो आणि त्यामुळे ही त्वचा गोरी होण्याऐवजी काळी देखील पडू शकते. त्यामुळे मग आपण क्रीमचा वापर करणे टाळत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला घरच्या घरी आपला चेहरा मुलायम, सुंदर, गोरा, चमकदार बनवण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमचा चेहरा अगदी गोरा तसेच चमकदार बनेल.
मित्रांनो आताच्या काळामध्ये आपला चेहरा तेजस्वी दिसावा आणि त्याचबरोबर आपण तरुण दिसाव त्यासाठी आपल्यातील अनेक जण खूप मेहनत घेत असतात. त्याचबरोबर आपल्यातील बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळे महागडी औषधे, गोळ्या, क्रीम्स देखील घेत असतात.
मित्रांनो इतके सर्व औषधे आणि क्रीम्स घेऊन आपल्यातील बऱ्याच जणांच्या चेहऱ्यासंबंधीच्या काही समस्या आहेत त्या दूर होत नाहीत. त्यामुळे हे लोक खूपच निराश होतात आणि मित्रांनो ज्यावेळी आपला चेहरा अगदी खराब दिसतो किंवा आपल्याला ज्यावेळी चेहऱ्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. त्यावेळी आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होतो आणि म्हणूनच मित्रांनो आताच्या काळामध्ये आपला चेहरा तेजस्वी, तरुण आणि सुंदर असणे खूप गरजेचे आहे.
तर मित्रांनो आपला चेहरा तेजस्वी दिसावा आणि त्याचबरोबर कायम तरुण राहावा त्याचबरोबर आपण सुंदर दिसावे यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम्स आपल्या चेहऱ्यावर वापरत असतो. परंतु मित्रांनो आज आपण जी आयुर्वेदिक क्रीम तयार करण्याचा एक छोटासा उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक क्रीम तयार करायचे आहे आणि मित्रांनो ज्या पद्धतीने कोरियन स्त्रिया या सुंदर आणि तरुण तेजस्वी अशा पद्धतीने दिसतात. त्या पद्धतीने आपलाही चेहरा या एका छोट्याशा उपायाने म्हणजेच या क्रीमने होईल. तर मित्रांनो कशा पद्धतीने ही क्रीम आपल्याला तयार करायचे आहे याबद्दलची माहिती आता पण जाणून घेऊया.
तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला महत्त्वाचा जो एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. मित्रांनो तांदूळ हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतं आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो कश्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या तांदळाचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया.
तर मित्रांनो सर्वात आधी उपाय करत असताना तुम्हाला एक छोटीशी वाटी भरून तांदूळ घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी टाकायच आहे. दीड कप पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवायचे आहे.
दुसऱ्या दिवशी मित्रांनो हे भिजलेले तांदूळ आणि पाणी आपल्याला मिक्सरच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे. मित्रांनो याची एक पेस्ट तयार होईल. ज्यावेळी तुम्ही मिक्सरच्या सहाय्याने हे तांदूळ बारीक कराल त्यावेळी याची जी पेस्ट तयार होईल. तर मित्रांनो अशी ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला गाळणीच्या साह्याने ही पेस्ट गाळून घ्यायचे आहे म्हणजेच या तांदळाचे पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे.
ती पेस्ट एका बाजूला काढून घ्यायचे आहे. मित्रांनो यामधून जे तांदळाचे पाणी तयार होईल ते पाणी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. तर मित्रांनो अशा रीतीने पेस्ट तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्यालाही पाणी काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो गॅसवर आपल्याला एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्या पॅनवर हे संपूर्ण पाणी आपल्याला टाकायचे आहे.
त्या पॅनवर हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चमचाच्या सहाय्याने हे पाणी हलवत राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो थोड्या वेळामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्या पाण्याची आता पेस्ट तयार झालेली आहे म्हणजेच त्याची एक क्रीम तयार होत आहे.
तर मित्रांनो त्या पाण्याची क्रीम तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायच आहे आणि थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला ते सर्व तांदळाच्या पाण्याची जी पेस्ट तयार झालेली आहे ती सर्व काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचा एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा गर टाकायचा आहे. त्याचबरोबर विटामिन ई ची एक कॅप्सूल सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे.
मित्रांनो हे दोन्ही पदार्थ यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचे आहे. यानंतर मित्रांनो याची जी पेस्ट म्हणजेच क्रीम तयार होईल ही क्रीम आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे. तर ही जी क्रीम तयार झालेली आहे हे आपण एका छोट्याशा डबीमध्ये साठवून ठेवू शकतो. ही डबी आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही क्रीम आपण त्या डबीमध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर दररोज रात्री झोपण्यापूर्वी या क्रीम ने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर मालिश करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला संपूर्ण चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने उपाय आपल्याला करायचा आहे. यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या सर्व सुरकुत्या, काळे डाग निघून जातील आणि त्याचबरोबर आपला चेहरा तेजस्वी आणि सुंदर होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.