मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर ठरतात. म्हणजेच आयुर्वेदामध्ये वनस्पतींना खूपच महत्त्व आहे. तसेच हवा शुद्ध राखण्याचे काम देखील या वनस्पतीकडेच असतात. तर अशा काही वनस्पती आहेत ज्यामुळे आपल्या अनेक रोगांवरती यांचा फायदा होतो. परंतु काय होते की बऱ्याच जणांना आपणाला कोणत्या वनस्पतीचा कशासाठी फायदा होतो. हेच माहीत नसल्याकारणाने मग आपण घरगुती उपाय करणे सोडून देतो. म्हणजेच मग आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. भरपूर सारे पैसे खर्च करीत राहतो.
परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी वनस्पती सांगणार आहे या वनस्पतीचे आपणाला खूप सारे फायदे होणार आहेत. म्हणजेच आपल्या अनेक आजारांवर ही वनस्पती खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर ही वनस्पती नेमकी कोणती आहे आणि कोणत्या आजारांवर आपल्याला फायदा होतो चला तर जाणून घेऊयात.
तर ही वनस्पती आहे ती म्हणजे अपराजिता. मित्रांनो अपराजिता ही वनस्पती तुम्ही पाहिली असेलच आणि याची फुले असतात ही फुले गडद निळ्या कलरची असतात. याची पाने, फुले, मूळ, खोड हे सर्व आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. तर तुम्ही या अपराजिताच्या फुलांचा जर चहा करून पिला म्हणजेच तुम्ही थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्येही अपराजिता त्याची फुले टाकायची आहेत आणि हे पाणी उकळवून घ्यायचे आहे.
त्या पाण्याला एक निळा कलर येईल आणि हा निळा कलर आल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. असा जर तुम्ही चहा पिला तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त घाण साठलेली आहे ही बाहेर काढण्याचे काम करते. तसेच आपला जो काही सर्दी असेल, खोकला असेल यावर देखील अपराजिता खूपच फायदेमंद ठरते. तसेच आपल्या त्वचासंबंधित काही विकार असतील यावर देखील ही वनस्पती खूपच फायदेशीर ठरते.
मित्रांनो, या अपराजिताच्या फुलांचा जो काही चहा आहे हा चहा आपल्या शुगर लेवल साठी देखील खूपच फायदेशीर ठरतो. तसेच आपली त्वचा वरती जर काही चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे आल्या असतील तर त्यासाठी देखील हा चहा खूपच फायदेशीर ठरतो. तसेच आपल्याला जर अशक्तपणा, थकवा खूपच जाणवत असेल तर त्यावेळेस अपराजिताच्या फुलांचा चहा करून तो गाळून जर पिला तर यामुळे आपल्या शरीरातील थकवा नक्कीच गायब होईल.
तसेच मित्रांनो तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर तुम्ही या अपराजिताच्या पानांचा लेप करून जर आपण आपल्या कपाळी लावला तर यामुळे मायग्रेनचा पूर्णपणे त्रास कमी होणार आहे. तसेच बऱ्याच जणांचे अर्धे डोके दुखत असते त्यावेळेस तुम्ही या अपराजिताच्या झाडाची जी मुळे आहेत या मुळाची पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्या डोक्याला लावायची आहे. यामुळे जे काही आपले अर्धे डोके दुखण्याचा त्रास असतो हा त्रास नक्कीच कमी होईल.
बऱ्याच जणांना आजकाल ताप सतत येत असतो म्हणजेच तापामुळे आपण खूपच घाबरतो. तर तुम्हाला देखील सतत ताप येत असेल तर तुम्ही या अपराजिताच्या वनस्पतीची जी मुळे आहेत याचे तुकडे तुकडे करून तुम्ही याची माळ जर आपल्या गळ्यात घातली तर यामुळे आपला जो काही ताप असेल हा ताप नक्कीच कमी होणार आहे.
बऱ्याच लोकांना खोकल्याचा देखील त्रास खूपच होतो. त्यासाठी देखील अपराजिताचा वापर आपणाला करता येतो. म्हणजे तुम्ही एक मिरे घ्यायच आहे तसेच दोन तीन तुळशीची पाने घ्यायची आणि अपराजिताचे एक सेंटीमीटर मूळ घ्यायचं आणि हे सर्व आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये उकळवायचे आहे. म्हणजेच एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास होईपर्यंत हे पाणी आपणाला उकळवायचे आहे आणि हे पाणी आपल्याला गाळून प्यायचे आहे. यामुळे आपला जो काही खोकल्याचा त्रास आहे हा नक्कीच कमी झालेला तुम्हाला दिसून येईल.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना टॉन्सिलचा त्रास होत असतो. तर अशा वेळेस तुम्ही या अपराजिताच्या पानांची पेस्ट करून जे काही आपल्या टॉन्सिल आहे त्या ठिकाणी वरच्या बाजूने म्हणजेच बाहेरून आपल्याला त्या भागाला लावायचे आहे. यामुळे आपला टॉन्सिलचा त्रास नक्कीच कमी होईल.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या अपराजिताच्या वनस्पतीचा जर घरगुती वापर केला तर आपणाला कोणत्याही आजारांसाठी पैसे मोजावे लागणार नाही. म्हणजेच वरीलपैकी तुम्हाला कोणताही जर त्रास होत असेल तर या घरगुती उपायाने तुम्ही अवश्य आपला त्रास कमी करू शकता आणि आपला वेळ आणि पैसा देखील वाचवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी असे आयुर्वेदिक उपाय आवश्यक करून पहा. ज्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.