घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरामध्ये नक्की काय घडते सत्य वाचून हैराण व्हाल ….!! श्री स्वामी समर्थ

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण देवाची आरती करताना किंवा आरती झाल्यानंतर कापूर जाळतो. कापूराच्या वासाने वातावरण शुद्ध होते व मन प्रसन्न होते. अशा या कापराचे कितीतरी औषधी उपयोगही आहेत. आपल्या वास्तुशास्त्रात व ज्योतिशास्त्रातही याचे कितीतरी उपयोग सांगितलेले आहेत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला कापराचे असे काही उपयोग सांगणार आहोत जे केल्याने तुम्ही सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होऊन मालामाल व्हाल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराची बाधा त्यापासूनही आपली सुटका करून घेऊ शकता. चला तर या उपायांबद्दल जाणून घेऊया. आणि मित्रांनो जर आपल्या घरात एखाद्या ठिकाणी काही वास्तुदोष निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी २ कापराच्या वड्या ठेऊन द्याव्यात.

मित्रांनो त्या वड्या संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या २ वड्या ठेवाव्यात. यामुळे त्या वास्तुदोषाचा प्रभाव कमी होईल व आपल्याला जाणवणार नाही. कापूर जाळल्याने देवदोष किंवा पितृदोष असेल तर तो दूर होतो. नेहमी काही व्यक्ती असे सांगतात कि आम्हाला पितृदोष आहे किंवा कालसर्प दोष आहे. पण वास्तवात हा पितृदोष नसून राहू व केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो.
हा प्रभाव नष्ट करण्यासाठी दिवसातून ३ वेळा सकाळी सायंकाळी व रात्री शुद्ध तुपात भिजवलेल्या कापराच्या २-२ वड्या जाळाव्यात. आपल्या टॉयलेट व बाथरूम मध्ये २-२ कापूरच्या वड्या ठेऊन द्याव्यात. यामुळेही राहू व केतू दोष दूर होतो तसेच पितृदोषाचाही प्रभाव कमी होतो.

एक गुलाबाचे फुल घेऊन त्यात २ कापूरच्या वड्या ठेऊन जाळाव्यात व ते फुल लक्ष्मीदेवीला अर्पण करावे. यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते. पण हा उपाय तुम्हाला सलग ४३ दिवस करायचा आहे. जर नवरात्रात हा उपाय केला तर त्याचा परिणाम खूप लवकर जाणवेल. रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण किचनची सफाई करावी. व एका चांदीच्या वाटीत २ कपूरच्या वड्या व २-३ लवंग ठेऊन जाळावे. असे तुम्ही नियमितपणे केल्यास धनधान्याने तुमचे घर नेहमी भरलेलं राहील. तुम्हाला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही. मित्रांनो जर तुमच्या विवाहाची बोलणी चालू असतील पण जमत नसेल किंवा काही न काही अडचणी नेहमी येत असतील तर हा तोडगा करा.

मित्रांनो हा उपाय करत असताना ३६ लवंग व ६ कापूरच्या वड्या घेऊन त्यात हळद व तांदूळ मिक्स करून त्या सामग्रीने दुर्गा देवीला आहुती द्यावी. म्हणजेच दुर्गा मंत्राचा जप करून अग्निमध्ये थोडे-थोडे ते मिश्रण टाकावे. यामुळे तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी चुटकीसरशी सुटतील.पतिपत्नींचे जर जमत नसेल सारखे वादविवाद व भांडणे होत असतील तर रात्री झोपताना पतीने पत्नीच्या उशीखाली २ कापुराच्या वड्या ठेवाव्यात व पत्नीने पतीच्या उशीखाली एक छोटीशी कुंकवाची पुडी ठेवावी. सकाळी उठल्यानंतर ती पुडी एखाद्या झाडाखाली टाकून द्यावी. तसेच कापराच्या वड्या घेऊन बेडरूम मध्ये जाळाव्यात. यामुळे पतिपत्नीमधील भांडण व वादविवाद मिटतील तसेच ताणतणाव दूर होतील.

मित्रांनो जर हा उपाय तुम्हाला करायचा नसेल तर रोज संध्याकाळी २-२ कापुराच्या वड्या बेडरूम मध्ये पेटवाव्यात. बेडरूमच्या एका कोपऱ्यात २ कापराच्या वड्या ठेऊन द्याव्यात. त्या संपल्या कि दुसऱ्या वड्या त्या ठिकाणी ठेऊन द्याव्यात. सकाळी अंघोळीच्या पाण्यात कापूरच्या तेलाचे २-३ थेंब टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्याला फ्रेश व उत्साही तर वाटतेच. पण आपले वाईट भाग्यही चांगल्या भाग्यात बदलते. जर या पाण्यात चमेलीच्या तेलाचेही काही थेंब टाकून घेतले तर यामुळे राहू, केतू, शनी यांचा दोष असल्यास तोही निघून जातो. पण हा उपाय फक्त शनिवारीच करावा. देवासमोर कापूर जाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.

मित्रांनो दररोज सकाळी व संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. घरातील सुष्मजंतू व कीटकांचा नाश होतो आणि त्याबरोबर अक्षयींपुण्याची पण प्राप्ती होते. आकस्मित घटना किंवा दुर्घटनांचे खरे कारण राहू किंवा केतूदोष असू शकतो. त्याबरोबर आपला आळशीपणा व क्रोधही एखादी अप्रिय घटना घडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.म्हणून रोज रात्री हनुमान चालीसाचे वाचन करावे व त्यानंतर घरात कापूर जाळावा. तसे तर ज्या घरात दररोज सकाळी व संध्याकाळी कापूर जाळला जातो. त्या घरात दुर्घटना कधीही होत नाही.

मित्रांनो हे आहेत कापुराचे काही उपाय. हे उपाय करून तुम्ही तुमचे जीवन सुखी, समाधानी व आनंदी बनवू शकता. फक्त कोणताही उपाय करताना त्यावर आपला विश्वास हवा, आपण जर श्रद्धापूर्वक व विश्वासाने हे उपाय केलेत तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *