कितीही वर्षांन वर्षाची डाग, खाज खुजली, फंगल इन्फेक्शन १००% मुळापासून नष्ट करा मोजून फक्त दोन दिवसांमध्ये जबरदस्त घरगुती उपाय …!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो उन्हाळा असो किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये त्वचेचे अनेक आजार होताना दिसतात. धावपळीच्या वेळापत्रकात आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. त्यामुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात घामाने किंवा पावसाळ्यात सतत अंग पावसाच्या पाण्याने भिजल्याने अनेकांना फंगल इन्फेक्शन होते. हा आजार संसर्गजन्य आहे. पावसातून कामावर जाताना भिजलेले पाय ओले कपडे भिजलेले केस लवकर सुकत नाही यामुळे फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

 

त्याचबरोबर मित्रांनो अशावेळी महागडे औषधं घेऊन देखील साधे आजार लवकरात लवकर बरे होत नाही त्यावेळी घरगुती उपायच या आजारावर गुणकारी ठरतात आणि त्यामुळे हे आजार लवकर बरे करतात. मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत.

 

मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्याला खाज सुटणे किंवा फंगल इन्फेक्शन यांसारख्या त्वचेच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि कोणकोणत्या वस्तू या उपाय करणे यासाठी आपल्याला लागणार आहे.

 

मित्रांनो बऱ्याच लोकांना अंगावर इन्फेक्शन मुळे खाज, अंगावर येणारी खाज, झोपताना काखेत पाठीत जांघेत इत्यादी ठिकाणी शरीरावर खाज येते याच्यासाठी विविध प्रकारचे भरपूर महागडे उपचार उपलब्ध आहेत. पण आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत.

 

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घराशेजारी एक तरी कडुलिंबाचे झाड असते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा या कडुलिंबाच्या झाडांचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मित्रांनो आपल्याला या उपायासाठी कडुलिंबाची पाने लागणार आहेत. मित्रांनो कडूलिंबाचे झाड जसे उपयोगी आहे त्याच पद्धतीने कडुलिंबाची पाने खूप उपयोगी आहेत आणि त्यामध्ये असणारे अँटिबॅक्टरियल आणि पोषक घटक यामुळे आपल्याला त्याचा खूपच फायदा होतो.

 

मित्रांनो आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये कडुलिंबाच्या पाल्याचा समावेश करावा. यातील औषधी गुणधर्मांमुळे केसांसह त्वचा देखील चमकदार होण्यास मदत मिळू शकते. आयुर्वेदिक उपचारांमध्येही कडुलिंबाच्या पाल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. कडुलिंबाच्या पाल्याचा योग्य वापर केल्यास त्वचा चिरतरुण आणि चमकदार होण्यास मदत मिळू शकते.

 

म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो प्रमुख घटक लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची दहा ते बारा पाने. तर हा उपाय करताना सर्वात आधी आपल्याला कडुलिंबाची दहा ते बारा पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला कॉटनच्या मदतीने ज्या ठिकाणी आपल्याला खाज किंवा डाग असतील त्या ठिकाणी लावायचे आहेत.

 

आणि त्याच्यानंतर जो आपण दुसरा उपाय बघणार आहोत तो म्हणजे जे आपण कडुलिंबाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कापूर घालायचा आहे म्हणजेच की कापूर एकदा बारीक असा चेचून घेऊन आपल्याला त्या कडुलिंबाच्या पेस्टमध्ये घालायचा आहे.त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा भीमसेनी कापूर बारीक करून घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका कापसाच्या साह्याने हे जे मिश्रण किंवा पेस्ट तयार झालेले आहे .

 

हे आपल्याला फंगल्स आहेत किंवा डाग आहेत किंवा एखादी जागा जर आपल्याला सतत खाजवत असेल तर त्या ठिकाणी लावायचा आहे तर मित्रांनो ही पेस्ट लावून झाल्यानंतर न दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला तसेच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा तर आवश्यक करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला जो काही त्रास आहे तुमचा त्रास कमी होणार आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *