मित्रांनो आपण आज पाहणार आहोत अश्या एका आयुर्वेदिक बियांबद्दल ज्याच्यामुळे तुमचे बरेच रोग बरे होतील. ह्या बिया सहजपणे आपल्या घरात मिळतात. या बिया खूप फायदेशीर आहेत. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल, थकवा जर सतत जाणवत असेल, त्याचबरोबर सतत तोंड येण्याची समस्या, डोके दुःखी, त्याचबरोबर मिनरल्स ची कमतरता असेल, त्याचबरोबर कॅल्शियम ची कमतरता असेल, तुम्हाला जास्त वयात सुद्धा कमी वयाचा अनुभव देणारी वनस्पती आहे.
ह्या बिया सहजपणे सर्वांच्या घरात सापडतात. याला मराठीत चारोळी म्हणतात. तसेच हिंदी मध्ये चिरौंजी असे म्हणतात. याची तुलना ही पिस्ता याच्याशी केली जाते. हा पदार्थ तुम्ही खीरीमध्ये खाल्ले असतील. पण याचा जो आयुर्वेदिक उपयोग आहे तो खूप फायदेशीर आणि एकदम स्फुर्ती आणि शक्ती देणारा आहे. याचा वापर तुम्ही करा याचा फरक तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसून येईल.
चारोळी मध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असते. त्यामुळे तुमच वजन सुद्धा या मुळे कमी होत. यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन डी, व्हिटामिन बी2 ,लोह, कॅल्शियम, हे घटक असतात. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा वापर होतो. जर शुक्राणूची संख्या कमी असेल तर भरून काढण्यासाठी मदत होते.
याचा वापर 5 ते 6 चारोळी आणि खडीसाखर एक ग्लास दुधामध्ये टाकायचे आहे आणि त्याला त्यामधेच अर्धा तास राहून द्यायचं आहे. गरम दुधामध्ये टाकलं तरी चालत. थंड दुधा मध्ये टाकलं तरी चालत. त्यानंतर संध्याकाळी जोपायच्या आधी चारोळी चावून खायचे आहे आणि दूध प्यायचं आहे. कसल्याही पद्धतीची तुमची कमजोरी असेल, शुक्राणू कमीची समस्या असेल तर समस्या पूर्ण पणे निघून जाते. सलग सात सात दिवस तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे.
बऱ्याच जणांना सतत तोंड येण्याची समस्या येते. तोंड जर आले असेल तर हे जे चारोळी चे तीन ते चार बिया आहेत त्या तोंड मध्ये टाकायच्या आहेत आणि त्याला चावून खायचं आहे. अस तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा केलं तर तुमचं तोंड नक्की कमी येईल.
बऱ्याच जणांना डोखे दुःखी चा त्रास असतो, आणि खूप डोके दुखल्यानंतर चक्कर येण्याची शक्यता असते. तर ही चक्कर, डोके दुःखी जाण्यासाठी अत्यंत उपयोगी वस्तू आहे. यासाठी तुम्हाला हे पाण्यामध्ये किव्हा दुधामध्ये घेण्याची गरज नाही. यातील 2 ते 3 दाणे तोंडामध्ये टाकून चंगळुन खायचं आहे. सात ते आठ दिवस हे तुम्हाला करायचं आहे. डोके दुखीची समस्या पूर्ण पणे बरी होईल.
बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो तर ते सुद्धा या चारोळी मधून निघून जात. तुम्हाला पित्त घालवण्यासाठी दोन ते तीन दाणे तोंडामध्ये टाकायचे आहे. तुमची समस्या निघून जाईल. जर मूळव्याध मधून रक्त पडत असेल तर आपल्याला एक टेंशन येत असत आणि विविध प्रकारचे आपण उपाय करत असतो. पण हे जे रक्त आहे हे तात्काळ थांबु शकत.
हे वापरताना पाच ते सहा दाणे तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये टाकायचं आहे. त्याला पाच ते दहा मिनिटे उकळून घ्यायचे आहे आणि उकळून घेतल्यानंतर थोडेसे कोमट असताना हे दूध प्यायचं आहे. फक्त एक वेळ जर तुम्ही हे दूध प्यायले तरी मूळव्याध मधून रक्त पडणे थांबु शकत.
तळ पायाची आग होत असते तर काय करायचे? तर या चारोळी ची पावडर बनवायची आहे. आणि त्यात पाणी घालून पेस्ट बनवायची आहे. आणि ही पेस्ट आपण तळपायाला लावली तर आग पूर्ण पणे कमी होईल. तर ही चारोळी आपण फक्त खिरी मधून खात होतो, पण त्याचे असे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत. तर हा साधा उपाय तुम्ही नक्की करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.