मित्रांनो थंडीचा काळ तसा तर खूपच छान वाटतो, पण तुमच्या त्वचेसाठी हा ऋतु अनेक त्रासांना आमंत्रण देतो. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होऊन त्याला भेगा पडायला लागतात. फक्त ओठ आणि त्वचा नाही, तर त्याचा प्रभाव टाचांवरही होतो. परंतु, आपण त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. चेहर्यावर तर तुम्ही मॉइश्चराइज़र आणि कोल्ड क्रीम लावून घेता. परंतु, टाचांचे काय? मित्रांनो भेगाळलेल्या रखरखीत टाचा मऊ करण्यासाठीचा एक घरगुती उपाय, पुरुषांच्या तुलनेत महिलांना टाचा उकलण्याची समस्या जास्त प्रमाणात बघायला मिळते. याशिवाय ग्रामीण भागात, आणि ज्या व्यक्तीच्या मातीशी थेट संपर्क येतो अशा व्यक्तींच्या टाचा रखरखीत होऊन भेगा पडू लागतात.
मित्रांनो पाय कोरडे पडून रखरखीत व्हायला सुरुवात झाल्यावर आपण पायांची टाचांची पाहिजे तेवढी काळजी घेत नाही. जेव्हा टाचांना भेगा पडू लागतात, टाचा वेदना करू लागतात, त्यावेळी आपल्याला या वेदना नसाव्यात वाटतात. तुम्हाला या उकललेल्या टाचांच्या वेदनांकडून सुटका करून घ्यायची असेल तर असा हा उपाय करा.
काही दिवसातच तुमचे पाय मुलायम दिसू लागतील आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि घरामध्ये असणाऱ्याच गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो कोणता आहे उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बटाटा. मित्रांनो एक बटाटा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि त्याची साल व्यवस्थितपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे.
त्यानंतर किसणीच्या साह्याने हा बटाटा व्यवस्थितपणे आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि किसून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रस बाजूला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक बटाटा किसून घेतल्यानंतर त्याचा चोथा एका बाजूला आणि एका बाजूला त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला उपायासाठी त्याचा रस वापरायचा आहे.
तर मित्रांनो सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला बटाट्याचा जो रस आपण तयार केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये साधारणता अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि मित्रांनो लिंबू पिळल्यानंतर लिंबूचा जो वरचा भाग राहील तो सुद्धा आपल्याला तसाच ठेवायचा आहे.
कारण मित्रांनो नंतर आपल्याला त्याचाही वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने बटाट्याच्या रसामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये साधारणतः अर्धा ते एक चमचा कोलगेटची पेस्ट सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारे कोणतेही कोलगेटची पेस्ट यामध्ये घेतली तरीही चालेल.
मित्रांनो कोलगेट मुळे आपली जी पायाची टाच आहे किंवा आपला जो तळपाय आहे तो आणखीनच उजळून निघण्यास मदत होते आणि म्हणूनच याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे. तर हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला याचं व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घ्यायचा आहे.
जो आपण लिंबूचा कवच ठेवले होते त्या कवचाने हे जे मिश्रण आहे हे आपल्या टाचांवर लावून व्यवस्थितपणे पाच ते दहा मिनिट आपल्याला मालिश करून घ्यायचा आहे. मित्रांनो मालिश करून झाल्यानंतर 20 मिनिटे आपल्याला ते मिश्रण तसंच टाचांवर राहून द्यायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला आपल्या टाचा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या वेळी उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या टाचांवर पडलेल्या ज्या काही भेगा आहेत किंवा आपल्या टाचा जर खूप वाळलेल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. एका रात्रीतच तुम्हाला याचा परिणाम नक्की जाणून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.