देवांना अंघोळ कशी घालावी? या चुकामुळे घराला लागू शकतो वास्तु दोष नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये देवघर हे असतेच. अनेक देवी-देवतांच्या मुर्त्या, फोटोज हे आपल्या देवघरांमध्ये असते. मित्रांनो आपल्या घरातील महिला किंवा कोणताही व्यक्ती हा आपल्या देवघरातील पूजा ही करीतच असतात. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण पूजा करीत असतो आणि दररोज ही देवपूजा होतच असते. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण म्हणतो की, मी दररोज देवांची पूजा करूनही माझ्या काही अडचणी दूर होत नाहीत. माझ्या काही मनातील इच्छा या पूर्ण होत नाहीत.

तर मित्रांनो यामागे देखील आपल्या काही अशा चुका असतात ज्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणजेच आपण जी काही देवपूजा करत असतो. या देवपूजेचे आपणाला फळ मिळत नाही.

मित्रांनो देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत. जर तुम्ही नियमानुसार आपल्या घरातील देवपूजा केलात तर यामुळे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. आपल्या सर्व अडचणी दूर होतात. आपल्या घरातील काही भांडणे, कलह आहेत ते देखील दूर होतात. परंतु मित्रांनो आपल्या या नेमक्या चुका कोणत्या आहेत आणि देवपूजेचे नेमके नियम कोणते आहेत हे आपल्यालाच माहीत नसल्यामुळे आपण याकडे फारसे लक्ष ही देत नाहीत.

देवांना चुकीच्या पद्धतीने अंघोळ घातल्यामुळे आपल्या घराला बरेचसे दोष लागत असतात. त्यामुळे देवांना आंघोळ घालण्याच्या बाबतीत काही नियम आहेत तेच नियम मी तुम्हाला सांगणार आहे.

मित्रांनो अंघोळ म्हणजे शरीर शुद्धीकरण. तर शरीर शुद्धीकरण करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा आपण वापर करतो. पण मित्रांनो आपण बरेच जण हे देवांना स्वच्छ करण्यासाठी त्यांना खाली ठेवतो तर ही पद्धत एकदम चुकीची आहे.

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे देवांना एकत्रित ताम्हणामध्ये ठेवतात आणि अंघोळ घालतात. परंतु मित्रांनो ही देखील खूपच चुकीची पद्धत मानली गेलेली आहे.
मित्रांनो आपण सर्व देवी देवतांना ताम्हणामध्ये ठेवतो आणि वरून मग पाणी घालतो. परंतु मित्रांनो हे पाणी घालत असताना हे दुसऱ्या देवांवर ये हे पाणी जात असते. म्हणजे त्याचे शिंतोडे एका देवावर जर तुम्ही पाणी घालत असाल त्यावेळेला त्याचे शिंतोडे हे दुसऱ्या देवावर देखील जात असतात.

म्हणजेच आपण उष्ट्या पाण्याने अंघोळ घालत असतो. म्हणजेच एका देवाने अंघोळ केलेल्याच पाण्याने आपण परत ते पाणी दुसऱ्या देवावर त्याचे शिंतोडे गेल्यामुळे त्या पाण्याने आपण त्या दुसऱ्या देवाला देखील आंघोळ घातले जाते. तर मित्रांनो हे उष्टे पाणी आपण कधीही देवांना अंघोळ घालताना अजिबात वापरायचे नाही.

म्हणजेच मित्रांनो आपण सर्व देवी देवतांना एकत्रित ताम्हणामध्ये घेऊन आपण वरून पाणी घालतो. ही पद्धत एकदम चुकीची मानली गेलेली आहे. तसेच मित्रांनो बरेच जण हे एका तांब्यांमध्ये पाणी घेतात आणि त्या तांब्यांमध्ये एका देवाला बुडवतात. परत नंतर दुसऱ्या देवाला त्याच पाण्यामध्ये बुडवले जाते.

म्हणजेच मित्रांनो उष्टेच पाणी आपण देवांच्या अंघोळीसाठी वापरतो आणि हीच एकदम चुकीची पद्धत मानली गेलेली आहे आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर देखील होऊ शकतो.

मित्रांनो आपण आंघोळ करताना एकमेकांचे पाणी वापरतो का? किंवा दुसऱ्यांच उरलेलं पाणी वापरतो का? यामुळे बरेचसे दोष आपल्या घराला लागत असतात. तर मित्रांनो एकाच ताम्हणामध्ये सर्व देव अजिबात ठेवायचे नसतात. यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात. त्यामुळे मित्रांनो ही खूपच चुकीची पद्धत आहे.

तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात देवपूजा करताना देवांना अंघोळ कशी घालायची? तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला आपले देवघर जे असते ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे. म्हणजेच देवांना अंघोळ घातल्यानंतर कोणतीही धूळ आपल्या देवांना अजिबात लागू नये.

तर मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यावरती मग आपणाला एक कापड अंथरून घ्यायचे आहे. कधीही देवांना अंघोळ घालण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि उदबत्ती देखील आपल्याला लावून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो एक ताम्हण घ्यायचे आहे आणि एक तांब्याचा कलश पाण्याने भरलेला घ्यायचा आहे. मित्रांनो हा तांब्याचा कलश आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि डाव्या हातामध्ये आपणाला आपल्या देवघरातील देवाची एक मूर्ती घ्यायची आहे.

आपणाला ती मूर्ती ताम्हणामध्ये अजिबात ठेवायचे नाही. तर डाव्या हातामध्ये ती मूर्ती घ्यायची आहे आणि मग उजव्या हाताने आपल्याला तांब्यातील पाणी आपल्याला त्या मूर्ती वरती घालायचे आहे आणि डाव्या हातानेच आपल्याला ती मूर्ती स्वच्छ करायची आहे. नंतर मित्रांनो एक नॅपकिन अंथरून त्यावर ती मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांने आपल्याला ती मूर्ती पुसून घ्यायची आहे.

म्हणजेच कोरडी करून घ्यायची आहे. मग नंतर आपल्याला दुसरी मूर्ती आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आहे. ती देखील आपल्याला ताम्हणामध्ये अजिबात ठेवायची नाही. ती डाव्या हातामध्ये ठेवून उजव्या हाताने तांब्याने पाणी वरून घालून आपण ती मूर्ती स्वच्छ करायचे. अशा प्रकारे सर्व मुर्त्या आपणाला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालायचे आहे.

आणि त्या नॅपकिन वरती ठेवून त्या मुर्त्या पुसून घ्यायच्या आहेत. म्हणजेच मित्रांनो त्या मुर्त्या आपणाला अजिबात ताम्हणामध्ये ठेवायचे नाही. जेणेकरून उष्टे पाणी दुसऱ्या देवांना अजिबात मिळणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवघरातील देवतांना अंघोळ घालायचे आहे.

जर मित्रांनो तुमच्या देवघरांमध्ये एखादा फोटो वगैरे असेल तर तुम्ही एखादे स्वच्छ नॅपकिन घ्यायचे आहे आणि त्याचा जो कोपरा असतो त्यावर थोडेसे पाणी घालून तुम्ही ते फोटोज पुसू शकता. जर तुमच्या देवघरांमध्ये एकापेक्षा जास्त फोटो असतील तर मित्रांनो नॅपकिनच्या एकाच कोपऱ्याने फोटो न पुसता प्रत्येक फोटोला नॅपकिनच्या वेगवेगळ्या कोपऱ्याने पुसायचे आहे.

तर मित्रांनो तुम्ही देखील ज्यावेळेस देवपूजा करता त्यावेळेस मित्रांनो हे नियम पाळणे आवश्यक आहे आणि या प्रकारे तुम्ही आपल्या देवघरातील देवतांना अंघोळ घालायची आहे. जर असे काही नियम जर तुम्ही पाळले तर यामुळे तुम्हाला जे काही इच्छित फळ असेल ते मिळेल. तसे देवी देवतांची कृपादृष्टी तुमच्या तसेच तुमच्या घरावर देखील राहील.

तसेच मित्रांनो आपण देवतांना आंघोळ घातल्यानंतर ताम्हणामध्ये जे पाणी राहिलेलं आहे म्हणजे देवतांना आंघोळ घातलेले जे पाणी आहे ते पाणी मित्रांनो बरेच जण हे तुळशीला घालतात. परंतु मित्रांनो देवतांना अंघोळ घातलेले हे उष्टे पाणी तुम्ही अजिबात तुळशीला घालायचे नाही. तर तुम्ही एखाद्या झाडाला हे पाणी घालायचे आहे.

तर मित्रांनो या नियमांचे नक्कीच पालन करा. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद देखील भेटेल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *