दहा दिवसचाचे चॅलेंज डोळ्याभोवती असणारी कितीही जुनाट काळी वर्तुळे या उपायाने 100% गायब होणारच ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपला चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी आपण अनेक खूप सार्‍या क्रीमचा वापर देखील करीत असतो. परंतु कितीही प्रयत्न केले तरीदेखील आपला चेहरा अनेक वेळा विद्रूप दिसायला लागतो. म्हणजेच अनेक आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग तसेच काळपटपणा दिसायला लागतो. मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना डोळ्याभोवती काळी वर्तुळे देखील असतात. ही घालवण्यासाठी आपण खूप सारी मेहनत देखील घेतो. तर आज मी तुम्हाला काळी वर्तुळे जे काही डोळ्याभोवती असतील ती घालवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील याविषयी जाणून घेणार आहोत.

तर आपल्या डोळ्याभोवती जे काही काळी वर्तुळे असतात ही काळी वर्तुळे येण्यामागचे कारणे म्हणजे अनुवंशिकता म्हणजे जर तुमच्या आई-वडिलांना जर डोळ्याभोवती अशी काळी वर्तुळे असतील तरी देखील आपल्या डोळ्याभोवती तसे काळी वर्तुळे असतात. तसेच एखाद्या व्यक्तीला जर कामांमध्ये खूपच ताण असेल तसेच एखाद्या व्यक्तीचे काम हे सतत खाली मान करून म्हणजे एकसारखे मोबाईलवर बघून यामुळे आपल्या डोळ्यांना एक प्रकारचा ताण निर्माण होतो आणि त्यामुळे देखील आपल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण होत असतात.

तसेच बऱ्याच जणांचे काम हे उन्हामध्ये असतील तरी देखील त्यांना काळे डाग येण्यास सुरुवात होते. तसेच आपल्या शरीरामध्ये विटामिन ची कमतरता असल्यामुळे देखील आपल्याला अशा प्रकारचे काळी वर्तुळे येत असतात. तर मित्रांनो अशी वेगवेगळ्या कारणामुळे आपणाला डोळ्याभोवती काळी वर्तुळे येत असतात.

तर ही डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी तुम्ही डीवायआयवी ही क्रीम लावायची आहे. ही क्रीम आपण घरच्या घरी कशी बनवायची याविषयी देखील जाणून घेऊ. ही क्रीम लावून झाल्यानंतर तुम्हाला बटाट्याचा कीस घ्यायचा आहे. यातील पूर्णपणे पाणी काढायचं आहे आणि हा कीस तुम्ही आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहे. तसेच तुम्ही ही क्रीम लावल्यानंतर काकडीच्या चकत्या करून घेऊ शकता आणि या चकत्या दुधात भिजवून फ्रिज मध्ये ठेवायचे आहे आणि संध्याकाळी ज्या वेळेस आपण ही क्रीम लावेल त्यावेळेस ही क्रीम लावून झाल्यानंतर या चकत्या आपल्याला आपल्या डोळ्यांवरती ठेवायच्या आहेत.

वीस मिनिटे आपल्याला हा बटाट्याचा कीस किंवा तुम्ही जर काकडीच्या चकत्या ठेवल्या असतील तर त्या वीस मिनिटे तशाच ठेवायचे आहेत आणि नंतर त्या काढायच्या आहेत. यामुळे तुमच्या डोळ्याला एक प्रकारचा थंडावा निर्माण होईल. तर मी जी तुम्हाला क्रीम सांगितलेली आहे म्हणजेच डीवायआयवी ही क्रीम आपल्याला घरच्या घरी कशी बनवायची आता याविषयी माहिती घेऊयात.

तर तुम्हाला दोन चमचे एलोवेरा जेल घ्यायचे आहे. व्हायटमीन ई ची एक कॅप्सूल घेऊन ति एलोवेरा जेलमध्ये टाकायची आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा अलमंड ऑइल टाकायचे आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्रित करून एका डबी मध्ये ठेवायचे आहे आणि ही डबी फ्रिजमध्ये ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला ही क्रीम आपल्या डोळ्याभोवती लावायची आहे.

म्हणजेच वरील जे मी तुम्हाला क्रीम सांगितली ती आपली क्रीम घरच्या घरी तयार झाली आणि ही क्रीम लावल्यानंतरच तुम्हाला बटाट्याचा कीस किंवा तुम्ही काकडीच्या चकत्या आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहे. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या डोळ्याभोवती जी काही काळी वर्तुळे असतील, काळे डाग असतील हे सर्व निघून जाण्यास नक्कीच मदत होईल.

या क्रीमने आपल्या डोळ्याभोवती तुम्ही मसाज करायचा आहे. मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला बटाट्याचा कीस किंवा काकडीच्या चकती वीस मिनिटे आपल्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत.

तर अशाप्रकारे तुम्ही हा घरगुती उपाय एक वेळ अवश्य करून पहा. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तुमच्या डोळ्याभोवतीची सर्व काळी वर्तुळे, काळे डाग निघून गेलेली नक्कीच तुम्हाला जाणवतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *