मित्रांनो आजकाल बदलत्या ऋतूमुळे, वातावरणामुळे आपणाला अनेक रोगांना सामोरे जावे लागते आणि अशांमध्ये प्रदूषित हवामानामुळे देखील आपणाला अनेक रोग उद्भवला सुरुवात होते. तर अशा मध्येच डासांचे प्रमाण देखील खूपच वाढलेले आपल्याला पाहायला मिळते. डासामुळे आपल्याला खूप अनेक प्रकारचे रोग देखील होतात. डास चावल्यामुळे डेंगू मध्ये अनेक जणांचे प्राण देखील गेलेले आपण ऐकलेच असेल. त्यामुळे डास चावल्याने खूपच आपणाला वाईट स्थिती निर्माण होते. तर तुम्हाला डासांपासून सुटका हवी असेल म्हणजेच आपल्या घरामध्ये येऊ नयेत यासाठी काही घरगुती उपाय केले तरी यामुळे डास अजिबात आपल्या घरामध्ये येणार नाहीत. ते घराच्या बाहेरच निघून जातील.
तर हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊयात. तर यासाठी आपणाला एक पहिल्यांदा जे मातीचा दिवा असतो तो मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जे आपण पूजा सामग्री मध्ये जो कापूर वापरतो त्यातील कापराच्या वड्या दोन घ्यायच्या आहेत.
आणि एकदम त्या बारीक आपल्याला हाताने करून घ्यायचे आहेत आणि जो आपण मातीचा दिवा घेतलेला आहे त्यामध्ये या कापराच्या दोन वड्या बारीक करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपणाला त्यामध्ये अर्धा दिवा भरेल इतके मोहरीचे तेल घ्यायचे आहे. म्हणजेच तो दिवा आठ मिनिटे तरी जळेल. इतके आपणाला म्हणजेच तो दिवा अर्धा भरेल इतके आपणाला मोहरीचे तेल त्यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर आपणाला एक चमचा मिट्टीचे तेल म्हणजेच ज्याला आपण रॉकेल म्हणतो ते रॉकेल आपणाला एक चमचा त्या तेलामध्ये ऍड करायचे आहे.
यानंतर आपणाला यामध्ये कडूलिंबाचे तेल एक चमचा घालायचे आहे. कडूलिंबाच्या तेलामुळे जो काही वास असतो तो वास कडू असा येतो आणि त्या वासामुळे देखील घरातील जे काही डास असतात ते पळून जातात. म्हणजेच आपल्या घरामध्ये डास येणार नाहीत. तर हे सर्व तेल एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये त्या मातीच्या दिव्यामध्ये आपणाला एक वात घालायचे आहे आणि मग ही वात आपणाला प्रज्वलित करायचे आहे.
मित्रांनो ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू असतील, लाकडी काही साहित्य असेल किंवा कपडे असतील अशा ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा नाही. तसेच लहान मुलांपाशी देखील हा दिवा प्रज्वलित करायचा नाही. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही दारे, खिडक्या बंद करायचे आहे. थोड्या वेळानंतर दारे, खिडक्या तुम्ही उघडू शकता. या तेलाच्या वासामुळे म्हणजेच हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे तुमच्या घरामध्ये एकही डास प्रवेश करणार नाही आणि जो काही डासांमुळे तुम्हाला रोग होणार आहेत या रोगांपासून देखील तुमची सुटका होणार आहे.
तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करा. यामुळे तुमच्या घरामध्ये डास येणार नाहीत. त्यांनी तुमचे जे आरोग्य आहे ते आरोग्य निरोगी राहण्यास नक्कीच मदत होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.