मित्रांनो, चांदी हा असा धातू आहे, ज्याची चमक कालांतरानं कमी होऊ लागते. विविध प्रकारचे दागिने, भांडी, मूर्ती इत्यादी वस्तू चांदीपासून बनवल्या जातात. पण चांदीची वस्तू जोपर्यंत वापरात राहते, तोपर्यंतच ती चांगली राहते. परंतु जर तुम्ही काही काळ ती तशीच ठेवली तर हळूहळू त्याची चमक कमी होऊन ती काळी होऊ लागते. मात्र, ती काळी झाल्यामुळं खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य गमावत नाही. तर हा धुळीचा आणि हवेचा धातूवर होणारा परिणाम आहे. पण चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तू तशाच वापरणं चांगलं वाटत नाही. त्या पुन्हा स्वच्छ कराव्या लागतात. तुमच्या घरातील कोणताही चांदीचा दागिना किंवा वस्तू काळी पडली असेल तर, तुम्हाला ती साफ करण्यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज नाही.
मित्रांनो जरी तुम्ही ही चांदीच्या वस्तू घेऊन किंवा चांदीचे दागिने घेऊन सोनाराकडे किंवा इतर दुकानांमध्ये स्वच्छ करण्यासाठी गेला तर ते तुमच्याकडून याच्याबद्दल खूप जास्त पैसे घेतात आणि या वस्तूंवर किंवा या चांदीच्या दागिन्यांवर केमिकल युक्त पदार्थांचा वापर करतात. त्यामुळे आपली दागिने किंवा भांडी लवकर खराब होऊ शकतात.
म्हणूनच मित्रांनो आपण अशावेळी या वस्तूंवर केमिकल चा वापर न करता घरातल्याच काही वस्तू आणि पदार्थ वापरून काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या चांदीच्या ज्या काही वस्तू किंवा दागिने काळे पडलेले आहेत ते नक्कीच स्वच्छ होतील. मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने हे काही घरगुती उपाय करून तुम्ही या वस्तू सहज चमकवू शकता.
तर मित्रांनो घरामध्ये असणारे चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सर्वात जी पहिली ट्रिक किंवा सर्वात पहिला उपाय आहे तो आहे टूथपेस्ट संदर्भात. मित्रांनो टूथपेस्ट किंवा टुथपावडर ही आपल्याकडे घरात उपलब्ध असतेच. चांदीच्या कोणत्याही वस्तूवर टुथपेस्टचा एक पातळ लेप लावून नंतर दहा-पंधरा मिनिट पेस्ट चांदीच्या वस्तूवरच थोडी सुकवावी.
नंतर स्वच्छ मऊ कापडाने ती पेस्ट पुसून काढावी. मित्रांनो या उपायाने तुमची चांदीची वस्तु तर स्वच्छ होईलच, पण चमकायला देखील लागेल. मात्र यासाठी वापरावी लागणारी टूथपेस्ट सफेद असावी. तसेच आणखी एका उपायात भांडी स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत.कोणत्याही कंपनीची पण सफेद टुथपावडर एका स्वच्छ मऊ कापडावर घेऊन त्या कापडाने भांडयांना चोळावी. कापड शक्यतोवर सिल्क किंवा कॅाटनचे असावे आणि मित्रांनो गरज पडल्यास भांड्यांवर थोडी-थोडी टुथपावडर शिंपडून कापडाने पुसावे.
मग पुन्हा एका स्वच्छ कापडाने भांडी पुसून घ्यावी. या पद्धतीने चांदीचे दागिने किंवा भांडी अगदी नविन असल्या सारखी दिसू लागतात. मित्रांनो अशा पद्धतीने तूटपेस्टने आपण ज्यावेळी ही चांदीचे दागिने स्वच्छ करून घेऊ त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप म्हणजेच पुढचा उपाय लगेचच करायचा आहे. मित्रांनो हे करत असताना आपल्याला गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायच आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ही सर्व चांदीचे दागिने आणि इतर ज्या काही वस्तू आहेत त्या घालायच्या आहेत.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि पाणी गरम करायला सुरुवात करायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये आपल्याला चार ते पाच मिडीयम कॉइलचे कॉइल पेपर म्हणजेच जे चांदी सारखे दिसतात ते कागदाचे गोळे टाकायचे आहेत.
तर मित्रांनो अशा पद्धतीने कॉइलचे गोळे त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या मध्ये एक चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा टाकायचा आहे. त्यानंतर आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डिश वॉश लिक्विड सुद्धा टाकायचा आहे. म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये असणारी भांडी धुण्यासाठी जे लिक्विड वापरतो ते एक चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर पाणी व्यवस्थितपणे आपल्याला उकळून घ्यायचा आहे.
हे पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून आपल्यालाही हे चांदीचे दागिने बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि बाहेर काढल्यानंतर त्यावर लगेच आपल्याला मीठ आणि डिश वॉश लिक्विड टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ब्रशच्या सहाय्याने हे सर्व दागिने घासून स्वच्छ करायचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने या तीन स्टेप तुम्ही या उपायांमध्ये करायचे आहेत. यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही चांदीचे दागिने, वस्तू आहेत त्या लखलखीत चमकू लागतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.