मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर, आकर्षक, गोरा दिसावा असे वाटत असते. चेहऱ्यावरती कोणतेही प्रकारचे डाग नसावे आपली त्वचा ही चमकदार दिसावी असे वाटतच असते. त्यामुळे प्रत्येक जण हा अनेक ब्युटी पार्लरमध्ये जाऊन सल्ला घेत असतात आणि क्रीमचा देखील वापर करीत असतात. परंतु या क्रीम्सचा वापर केल्यामुळे आपले जे नैसर्गिक त्वचा असते ती आणखीनच खराब होऊ लागते. म्हणजेच आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची,त्वचेची काळजी घेणं कठीण जाते.अशातच वांगांचे डाग, काळे डाग तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळामुळे आपल्या चेहरा चारचौघांमध्ये उठावदार दिसत नाही. जास्त काम करणे, तणावात राहणे, झोप पुरी न होणे अशा अनेक कारणांमुळे आपल्या डोळ्याखालील भागात काळे वर्तुळे येत राहतात.
तर मित्रांनो आज आपण वांग, काळे डाग तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविणारा एक घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर मग या उपायासाठी नेमके पदार्थ कोणते हवे आहेत आणि याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे जाणून घेऊया.
या उपायासाठी पहिल्यांदा आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे. बेसन पीठ हे आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते. एक चमचा बेसन पीठ घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद हे आपला चेहरा उजळण्यासाठी तसेच जे काही डाग आहेत हे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरते.
नंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन थेंब मधाचे घालायचे आहेत. मधामुळे आपली त्वचा खूपच मऊ बनते. यानंतर आपणाला 2ते 3 थेंब लिंबू रस घालायचा आहे. जर तुमच्या त्वचेला लिंबू रस सहन होत नसेल तर तुम्ही त्या जागी दही किंवा गुलाब जल देखील घालू शकता.
नंतर आपल्याला एक चमचा दुधावरची साय त्यामध्ये घालायची आहे. नंतर ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर एक चमचा दूध त्यामध्ये घालून हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट आपल्याला संध्याकाळी आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे.
ज्यावेळेस पेस्ट ही तुम्ही लावणार आहात त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि नंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे. गोलाकार आकारांमध्ये आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि दहा मिनिटे मसाज करायचा आहे.
दहा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला ही सर्व पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती सुकू द्यायची आहे आणि त्यानंतर आपला चेहरा हा थंड पाण्याने धुवायचा आहे. धूत असताना तुम्ही कोणत्याही साबणाचा वापर करायचा नाही. जर तुमचा चेहरा फक्त काळवंडलेला असेल तर तुम्ही हा उपाय हा सलग तीन दिवस करायचा आहे.
तसेच तुमच्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग तसेच डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील आणि जर तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही 21 दिवस सलग हा उपाय करायचा आहे. 21 दिवसानंतर तुमच्या चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, वांग हे दूर झालेले दिसतील. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रकारची चमक आलेली जाणवेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.