मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये थोडी का होईना चांदीची भांडी असतातच आणि मित्रांनो चांदी हा असा धातू आहे, ज्याची चमक कालांतरानं कमी होऊ लागते. विविध प्रकारचे दागिने, भांडी, मूर्ती इत्यादी वस्तू चांदीपासून बनवल्या जातात. पण चांदीची वस्तू जोपर्यंत वापरात राहते, तोपर्यंतच ती चांगली राहते. परंतु जर तुम्ही काही काळ ती तशीच ठेवली तर हळूहळू त्याची चमक कमी होऊन ती काळी होऊ लागते. मात्र, ती काळी झाल्यामुळं खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य गमावत नाही. तर, हा धुळीचा आणि हवेचा धातूवर होणारा परिणाम आहे. पण चांदीच्या काळ्या पडलेल्या वस्तू तशाच वापरणं चांगलं वाटत नाही. त्या पुन्हा स्वच्छ कराव्या लागतात.
मित्रांनो जर तुमच्या घरातील कोणताही चांदीचा दागिना किंवा वस्तू काळी पडली असेल तर, तुम्हाला ती साफ करण्यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज नाही. कारण मित्रांनो आपण अशीही आपल्या घरामध्ये असणारी चांदीची भांडी किंवा चांदीचे देव जर आपल्या घरामध्ये असतील किंवा चांदीचे दागिने जर आपल्या घरामध्ये असतील आणि या सर्व चांदीच्या वस्तू घेऊन आपण ज्यावेळेस सोणाराकडे जातो.
त्यावेळी सोनार ही भांडी आपल्याला स्वच्छ करून देतो. परंतु याच्याबद्दल खूप पैसे तो घेत असतो. परंतु मित्रांनो जर आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले आणि त्याद्वारे ही चांदीची भांडी नक्की संपवू शकतो आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आणि घरातल्या घरात आपण हे उपाय करू शकतो.
तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये ज्या काही चांदीचे वस्तू आहेत किंवा चांदीचे दागिने किंवा जे काही तुम्ही स्वच्छ करून घेणार आहात म्हणजेच जी वस्तू तुम्ही चमकणार आहे ती वस्तू तुम्हाला सर्वात आधी घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो त्यावर थोडेसे पाणी आपल्याला घालायचे आहे आणि त्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या अर्ध्या लिंबूनि आपल्याला सर्वात आधी घासून घासून त्या चांदीच्या दागिन्यावर किंवा वस्तूवर असणारी घाण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला लिंबूच्या साहाय्याने तो दागिना किंवा चांदीची जी वस्तू आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने लिंबूने ती वस्तू घासून घेतल्यानंतर आपल्याला एका टूथब्रश वर पांढरे कोलगेट घ्यायचे आहे.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला ब्रशवर पांढरेच कोलगेट घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दात घासण्यासाठी जितके कोलगेट घेतो तितकेच कोलगेट आपल्याला या उपायासाठी त्या ब्रशवर घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या कोलगेट ने आपल्याला चांदीची वस्तू किंवा जो चांदीचा दागिना आपण लिंबूनि स्वच्छ केला होता तो या कोलगेट ने ब्रशच्या मदतीने व्यवस्थितपणे घासून घ्यायचा आहे.
मित्रांनो पाच ते दहा मिनिटे तुम्हाला या ब्रशने ती वस्तू व्यवस्थितपणे घासून घ्यायचे आहे. तर मित्रांनो कोलगेट ने ही वस्तू घासल्यानंतर आपल्याला एक दहा मिनिट ही वस्तू अशीच ठेवायची आहे आणि दहा मिनिटानंतर आपल्याला त्या वस्तूला पाण्याने धुवून घ्यायची आहे. मित्रांनो आता या वस्तूला धुवून घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा ब्रशने घासत घासतच ही वस्तू स्वच्छ करून घ्यायची आहे.
तर मित्रांनो फक्त हा उपाय करताना आपल्याला या दोनच कृती करायचे आहेत. मित्रांनो सर्वात आधी आपल्याला लिंबूनि ती वस्तू घासून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला कोलगेटच्या सहाय्याने ती वस्तू घासून घ्यायचे आहे. अशा दोन कृतीमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही केव्हाही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
यामुळे तुमची जी चांदीची वस्तू आहे किंवा चांदीचा जो दागिना आहे किंवा चांदीचे देव आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या देवघरांमध्ये असतात तेही घासण्यासाठी तुम्ही या उपायाचा वापर करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो कोणतीही केमिकल न वापरता आपण हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये कमी खर्चामध्ये केलेला आहे तर असा हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.