मित्रांनो, अनेकदा एका ठिकाणी जास्त वेळ बसल्याने आपल्या हाता पायांना मुंग्या येतात परंतु हाता पायांना मुंग्या येणे हे काही चांगले लक्षण नाही. जर तुमच्या हाता पायांना देखील वारंवार मुंग्या येत असेल, हातापायाचे अवयव सुन्न पडत असतील तर या सगळ्या लक्षणांना चुकून देखील दुर्लक्ष करू नका. अन्यथा भविष्यात तुम्हाला वेगवेगळ्या नसांचे आजार होऊ शकतील. बहुतेक वेळा नसांमधील रक्त प्रवाह सुरळीत न झाल्याने नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. हातापायांना सूज येते. हातापायांची बोटे वाकडी होतात आणि परिणामी रक्तप्रवाह न झाल्याने व्हेरिगोन यासारखे आजार देखील उद्भवतात.
मित्रांनो जर तुमच्या बाबतीत देखील या सगळ्या घटना घडत असतील तर आत्ताच सावध व्हा. त्याचबरोबर अनेकदा आपण छोट्या-मोठ्या बदलांकडे लक्ष देत नाही. अनेकांना वाताच्या समस्या त्रास देत असतात आणि जर एखाद्या व्यक्तीला वात समस्या मोठ्या प्रमाणावर सतावत असेल तर सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी अशा विविध समस्या एकामागे एक उभ्या राहतात. अशावेळी नसांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत असले तर तुमच्या हातापायांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ शकणार नाही. आपल्यापैकी अनेक जण दिवसभर बाहेर काम करतात आणि यामुळे पायांना थोडासा देखील आराम मिळत नाही.
काहीजण एकाच ठिकाणी उभे राहून काम करतात आणि संपूर्ण शरीराचा भार पायांवर पडतो. अशावेळी नसामध्ये रक्तप्रवाह देखील सुरळीत होत नाही म्हणूनच अनेकदा डॉक्टर घरी गेल्यावर आपले पाय गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने शेकायला सांगतात. यामुळे आपल्या शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो. बहुतेक वेळा रक्त एकाच ठिकाणी जमा झाल्याने रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. रक्त काळे पडते आणि या सर्वांचा परिणाम हातापायांच्या तळव्यांना देखील होत असतो. बहुतेक वेळा हातांना देखील गुठळ्या निर्माण होतात आणि म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलेलो आहोत.
आपल्या पायांचे आरोग्य मजबूत राखण्यासाठी आपल्याला जाडे मीठ वापरायचे आहे. जाडे मीठ आपल्याला बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. तसेच जर तुमच्याकडे जाडे म्हणजेच खडे मीठ नसेल तर अशावेळी बारीक मीठ देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एप्पल साइडर विनेगर देखील उपयोगी ठरते. आपल्यापैकी अनेकजण साइडर विनेगर सेवन देखील करतात. आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा एप्पल विनेगर मिक्स करून सेवन करायचे आहे. असे केल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढेल व तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचे हाडांचे आजार होणार नाही आणि हाडे अगदी मजबूत बनतील.
जर तुमच्या शरीरातील हाडे ठिसूळ झालेले असतील तर हाडांचे सर्व विकार दूर होतील. त्यानंतर आपल्याला आपल्या पायांच्या नसा जर मोकळ्या करायचे असतील तर तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या कोमट पाणी तयार करायचे आहे. ते कोमट पाण्यामध्ये आपल्याला पाय बुडवून घ्यायचा आहे. त्या पात्रामध्ये आपल्याला जाडे मीठ म्हणजेच खडा मीठ टाकायच आहे. त्यानंतर एप्पल साइडर विनेगर व लिंबूचा रस मिक्स करायचे आहे आणि आपले पाय त्याच्यामध्ये बुडवून अर्धा ते एक तास आपल्याला शेक घ्यायचा आहे.
मित्रांनो असे केल्याने हाता पायाच्या नसा तुमच्या मोकळ्या होतील व त्यानंतर पाय स्वच्छ पाण्यात कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल आपल्या पायांना लावून हलकासा मसाज करायचा आहे. असे केल्यानंतर आपले पाय मोजे मध्ये टाकून ठेवायचे आहेत. यामुळे उष्णता निर्माण होईल. तुमच्या शरीरातील ज्या नसा आहे त्या मोकळ्या होतील. नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यामध्ये मदत होईल. अशाप्रकारे तुम्ही हा उपाय जर रात्री देखील केला तरी तुम्हाला सकाळी उठल्यावर त्वरित फरक जाणून येईल. म्हणूनच पायाच्या नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय आवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.