मित्रांनो, श्रावण महिना हा भक्तीभावाचा महिना समजला जातो. कारण या महिन्यात नागपंचमी, गोकुळ अष्टमी असे सण असतात. श्रावण सोमवार उपवास बरीच लोक करतात. या दिवसात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. निसर्ग हिरवाईने नटलेला असतो. वातावरण आल्हाददायक असत. म्हणूनच की काय श्रावण महिना भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा अतिशय प्रिय आवडता असा महिना आहे. या महिन्यांमध्ये केलेली शिवशंकराची पूजा माता पार्वतींची पूजा फलदायी ठरते. म्हणजेच अशी पूजा केल्यामुळे भोलेनाथ आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात. महादेवांचा कृपाशीर्वाद लगेच प्राप्त होतो.
मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांच्या मंदिरातून अशी कोणती वस्तू आपल्या घरी घेऊन यावी की जेणेकरून आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग खुले होतील. याच वस्तूबद्दल माहिती आज सांगणार आहोत.
मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट असतात अनेक प्रकारच्या समस्या असतात. कष्ट असतात आणि या कष्टातून, संकटापासून मुक्ती देण्याचं काम शिव मंदिरातून आणलेल्या वस्तूमुळे होते. या वस्तू आपण जर या श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण महिना संपण्यापूर्वी जर आपल्या घरामध्ये आणली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये शांती निर्माण होते. प्रसन्न आणि आनंदी वातावरण निर्माण होतं. घरातील कटकटी संपतात. घरातील सदस्य जर एकमेकांशी भांडत असतील विनाकारण घरामध्ये जर कटकटी होत असतील तर त्या थांबतात. उद्योग व्यवसाय नोकरी धंदा यातील अडलेली काम पूर्ण होऊ लागतात. आपलं नशीब आपलं आपल्याला साथ देऊ लागत.
मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आपण करू नये. कारण या दिवसात पक्षी प्राण्यांना संसर्गजन्य रोग होण्याचीच शक्यता जास्त असते आणि आपण जर याच सेवन गेल तर आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो. श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे. भक्तीभावाचा व्रत वैकल्याचा महिना आहे आणि भोलेनाथांना माता पार्वतींना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ काळ समजला जातो.
मित्रांनो या महिन्यामध्ये शिवलिंगावर रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेक ब्राह्मणाकडून किंवा आपण स्वतः सुद्धा अगदी साध्या पद्धतीने करू शकता. यासाठी आपल्याला केवळ एका तांब्यांमध्ये गंगाजल घ्यायचा आहे. तुम्हाला गंगेचं, यमुनेच, सरस्वतीच, नर्मदेच तर पाणी मिळालं तर मित्रांनो अतिशय शुभ होईल. मात्र नसेल तर आपल्या आसपास एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल असा जो काही पाण्याचा पाण्याचा स्त्रोत असेल त्या ठिकाणाहून आपण एक तांब्यावर पाणी घ्यायच आहे. या पाण्यामध्ये फक्त दोन चमचे कच्चं दूध टाकायचं आहे. दुध देशी गाईचेच वापरायचे आहे. कारण देशी गायीमध्ये 33 कोटी देवांचा अस्तित्व हे देशी गायीमध्ये आढळतं. म्हणून मित्रांनो अशा या पवित्र गाईचं फक्त दोन चमचे दूध तांब्यातल्या पाण्यामध्ये टाकून त्याने भगवान शिव शंकरांना रुद्राभिषेक घालायचा आहे. शिवलिंग घरामध्ये असू देत किंवा एखाद्या जवळपासच्या मंदिरात असू देत त्यावरती आपण हे पाण्याने अभिषेक घालणार आहोत. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
मित्रांनो मंदिरातील महादेवाची शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर घरी येताना आपण महादेवाच्या शिवलिंगावर घातलेले थोडेसे भस्म घरी जाताना सोबत घ्यावे. भस्म तेथील पुजाऱ्यांकडून घेतले तरी चालते. घरी आणल्यानंतर हे भस्म एका चांदीच्या डबीत ठेवा. ही डबी आपल्या देवघरात ठेवा आणि मनोभावे पूजा करा. यामुळे 33 कोटी देवांची आशीर्वाद प्राप्त होतील. त्यानंतर ही डबी आपल्या तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी आपले मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणी ठेवा.
मित्रांनो थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या घरी बदल झालेला जाणवेल. तुमच्या घरी धनदौलत येईल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा यायला सुरुवात होईल. अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहील. लक्ष्मीचा वास तुमच्या घरी राहील.
मित्रांनो अजून एक वस्तू आपण आणायची आहे ती म्हणजे त्रिशूल. त्रिशूला मध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. त्यामुळे बाजारातून आपण एक छोटा चांदीचा त्रिशूल किंवा आपल्याला शक्य असेल तर मोठाही चांदीचा त्रिशूल घेऊ शकता. हा त्रिशूल रुद्राभिषेक करताना शिवलिंग जवळ ठेवावा. यामुळे तो सिद्ध होईल किंवा इतर वेळी सुद्धा चांदीचा त्रिशूल बाजारातून विकत आणा आणि तो महादेवांच्या चरणाशी किंवा शिवलिंगावर ठेवून त्याची पूजाअर्चा करा आणि मग घरी आणा. घरी आणल्यानंतर देव्हाऱ्यात त्याची मनोभावे पूजा करा. यामुळे 33 कोटी देवांचे आशीर्वाद लाभतील. असा हा त्रिशूल तुम्ही देव्हाऱ्यात ठेवा किंवा इतर कुठेही स्थापित करा किंवा तिजोरीत तुम्ही ठेवला तरी चालेल किंवा तुमच्या मौल्यवान वस्तू ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी ठेवा.
मित्रांनो भस्म आणि त्रिशूल या दोन्ही गोष्ट घरी स्थापित केल्यामुळे तुम्हाला धनाची कमतरता कधीच भासणार नाही. घरात धनधान्याची बरकत होईल. त्यामुळे घरात शांतता आणि आनंद प्रस्थापित होईल. दोन्ही गोष्टी शक्य होत नसतील तर भस्म किंवा त्रिशूल कोणत्याही एका गोष्टीचे आपल्या घरी स्थापित करा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.