मित्रांनो आपण मनोभावे स्वामींची भक्ती सेवा करीत असतो. खूप सारे अडचणी आपल्या जीवनात असल्या तरीही स्वामी आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात. आपल्याला मार्ग दाखवत असतात. मित्रांनो बरेच जण स्वामींचे अगदी मनोभावे श्रद्धांजली सेवा करतात आणि अशा भक्तांना स्वामी आपली प्रचिती देत राहतात. तर मित्रांनो असाच मी एक अनुभव तुम्हाला उल्हासनगर येथील अस्मिता लहानगी यांचा सांगणार आहे. तर मित्रांनो हा अनुभव ताईंचा खूपच डोळ्यांमध्ये पाणी आणणार आहे.
तर आज आपण त्यांना आलेली प्रचिती स्वामींचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया स्वामींचा अनुभव या ताईंना कसा आला ते आणि तेही त्यांच्याच शब्दात.
नमस्कार मी अस्मिता लहानगी मी उल्हासनगर येथे राहते. आमचे मूळ गाव बीड होते. परंतु सासरे आमचे उल्हासनगर मध्ये स्थायिक झाले होते. कारण तेथे आमचे दुकान होते कपड्याचे. मग तेव्हापासूनच आम्ही तिथेच वास्तव्यास होतो. माझ्या लग्नाला पंधरा वर्षे झाली. प्रत्येक मुलगीला लग्नानंतर खूप साऱ्या अपेक्षा असतात. खूप सारी स्वप्ने पाहत असतात.
परंतु माझे तसे काहीच झाले नाही. कारण फक्त लग्नानंतर दोन वर्षे माझे सुखाचे गेले आणि त्यानंतर खूपच जीवनामध्ये त्रास सहन करावा लागला. कारण दोन वर्षानंतर माझे मिस्टर मला खूपच त्रास द्यायला लागले. माझ्या मिस्टरांना दारू पिण्याचे व्यसन लागले.
ते दररोज मला मारत असत. त्यावेळेस मला खूपच रडायला यायचे. काय करावे हे काही सुचत नसायचे. मला दोन मुले आहेत. तरी देखील माझे मिस्टर त्या मुलांकडे अजिबात लक्ष देत नव्हते. आपल्या मुलांना ते आपलेसे देखील करत नव्हते. त्यावेळेस मला खूपच टेन्शन येत होतं. तसेच रडूही येत होतं.
काही लोकांकडून नंतर कळालं की, माझे मिस्टर हे वाईट संगतीला म्हणजेच त्यांचे बाहेर अफेअर चालू आहे. त्यावेळेस तर माझी पायाखालची जमीनच सरकली. काय करावे काहीच सुचत नव्हते. माझी आई स्वामींची खूपच भक्त होती. परंतु मी कधीही स्वामींची सेवा कोणतीच केली नाही.
कारण माझा त्यांच्यावरती एवढा विश्वास ही नव्हता आणि त्याकडे मी कधी लक्षही दिले नाही. परंतु एवढी दुःख आल्यानंतर मात्र मला फक्त स्वामींची सेवा करावी असे वाटायला लागले. मला बऱ्याच वेळा मिस्टरांचा देखील खूपच राग यायचा आणि सर्व काही सोडून जावे असे वाटायचे.
परंतु माझ्या दोन मुलांकडे पाहून मी तिथेच राहिले. सर्व काही त्रास सहन करत होते. नंतर माझ्या मनात आले की आपणही स्वामींची सेवा करावी आणि आपल्या या दुःखातून स्वामी आपणाला बाहेर काढतील का हे पहावे. नंतर मी अकरा गुरुवारचे व्रत करण्यास सुरुवात केली.
परंतु ज्या वेळेस मी अकरा गुरुवरचे व्रत चालू करण्याचा संकल्प केला. पहिल्याच गुरुवारी मात्र माझ्या मिस्टरांनी मला डिवोस देण्याचे ठरवले आणि नोटीस देखील कोर्टातर्फे पाठवली .हे पाहून मला खूपच वाईट वाटले त्यावेळेस मी स्वामींना खूपच रागाने बोलले. स्वामी महाराज मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला परंतु मला पहिल्याच गुरुवारी तुम्ही असे का दुखावले.
मी अगदी मनोभावे तुमची सेवा करणार आहे परंतु तुम्ही माझ्या जीवनात खूपच दुःख देत आहात. मला या दुःखातून तुम्हीच बाहेर काढायचे आहे. मला फक्त आता तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही यातून काहीतरी मार्ग दाखवा. यानंतर मी स्वामींची सेवा वगैरे केली.
दुसऱ्याच गुरुवारी मी व्रत करून स्वामींसमोर हात सोडून प्रार्थना केली. असा काही मला संकेत द्या ज्यामुळे मला कळेल की तुम्ही माझ्या पाठीशी आहात अशी काही प्रचिती मला द्या .मग त्यावेळेस एवढेच बोलून मी स्वामीना नमस्कार केला. खूप दिवसभर मला खूपच टेन्शन आलं होतं.
कारण मला कोर्टामध्ये देखील हजर राहायचे होते. नंतर संध्याकाळी ज्या वेळेस मी तुळशीपाशी दिवा लावण्यास बाहेर गेले त्यावेळेस एक साधू माझ्या घराजवळ आले. बऱ्याच वेळा सकाळीच आमच्याकडे साधू भिक्षा मागण्यासाठी येत होते. परंतु संध्याकाळी त्यावेळेस एक साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते.
मग त्यावेळेस मी माझ्या हातामध्ये जेवढे पैसे येतील तेवढेच पैसे मी दिले आणि नमस्कार केला. तेवढ्यातच माझे मिस्टर आले साधूवर त्यांचा विश्वास वगैरे अजिबात नव्हता. साधूनी मिस्टरांना घराबाहेरच थांबवलं आणि हात पुढे करण्यास सांगितले आणि त्यांच्या हातामध्ये एक दगड ठेवला.
नंतर ती मूठ झाकायला लावली आणि थोड्यावेळाने ती मूठ उघडायला सांगितले. परंतु त्या मुठीमध्ये एक रुपयाचे नाणे झालेले होते. त्यावेळी साधू मिस्टरांना म्हणाले की पत्नी आपल्या घराची लक्ष्मी ही आपली लक्ष्मी असते. तिला योग्य ते स्थान द्यायला हवे. तिचा आदर करायला पाहिजे.
एवढेच साधू म्हणाले मी एकदम पाहतच राहिले. नंतर मी साधू महाराजांना चहा पिण्या साठी आत बोलावलं आणि चहा करण्यासाठी मी आत आले. नंतर माझे मिस्टर हे साधूंच्या बोलण्याने स्तब्धच राहिले आणि माझ्या मिस्टराचा स्वभाव चिडचिडा होता. पण ते एकदम शांत साधूंच्या समोर उभे होते. त्यांनी साधूना नमस्कार केला आणि आत आले.
खुर्ची पुसून साधू महाराजांना बसण्यासाठी बोलणार तेवढ्यातच साधू महाराज कुठेतरी गायब झाले होते. त्यानंतर आम्ही दोघांनी आसपास चौकशी केली तरीही कुणाच्याही घरी असे साधू महाराज आलेले नाहीत असे आम्हाला कळले. मग त्यावेळेस आम्ही समजून गेलो की हे स्वामी महाराज होते.
तेव्हापासून माझ्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये खूपच फरक पडला. त्यांनी मला पत्नीचा दर्जा दिला आणि जी काही नोटीस वगैरे होती ती सर्व परत घेतली आणि आता आमचा खूपच सुखाचा संसार चालला आहे. माझ्या मिस्टरांचे दारूचे व्यसन होते ते पूर्णपणे निघून गेले म्हणजेच ते दारू पीत होते त्यांनी दारू प्यायची बंद केली.
तसेच त्यांचे जे काही अफेअर होते ते देखील त्यांनी तोडले आणि आता आमचा खर तर सुखाचा संसार आहे. मला खरंच त्यावेळेस डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला काही करावं काहीच सुचत नव्हते. परंतु स्वामी महाराजांनी मला अडचणीतून बाहेर काढलं आणि हा अनुभव जेव्हाही मला आठवतो त्यावेळी मला खूपच अंगावर शहारे येतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.