मित्रांनो, अनेक वेळा अती क्रीम्स चा वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर काळे डाग दिसायला लागतात. केमिकलयुक्त पदार्थ क्रीम्समधे असल्यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे डार्क स्पॉट्स अर्थात काळे डाग काढून टाकण्यासाठी बर्याच प्रकारची उत्पादने बाजारात आहेत. परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. मात्र, आपण घरगुती उपाय करून आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर करू शकतो.
मित्रांनो, आपण चेहऱ्यावरील वांगाचे डाग आणि काळे डाग कसे घालवायचे हे बघणार आहोत. प्रत्येकाला आपला स्वतःचा चेहरा डागविरहित आणि सुंदर असावा असे वाटते. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा सुंदर आणि स्वच्छ दिसावा यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मित्रांनो बऱ्याच वेळा हार्मफुल केमिकलच्या वापरामुळे त्वचा सुंदर दिसण्या ऐवजी विद्रूप आणि खराब दिसू लागतो. वांगामुळे तुमचा चेहरा वय वाढण्याआधीच जास्त वयस्कर वाटू लागतो. तर यासाठीच आज चेहरा टवटवीत दिसण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आपण बघणार आहोत.
हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग आणि काळे डाग तर नष्ट होतीलच पण चेहर्यावर एक अतिशय तेजस्वी चमक येईल. कितीही वय वाढले तरी तुम्ही तरुण दिसाल. असा हा प्रभावी उपाय करण्यासाठी पहिला घटक घेणार आहोत बदाम. मित्रांनो बदाम आपल्या चेहर्यासाठी जास्त फायदेशीर असतात. बदामामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते बदामामुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग पूर्णपणे नष्ट होतात. तसेच बदामामुळे चेहर्याचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावर चमक येते तर असे हे चार बदाम सकाळी पाण्यात भिजत ठेवायचे आहे.
रात्री पाण्यातून काढून बदाम सोलून घ्यायचे आहे. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे. बारीक पेस्ट करून घ्यायची. यात दुसरा घटक टाकणार आहोत मध. मधामुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग नष्ट होतात. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डागही नष्ट होतात आणि त्याचबरोबर त्वचेचा रंग उजळण्यासाठी मधाचा खूप उपयोग होतो. एक चमचा मध बदामाच्या पेस्टमध्ये टाकायचे आहे. नंतर आपण घेणार आहोत दूध. दुधामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. दुधामुळे त्वचा घट्ट बनते. अर्धा चमचा दूध आपल्याला त्या मिश्रणात टाकायचे आहे.
हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहर्यावर लावायचे आहे. चेहऱ्यावर ज्याठिकाणी वांगाचे डाग असतील त्या ठिकाणी या मिश्रणाने हळुवार मसाज करायचा आहे. मित्रांनो याने अपल्याला साधारण पाच मिनिटांपर्यंत मसाज करायचा आहे आणि त्यानंतर हे मिश्रण चेहर्यावर रात्रभर तसेच राहू द्यावे आणि सकाळी नॉर्मल पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो अशा या घरगुती उपायामुळे तुम्हाला तीनच दिवसात फरक अनुभवायला मिळेल.
त्याचबरोबर मित्रांनो बदाम मध्ये असलेले पोषक घटक मानवी शरीराला खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स चे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. बदाम देखील ड्रायफ्रुट्स मधला एक अविभाज्य भाग आहे आणि याचेमोठ्या प्रमाणात सेवन देखील केले जाते. तसेच अनेक आहारतज्ञ बदामचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात. बदाम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच यामुळे नानाविध विकार होण्यापासून वाचले जाऊ शकते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.