मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना शरीरात असणाऱ्या अतिरिक्त चरबीचा त्रास होत असतो आणि त्याचबरोबर शरीरावर चरबीच्या गाठी ही तयार होत असतात. मित्रांनो यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकांना काही आजारांमुळे तर बऱ्याच जणांना चुकीच्या जीवनशैलीमुळे यांसारखे त्रास होत असतात. परंतु मित्रांनो जर आपल्या शरीरावर जर अशा प्रकारच्या चरबीच्या गाठी, अतिरिक्त चरबीची समस्या होत असेल तर अशा वेळी आपल्यातील बरेच जण आपल्या घरामध्ये घरगुती उपाय करत असतात. आणि त्याद्वारे त्यांच्या शरीरावर असणार्या चरबीच्या गाठी किंवा अतिरिक्त चरबी घालवण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतु मित्रांनो, कितीही उपाय केले तरीही त्यांना त्यामध्ये यश मिळत नाही आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे महागडी औषधे घेऊन देखील त्यांची ही समस्या दूर होत नाही. तर मित्रांनो अशा वेळी आपल्या घरांमध्ये एक सोपा उपाय आपण जर केला तर यामुळे आपल्या शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी कमी होईलच आणि त्याच बरोबर शरीरावर असणारे चरबीच्या गाठी पासून ही आपली सुटका होईल. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जास्त खर्च देखील करावा लागणार नाही आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये आपण हा उपाय आपल्या घरामध्ये अगदी सहजरित्या करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे ते.
अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशन द्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात. त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की, या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा घरगुती उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.
तर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोन ते तीन पदार्थांपासून अगदी घरीच सोप्या पद्धतीने करू शकतो. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिले पहिला पदार्थ जो लागणार आहे तो म्हणजे आंबेहळद. मित्रांनो आंबेहळद ही कोणत्याही मेडिकलच्या किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल. मित्रांनो ऑलिव्ह ऑइल हे मेडिकलच्या दुकानांमध्ये किंवा किराणा मालाचे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतं. तिथून आपण हे तेल घेऊन यायचं आहे आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये आधीपासूनच हे तेल उपलब्ध असेल तर तुम्ही या उपायासाठी याही तेलाचा वापर करू शकता.
तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी एक ते दोन चमचा आंबेहळद एका वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाकायचा आहे. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपी जाणार आहात त्यावेळी ही जी पेस्ट तयार झालेली आहे याने तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी चरबीच्या गाठी उठलेले आहेत त्या त्या ठिकाणी हळुवारपणे बोटाच्या साह्याने मसाज करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ही पेस्ट तुमच्या गाठीवर रात्रभर ठेवून द्यायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ करत असताना धुवून घ्यायची आहे.
तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला हा एक छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या शरीरावर असणाऱ्या चरबीच्या गाठी दूर होतीलच. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला डॉक्टरांनी जी पथ्ये सांगितलेले आहेत तेही तुम्हाला पाळायचे आहेत. मित्रांनो डॉक्टरांनी सांगितलेली सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितपणे पाळली आणि त्याचबरोबर हा एक छोटासा घरगुती उपाय तुम्ही नियमितपणे करत राहिलात तर तुमच्या शरीरावर असणाऱ्या गाठी लवकरात लवकर निघून जातील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.