आपल्या वाईट वेळेमध्ये या दहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो ?

Uncategorized

 

मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवर कोणतीतरी वाईट वेळ आली किंवा त्याच्यासोबत काही वाईट घडू लागले तर त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार येतात आणि त्या वाईट विचारून मुळे त्याच्या जीवनावर देखील खूप मोठा परिणाम पडत असतो. आपल्यावर जर वाईट येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मनामध्ये चांगले विचार असणे खूप गरजेचे आहे. म्हणून नेहमी वाईट वेळ मध्ये चांगले विचार करणे खूप गरजेचे आहे. यातीलच काही चांगले विचार आजच्या लेखांमध्ये आपण घालून घेणार आहोत.

 

1. काही लोक चप्पला सारखी असतात, साथ तर देतात, पण मागून चिखल सुद्धा उडवतात.

2. नेहमी लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्ही कमवू शकता, ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा.

3. डोळे तुम्हालाच उघडावे लागतात, प्रकाश पाहण्यासाठी. कारण सूर्य फक्त उगवला म्हणून उजेड होत नाही.

4. सत्य हे पाण्यात पडलेल्या एक थेंब तेलासारख असतं, कितीही असत्यच पाणी त्याच्यावर टाकलं तरीही ते पाण्याच्या वरच तरंगत.

 

5. तुमच्या दुःखाच समाधान तुम्हालाच शोधावं लागेल. कारण आजच्या जगामध्ये दुसऱ्यांच्या दुःखांना ऐकणारी आणि समजणारी लोकं खूप दुर्लभ झालेली आहेत.

6. कधी कधी वाईट-वेळ ही तुमच्या आयुष्यात चांगले लोक येण्यासाठीच आलेली असते.

7. यश मिळवायचं असेल तर नशिबापेक्षा मेहनतीवर विश्वास ठेवा.

 

8. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका, कारण प्रत्येक गोष्ट स्वतःच्या चुकीमधून शिकण्याचावेळ आपल्याकडे नसतो.

9. आपल्या आयुष्यात अडचणी उगाचच येत नाहीत, त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो, की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणे गरजेचे आहे. फक्त आपण दुःखी न होता त्या इशाराला ओळखलं पाहिजे.

 

10. जसं सुख कायम नसतं, तसचं दुःखही कायम नसतं, त्यामुळे वाईट-वेळेमध्ये संयम ठेवावा.

11. जेव्हा लोक तुम्हाला एखाद्या निर्णय घेण्यापासून मागे खेचत असतील, तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की, मी गर्दी पेक्षा थोडा वेगळा विचार करत आहे.

12. कॅलेंडर नेहमी तारखा बदलत, पण एक वेळ अशी येते की ती पूर्ण कॅलेंडरच बदलून टाकते.. त्यामुळे वाट पहा, वेळ प्रत्येकाचीच बदलते.

13. सफल होण्यासाठी चागल्या मित्रांची गरज असते. परंतु, खूप जास्त जर सफल व्हायचं असेल तर चांगल्या शत्रूची गरज असते.

 

14. चांगलेपणा हा आपल्यात नाही, तर आपल्या पाहण्यामध्ये असतो. कारण असं कसं काय शक्य आहे? की, एकच व्यक्ती काही लोकांना खूप चुकीची वाटू शकते, परंतु तिचं व्यक्ती काही लोकांना समजदार, बरोबर वाटते.

 

15. मजबूत व्यक्तीकडे पाहून लोकांना वाटतं की, हा तुटत कसा काय नाही?? परंतु लोकांना हे माहीत नसतं, की तुटल्यामुळेच हा व्यक्ती इतका मजबूत झालेला आहे.

16. लोकांच्या बोलण्यामध्ये असलेल्या गोडव्या वरून आपण कधीही लोकांचं मन ओळखू शकत नाही. कारण मोराला पाहून कोणालावाटेल का, की मोर साप खातो.

17. आयुष्यामध्ये नेहमी शांत रहा, तुम्हालातुम्हाला स्वतःला खूप मजबूत असल्यासारखं वाटेल. कारण लोखंड जेव्हा थंड असतं, तेव्हा खूप मजबूत असतं. पण जेव्हा लोखंड गरम असतं, तेव्हा मात्र कोणीही त्याचा आकार बदलू शकतो. त्यामुळे जेव्हा राग येईल तेव्हा शांत रहा.

18. कधी-कधी आपण चुकीचे नसतोच, परंतु त्यावेळेस आपल्याजवळ ते शब्द नसतात, जे आपण बरोबर असल्याचा पुरावा देतात.

19. कधीतरी एकट्याने बसून विचार करा, आणि चिंतन करा…. की आपण नसल्यावर कोणाला सगळ्यात जास्त फरक पडेल आणि ज्याला फरक पडत असेल त्याच्यासाठीजगा.. बाकी सगळ्याना त्यांच्या नशिबावर सोडा, विश्वास ठेवा असं केल्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होईल..

 

20. पैशाने तर फक्त तेच मिळत, जे विकायला ठेवलेलं असतं.

21. कोणालाही दुःख देऊन, माफी मागणं खूप सोपं असतं.. पण स्वतःला दुःख झाल्यावर, दुसऱ्यांना माफ करणं तितकंच अवघड असतं.

22. आयुष्यामध्ये जर काही “चांगला विचार” करायचा असेल, तर सगळ्यात आधी लोकांविषयी वाईट विचार करण सोडून द्या.

23. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणतात, ते लोक हे मात्र विसरतात की, त्यांच्याजवळ सुद्धा दोन डोळे आहेत.

24. समोरच्याला कमीपणाच्या भावनेने तेच लोक पाहतात, ज्यांना स्वतःच्या मोठेपणावर विश्वास नसतो.

25. दोन चेहरे माणूस कधीही विसरत नाही. एक त्याला अडचणीत साथ देणारा, आणि दुसरा त्याला अडचणी मध्ये सोडून जाणार.

 

26. जर तुम्हाला मेहनत करूनही सफलता मिळत नसेल, तर रस्ते बदला सिद्धांत नाही. कारण झाड पण पान बदलते मूळ नाही.

27. सापाच्या दातामध्ये, विंचूच्या डंक मारण्यामध्ये, आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड असत.

 

28. पुढे जाणाऱ्या व्यक्ती कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळे आणत नाहीत, आणि जो दुसऱ्यांच्या मार्गांमध्ये अडथळे आणतो, तो कधी पुढे जाऊ शकत नाही.

29. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट वेळ, वाईट घटनांनी भरलेली पाने येतात. तेव्हा पुस्तक बंद न करता.. पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी.

30. जी माणसं अजूनही तुमची परीक्षा तुमच्या भूतकाळावरून करत आहेत, त्यांना तुमच्या भविष्यामध्ये अजिबात जागा देऊ नका.

31. लोकांचा फार जास्त विचार करू नका.. कारण ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर लोक “हसतात” औणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर “जळतात”.

 

32. जेव्हा तुमच्या सोबत कोणीही नसतं, तेव्हा फक्त ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की, आयुष्यातील काही कठीण प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावे लागणार आहेत.

33. स्वतःला असं बनवा की जरी तुम्हाला कोणी hurt केलं तरी सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे.

 

34. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टी करणाची अजिबातच गरज नसते.

35. अशक्य अस या जगामध्ये काहीच नाही.. फक्त त्यासाठी तुमच्या मध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी.

 

अशाप्रकारे हे काही चांगले विचार आहेत. जे आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही देखील हे विचार नक्कीच तुमच्या लक्षात ठेवा. त्याच्या तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *