तुमचाही जन्मवार शनिवार आहे का? असेल तर नक्की बघा? जन्मवार शनिवार गुण, अवगुण, स्वभाव, आजार इत्यादी… ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपला ज्योतिष शास्त्र मध्ये व्यक्ती जन्माला आल्यापासूनच त्याचे गुण, आवगुण स्वभाव इत्यादींची माहिती सांगितली जाते. ती त्याच्या जन्मलेल्या वारानुसार, नक्षत्रानुसार व राशिफला अनुसार सांगितले जाते. आजच्या या लेखांमध्ये आपण ज्यांचा जन्म शनिवारच्या दिवशी होतो. अशा लोकांविषयी माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये त्यांचे मध्ये गुण कोणते असतात? त्यांचे स्वभाव कसा असतो? त्यांचे दोष कोणकोणते? अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

ज्यांचा जन्म शनिवारच्या दिवशी होतो अशा व्यक्तींवर शनी देवाचा प्रभाव असतो. व्यक्ती शांत असते. गंभीर असते. एकांतपणा त्या व्यक्तींना खूप आवडतो. गंभीर असे व्यक्तिमत्व असते. सहनशील असतात. त्याचबरोबर थोडे आळशी देखील असतात. अशा व्यक्तींना राग हा लवकर येत नाही. ठराविक मर्यादेपर्यंत ते आपल्या रागावत कंट्रोल करत असतात. जर समोरचा व्यक्ती ऐकतच नसेल तर ते त्यांचा राग बाहेर काढतात. त्याचबरोबर व्यक्ती ही संकोच करणाऱ्या असते.

 

एखादी गोष्ट समोरच्याला सांगावे की ना सांगावी असा संकोच करत राहतात आणि त्यामुळे त्यांना अनेक कामे येत असताना देखील त्या कामांमध्ये त्यांना संधी घेता येत नाही. ज्या व्यक्तींचा शनिवारी जन्म होतो अशी व्यक्ती खूप हुशार असते. परंतु त्यांच्यात असलेल्या संकोच वृत्तीमुळे त्यांना अनेकदा संधी गमवावी लागते. त्याचबरोबर ही व्यक्ती अतिशय शांत स्वभावाच्या असते. ह्या व्यक्ती कधीही वाईट नसतात. परिस्थिती त्यांना काही वेळेस वाईट बनवते.

 

अशा लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास खूप आवडते. अशा व्यक्ती खूप सेवाभावी असतात. त्यांना इतरांना काय वाटेल याची जास्त काळजी असते. अशा व्यक्ती कोणालाही दुखवत नाही. कोणालाही आपल्या मुखातून अपशब्द बोलत नाही आणि त्यामुळे हे लोक चांगले समाज सुधारक होऊ शकतात. या व्यक्तींना इतरांवर अन्याय झालेला आवडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तींच्या खंबीरपणे मागे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य हे करत असतात.

 

या व्यक्तींना त्यांच्या जीवनामध्ये सहजासहजी अशी कोणतीच गोष्ट मिळत नाही. जर त्यांना एखादी गोष्ट मिळवायचे असेल तर त्यामध्ये खूप कष्ट करावे लागतील. तरच त्यांना ही गोष्ट मिळते. याला अपवाद दोन गोष्टी असू शकतात. परंतु अशा व्यक्तींचा उत्तर अर्ध हा अतिशय सुखाचा असतो. कामामध्ये यांना घाई घाई केलेली आवडत नाही. प्रत्येक काम समजून करायला आवडते.

 

त्याचबरोबर यांच्या शिक्षणामध्ये काही अडथळे देखील येऊ शकतात. परिवारातील प्रत्येक व्यक्तींची यांना खूप काळजी असते. आपल्या घरासाठी वाटेल ते काम हे करण्यास तयार असतात. यांना चेष्टा मस्करी केलेली चालत नाही. अशी व्यक्ती मी हे काम करू शकतो. मी हे करीन. अशा मताचे असतात आणि त्यामुळे ते संतगतीने का होईना आपल्या देहापर्यंत नक्कीच पोचतात.

 

अशी व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये प्रचंड यश संपादन करत असते. ज्या व्यक्तीवर हे लोक प्रेम करतात अशा व्यक्तीशी ते खूप एक निष्ठ असतात. त्या व्यक्तीला काहीही कमी पडू देत नाही. घरामध्ये एखाद्या टेन्शन चालू असेल तर ही व्यक्ती आपल्यावर वडून घेते व त्यात टेन्शनचा पुरेपूर विचार करू लागते. अशा व्यक्तींना लहान मुले खूप आवडतात. लहान मुलांवर अतिशय प्रेम करतात.

 

शनिवारी जन्मणारी व्यक्ती जर एखाद्यावर रागावली तर त्या व्यक्तींवर राग ते दीर्घकाळ ठेवत असतात. अगदी पाच पाच सहा वर्षात ते त्या व्यक्तीचे तोंड देखील बघत नाहीत. अशा व्यक्ती खूप भाऊक असतात. जर एखाद्याने त्यांना एखादी गोष्ट बोलली तर त्याचा विचार तर खूप दिवस करत बसतात.

 

अशा प्रकारे शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींचे गुण,दोष यांची माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेतलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *