मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच. घरातील महिला या तुळशीची पूजा करीत असतात. तुळशीला जल अर्पण करीत असतात. तसेच सकाळ संध्याकाळ तुळशीपाशी दिवा देखील प्रज्वलित करीत असतात. तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शास्त्रामध्ये तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तुळस ही खूपच फायदेशीर ठरते. अशी ही तुळस काही वेळेस सुकलेली पाहायला मिळते. परंतु ही सुकलेली तुळस हिरवीगार करण्यासाठी आपणाला काय करायला हवे याची सविस्तर आज मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. शक्यतो करून तुळस ही सुकलेली असते याची कारणे म्हणजेच आपण खूप जास्त पाणी तुळशीला घालतो.
म्हणजेच अनेक जण हे आपल्या घरातील एका कलशाने जर तो कलश मोठा असेल तर त्या कशातील पाणी आपण तुळशीला पूर्णपणे घालतो. हे अतिरिक्त पाणी झाल्यामुळे देखील आपली तुळस ही सुखते.जर कलश मोठा असेल तर तुम्ही थोडेसेच पाणी तुळशीला घालायचे आहे आणि बाकीचे पाणी इतर झाडांना तुम्ही घालू शकता. तसेच बरेच जण हे तुळशीला मंजिरी आल्यानंतर तशीच ठेवतात. तर तुम्ही तसे न करता ती मंजिरी असते ती कट करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपल्या तुळशीची वाढ होईल.
अशी ही मंजिरी कट केलेली असते ही मंजिरी म्हणजे तुळशीच्या बिया तुम्ही इतर कुंडीमध्ये टाकू शकता. यामुळे नवीन तुळशीची रोपे उगवू शकतात. तर वरचेवर मंजिरी आल्यानंतर तुम्ही ते कट करायचे आहे. यामुळे तुळशीची वाढ नक्कीच होईल.
मित्रांनो ज्या मंजिरी असतात या मंजिरी हिरवीगार न घेता तुम्हाला सुकलेल्या मंजिरी घ्यायच्या आहेत आणि त्या इतर मातीमध्ये टाकायचे आहेत यामुळे देखील तुम्हाला तुळशीची नवीन रोपे तयार होतील. जर तुळस सारखी सुखत असेल तर तुम्ही थोडेफार शेणखत म्हणजेच नकळतपणे तुम्ही शेणखत त्या तुळशीमध्ये घालू शकता. हे देखील तुळशीसाठी खूपच आवश्यक आहे.
तसेच तुम्ही पाणी अधिक प्रमाणात घालणे टाळायचे आहे. कारण जर तुम्ही पाणी अति प्रमाणात घातले तरी देखील तुमची तुळस ही सुकन्यास सुरुवात होईल. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही पाच ते सहा दिवस आड असे पाणी तुळशीला घालायचे आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दोन दिवसांनी पाणी घालू शकता. परंतु तुळशीच्या झाडाला पाणी अति प्रमाणात घालू नये. यामुळे तुमची दारासमोरील तुळस कधीच सुकणार नाही. तर अशा प्रकारे तुळशीची व्यवस्थित जर तुम्ही काळजी घेतली तर घरासमोरील तुळस कधीच सुकणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.