मित्रांनो, आज काल बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर, हातावर, पायावर किंवा मानेवर किंवा कुठेही चामखीळ दिसत आहे. चामखीळ घरच्या घरी काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती सर्वांना करता येणारा उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायाने चामखीळ गळून पडलेलं देखील तुम्हाला समजणार नाही. हा एक सहज साधा उपाय आहे आणि चामखीळ याला मस्सा असेदेखील म्हणतात. जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तसेच अधिक प्रमाणात मांसाहार केल्यामुळे शरीरातील चरबी वाढून छोटे-छोटे गोळे तयार होतात. चामखीळ चेहऱ्यावर, मानेवर, हातावर असे शरीराच्या कोणत्याही भागावर येतात. चेहऱ्यावर किंवा मानेवर चामखीळ असेल तर आपला चेहरा चांगला दिसत नाही.
मित्रांनो, आपल्यातील बरीच लोकं स्कीन स्पेशालिस्ट कडे जाऊन महागडी ट्रीटमेंट घेतात. परंतु आपण आज घरच्या घरी करता येणारा सहज साधा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, या घरगुती उपायाने तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही आणि या उपायाने चामखीळ गळून पडलेले देखील तुम्हाला समजणार नाही. इतका हा सहज साधा उपाय आहे.
यासाठी आपल्याला एरंडेल तेल, कोलगेट, खायचा सोडा या गोष्टी लागणार आहेत. या गोष्टी तर सर्वांच्या घरात सहजच उपलब्ध होतात. काही गोष्टी नसतील तर तुम्हाला बाजारात सहज मिळून जातील.
तर मित्रांनो या तिन्ही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी एकदा वाटीमध्ये थोडेसे कोलगेट काढून घ्यायचे आहे. मित्रांनो आपण दात घासण्यासाठी जितक्या प्रमाणात कोलगेट वापरतो तितक्या प्रमाणात आपल्याला कोलगेट घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा एरंडलाच तेल घ्यायचा आहे.
त्यानंतर त्यामध्ये एक चमचा खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि हे तिन्ही पदार्थ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ज्या ठिकाणी मोस किंवा तीळ किंवा चामकिळ तयार झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बोटाच्या साह्याने ही हळुवारपणे पेस्ट लावून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला ज्याच्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकच्या साह्याने म्हणजेच प्लॅस्टिकच्या कागदाच्या सहाय्याने ती जागा बांधून घ्यायचे आहे म्हणजेच ज्या ठिकाणी आपण पेस्ट लावले आहे ही पेस्ट व्यवस्थितपणे त्या ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला त्यावर प्लास्टिकचा कागद गुंडाळायचा आहे.
त्यानंतर तो कागद व्यवस्थितपणे बांधून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो कागद बांधल्यानंतर ती जागा पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही पेस्ट आपल्याला तशीच त्या ठिकाणी राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला दररोज आपल्या घरामध्ये किमान सात ते आठ दिवसांपर्यंत न चुकता करायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा परिणाम झालेला दिसून येईल. त्याचबरोबर मित्रांनो, हा उपाय अगदी साधा आहे. आयुर्वेदिक आहे.
यासाठी कोणत्याही महागड्या गोष्टी विकत घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या घरी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गोष्टीतून हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जर चामखीळ असेल तर तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा. याचा फायदा तुम्हाला होईल. याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर द्या.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.