11 गुरुवारचा संकल्प केला फक्त 3 गुरुवार झाले आणि स्वामींनी बघा कसे नशिबाचे फासेच पलटवले देशमुख ताईंना आलेला स्वामी समर्थांचा अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त स्वामींची अगदी मनापासून सेवा पूजाच्या आणि भक्ती करत असतात कारण मित्रांनो जर आपण स्वामींची सेवा अगदी मनापासून केली तर यामुळे मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि स्वामी आपल्या पूजेचे फळ आपल्याला नक्कीच देतात. त्याचबरोबर मित्रांनो अनेक वेळा आपण केलेल्या स्वामी सेवेचे किंवा त्याचबरोबर स्वामींच्या भक्तीचे फळ म्हणून स्वामी आपल्यातील बऱ्याच जणांना प्रचिती किंवा अनुभव देखील देत असतात आणि आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींनी असे अनुभव प्रचिती दिली सुद्धा आहे.

तर मित्रांनो आज आपण स्वामींच्या अशाच एका सेवेकरीच्या स्वामी अनुभव म्हणजेच स्वामींनी त्यांना दिलेली प्रचिती पाहणार आहोत. मित्रांनो आज आपण वाशी मधील एका ताईंचा स्वामी अनुभव पाहणार आहोत. तर मित्रांनो चला आता पाहूयात. तर मित्रांनो हा अनुभव देशमुख ताईंचा आहे आणि त्या वाशी येथे राहतात.

तर त्यांचा हा स्वामी अनुभव सांगत असताना त्या आपल्याला म्हणतात की, मी व माझे पती आणि माझा मुलगा असे आम्ही तिघेजण वाशी इथल्या आमच्या घरामध्ये राहतो आणि त्याचबरोबर मला आधीपासूनच स्वामींची सेवा करण्याची आवड होती आणि म्हणूनच दररोज छोटीशी का होईना मी स्वामी सेवा नेहमी करत असते.

माझा जो मुलगा आहे तो लहानपणापासूनच खूपच हुशार आणि अभ्यासू होतो आणि म्हणूनच आम्ही त्याला एक मोठा ऑफिसर किंवा अधिकारी बनवायचं ठरवलेलं होतं.
त्याच अनुषंगाने तो गेली अनेक वर्ष अधिकारी आणि मोठ्या पदाच्या परीक्षा देत होता. तो गेल्या सात ते आठ वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देतच होता.

त्याचबरोबर ज्याही अधिकारी किंवा मोठ्या पदाच्या परीक्षा येत असत खूप प्रयत्न करत होता. परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयशच मिळत होतं. कधी इंटरव्यू मध्ये तर कधी मार्क कमी आणि त्याचबरोबर काही वेळा तांत्रिक गोष्टींमुळे त्याच्या या कामांमध्ये वारंवार अडचणी येत होत्या. तो अभ्यासात आधीपासून खूप हुशार होता. परंतु अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्याचे जे मोठा अधिकारी होण्याचे किंवा मोठ्या पदावर काम करण्याची इच्छा होती ती कायम अपूर्णच राहत होती.

आम्हाला या गोष्टीचे खूपच टेन्शन आलेले होते. दिवस रात्र याच गोष्टीची मला काळजी लागलेली होती. तो वारंवार प्रयत्न करतच होता. त्याने हार मानली नव्हती. परंतु मलाच आतून कसेतरी वाटत होते. मला त्याची खूपच चिंता आणि काळजी होत होती आणि एके दिवशी मी स्वामींच्या केंद्रामध्ये गेले.

तिथे गेल्यानंतर तिथे असणाऱ्या महाराजांना मी याबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या आणि याबद्दल काहीतरी स्वामींची सेवा मला द्या असा मी त्यांना आग्रह केला. त्यानंतर त्यावर ते महाराजांनी मला स्वामींचे अकरा गुरुवार व्रत करण्याचे सांगितले आणि ते मला म्हणाले की स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत केल्यामुळे अनेक स्वामी भक्तांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याचबरोबर अनेकांची स्वप्ने या मुळे पूर्ण झालेले आहेत. तर तुम्हीही तुमच्या मुलासाठी ही एक स्वामी सेवा नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक अनुभव येईल.

तर तिथून पुढे मी स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करण्याचा निर्णय घेतला आणि स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प मी केला आणि त्यानंतर लगेचच गुरुवारच्या वर्गाला सुरुवात केली. तर गुरुवारच्या पहिल्या दिवशी मी माझी स्वामी सेवा आवरली आणि त्यानंतर दुपारच्या वेळी म्हणजेच साधारणतः 12 एकच्या दरम्यान सेवा आवरून मी माझ्या घरामध्ये बसले होते.

तेव्हा आमच्या घरामध्ये दोन-तीन ब्राह्मण महाराजांनी प्रवेश केला आणि त्यांना पाहून मला आश्चर्यच वाटलं. कारण हे जे महाराज होते ते गेली दोन-तीन वर्षांपूर्वी आठवड्यातून किंवा महिन्यातून एक दोनदा तरी आमच्या घरामध्ये घ्यायचे आणि भिक्षा मागायचे. परंतु गेली दोन-तीन वर्षे ते आमच्या घराकडे आलेच नव्हते.

माझ्या मनामध्ये क्षणात विचार आला की, आपण स्वामींचे जे गुरुवारचे व्रत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे आणि हा एक छोटासा स्वामींचा अनुभव आपल्याला मिळालेला आहे असा विचार माझ्या मनामध्ये येऊन गेला. त्यानंतर मी त्या महाराजांना भिक्षा वाढली आणि त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करून त्यांना परत लावून दिले.

अशा पद्धतीने पहिल्या गुरुवारी हा अनुभव मला आला आणि त्यानंतर दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी मी घराच्या बाहेर संध्याकाळच्या वेळी बसले होते आणि त्यातच समोरून दोन बायका जात होत्या. त्यामध्ये एक सासू आणि एक सून होती तर त्या माझ्या ओळखीच्याच होत्या. म्हणजे आमच्या घराजवळच्याच होत्या म्हणून मी त्यांना हाक मारले.

घरामध्ये या असा आग्रह केला. त्यांना घरात बोलल्यानंतर त्यांचाही मी व्यवस्थितपणे पाहुणचार केला आणि त्यानंतर त्यामधील जी सून होती ती माझ्या देव घराकडे बघत मला म्हणाली की तुम्हीही स्वामींची सेवा करत आहोत. मी तर गेली खूप वर्षांपासून स्वामींची सेवा करते.

स्वामींच्या कृपेमुळे आमच्या घरामध्ये काहीही कमी नाही. आमचा संसार हा स्वामींच्या आशीर्वादाने खूपच चांगला सुरू आहे. हे ऐकल्यानंतर मला क्षणभरासाठी खूपच प्रसन्न वाटले आणि स्वामींची सेवा आपल्यासारखे अनेक लोक करत आहेत आणि त्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप बरं वाटलं. तर अशा पद्धतीने असे हे माझे दोन गुरुवार चांगल्या रीतीने संपन्न झाले.

त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी जो काही स्वामिनी मला अनुभव दिला. स्वामींनी माझ्या सेवेचे फळ मला तिसऱ्या गुरुवारीच दिले म्हणजेच तिसऱ्याच गुरुवारी माझ्या मुलाने या अगोदर जो पेपर दिलेला होता म्हणजेच याआधी माझ्या मुलाने जे काही मोठ्या पदासाठी फॉर्म भरलेला होता आणि त्याचा पेपर दिलेला होता. त्याचा रिझल्ट तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी लागला.

त्याला जिल्हा अधिकारीच्या ऑफिसमध्ये मोठे अधिकाऱ्याचे पद मिळाले आणि आता माझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण झालेले होते. तर अशा पद्धतीने स्वामींनी मला माझ्या तिसऱ्याच गुरुवारी माझ्या सेवेचे फळ मला दिले. श्री स्वामी समर्थ!

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा देशमुख ताईंचा स्वामी अनुभव हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *