सुंदर सुविचार ….. या सुंदर सुविचारांनी तुमचेही नशीब उघडण्यासाठी १००% मदत होईल? असे हे २०२४ चे सुंदर सुविचार ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक असे खर्च प्रवास आपल्याला सोसावे लागतात. ज्या प्रवासातून आपण खचून न जाता धीराने सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. असे काही मार्गदर्शन आपल्याला चांगला विचारातून चांगला सुविचारातून आपल्या मनाला खूप बिंबवणारे असतात. असेच काही सुंदर सुविचार आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जीवनामध्ये जर आपल्याला यश कमवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या सुविचारांची मदत होईल.

 

आयुष्य हे one way सारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा.

शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो. या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. परंतु जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात.

मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादाई माणसांची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसामुळे पूर्ण होत असते.

दोष लपवण्याचा प्रयत्न केला तर तो मोठ्ठा होत जातो आणि कबूल केला तर नाहीसा होतो.

लोकं म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाहीं नातं हे समोरच्याला टिकवायचं असेल तरच टिकतं.

निरागसता इतकी असावी की, चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी.

वाईट, दृष्ट, कपटी, लबाड अशा वाईट स्वभावाची माणसंच तर आपले गुरु असतात कारण त्यांच्यामुळे तर चांगले वाईट ह्यातील फरक कळतो.

यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या.

फार साधे राहू नका लोकं तुमचा घात करतील.

एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तरी ठीक आहे, नका घेऊ! पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगतही फिरू नका.

अति विचारांमुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात.

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

दुसऱ्यांचं सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही.

जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं.

जिथं चुकत नाही तिथं झुकत नाही हा बाणा बाळगला की तुमच्या नादाला कोणीच लागत नाही.

काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण तीच चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते.

कुणीतरी आवडणं हे प्रेम नाही त्या व्यक्तीशिवाय कोणीच आवडत नाही हे प्रेम आहे.

चेहऱ्यावर कोणताही भाव न दाखवणारी माणसं जास्तीत जास्त डेंजरस असतात.

या जगात चप्पलशिवाय दुसरं कोणतंच परफेक्ट कपल नाही कारण एक हरवली तर दुसऱ्याचं जीवन तिथंच संपतं.

रुबाब तेव्हाच करा जेव्हा बापाच्या कष्टाचं नाही तर स्वतःच्या कष्टाचं पैसं खिशात असतात.

मनापासून केलेली काळजी मनातील दुःखाचा बराचसा भार हलका करून जात असते.

दहा वेळा पराभव झाला तरी चालेल पण एक विजय असा मिळवा की लोकं नेहमी लक्षात ठेवतील.

माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागतो.

शाररिक ताकदीपेक्षा मानसिक ताकदच मानवाला सशक्त बनवून लढण्यास प्रवृत्त करते.

जे आपली बदनामी करतात त्यांना करू द्या कारण बदनामी तेच लोकं करतात जे आपली बरोबरी करूच शकत नाहीत.

जास्त इच्छा नाही फक्त आयुष्यातील पुढचं पाऊल मागच्यापेक्षा चांगलं असावं.

पदरी अपयश आलं की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात.

सत्याला जिंकायला थोडा उशीर लागतो पण सत्य कधीच हारत नाहीं.

मनमोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात.

दोन अक्षरांची “लक” अडीच अक्षरांचे “भाग्य” तीन अक्षरांचे “नशीब” उघडण्यासाठी चार अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते पण एक अक्षराचा “मीपणा” माणसाचं जीवन नष्ट करतो.

 

अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *