खरं प्रेम करणाऱ्यांचे हे असतात 4 संकेत…. तुमचे प्रेम खरे आहे का नक्की पहा ?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला खरे प्रेम हे हवेत असते. प्रत्येकाला असे वाटत असते की कोणीतरी असा व्यक्ती असावा की जो आपल्यावर जिवापाड प्रेम करेल. आपल्या सर्व सुखदुःखामध्ये तो आपला सोबत असेल. जर तुमच्यावर एखादी व्यक्ती खरं प्रेम करत असेल तर त्या व्यक्तींमध्ये असं काही गुण असतात. की ज्यामुळे त्या व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करतो आहे की नाही ते आपल्याला कळवू शकते. आजच्या या लेखांमध्ये आपण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती चे काही चार संकेत पाहणार आहोत की ज्यामुळे ती व्यक्ती आपल्यावर खरंच प्रेम करते का ते आपल्याला कळू शकते.

 

खरं प्रेम करणारे व्यक्ती एकमेकांसाठी कोणत्याही वस्तूंचा किंवा नात्यांचा त्याग कारणासाठी तयार असते. ज्या दोन व्यक्ती एकमेकांवर खरंच खूप मनापासून प्रेम करत असतात .त्या व्यक्ती आपला प्रेमासाठी सर्व व्यसने सोडण्यासाठी तयार असतात आणि ते सोडतात देखील. यामध्ये तंबाखू, सिगारेट, दारू यांचा समावेश होतो. ते आपल्या प्रेमासाठी या गोष्टी आपल्या आयुष्यातून काढून टाकतात. त्याचबरोबर ते आपल्या आई-वडिलांना देखील सोडण्यासाठी तयार असतात.

 

त्या अशा सर्व वस्तू, गोष्टी व नाती सोडण्यासाठी तयार असतात ज्या त्यांच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करत असतात. खरा प्रेमामध्ये कधीही मी असा शब्द येत नाही. जो व्यक्ती आधी मी म्हणत होता तो जर प्रेमात असेल आणि एखाद्या व्यक्तींवर खरंच मनापासून प्रेम करत असेल तर तो मी न म्हणता आपण दोघे असे म्हणतो. कोणत्याही गोष्टींमध्ये तो एकट्याला घेत नाही.

 

सर्व सुखदुःखा मध्ये ते दोघे एकमेकांच्या सोबत असतात. जो व्यक्ती आधी मी म्हणत होता त्या ठिकाणी आता तो आपण असा शब्द कायम वापरत असतो. आणि हीच गोष्ट त्या व्यक्तीला खरा प्रेमाची ओळख करून देत असते. खरा प्रेमामध्ये कोणत्याही मर्यादा नसतात. या जगामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी नियम व मर्यादा आहेत. परंतु खरा पर्याय प्रेमामध्ये कोणतीही मर्यादा नसते.

 

आजकाल लोक समोरच्या व्यक्तींकडे किती पैसा आहे, घर, गाडी, बंगला हे बघून त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात आणि ज्यावेळी हे सर्व त्यांच्यापासून दूर होते त्यावेळी ते व्यक्ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीची साथ सोडून देतात. परंतु खऱ्या प्रेमामध्ये जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवर खरंच प्रेम करत असेल तर तो कधीही त्या व्यक्तीची साथ सोडत नाही व त्याचे इस्टेट किती आहे किंवा त्याची संपत्ती किती आहे हे पाहून त्याच्यावर कधीही प्रेम करत नाही. तो जो ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत त्याला स्वीकारण्यासाठी तयार असतात.

 

अशाप्रकारे या लेखांमध्ये आपण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तींचे काही संकेत पाहिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *