जळालेले दुधाचे भांडे अजिबात मेहनत न करता चुटकीशीर साफ करा एका मिनिटांत या ट्रिक ने…..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या घरामध्ये प्रत्येक महिलांना असे वाटते की आपला घरातील भांडी स्वच्छ आणि चकचकीत असायला हवी आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. जेणेकरून आपल्या घरातून भांडी स्वच्छ दिसतील. त्याचबरोबर घरातील सर्व भांडे चकचकीत व नवीन दिसतील. परंतु घरात काही गडबडीमुळे त्यांच्याकडून भांड्यांमध्ये गॅसवर ठेवलेले पदार्थ जळतात आणि ते जळाला मुळे त्यांची भांडी थोडा प्रमाणात काळवट होतात.

 

त्याचबरोबर तो जळलेले भांडे म्हणावे तितके स्वच्छ निघत नाही किंवा तर ते भांडे निघण्यासाठी खूप कठीण जाते. अशा वेळेस महिलांना खूप मोठा प्रश्न पडतो की काय करावे? म्हणूनच आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे जळलेले भांडे अगदी चकचकीत नवीन दिसेल. यासाठी आपल्याला कोणकोणते सामग्री लागणार आहे व कशा प्रकारे आपण ते भांडे नवीन करू शकतो? याची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

महिलांना कामाची गडबड ही चालूच असते. परंतु या गडबडीमध्ये ते आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी घेत असतात. त्याचबरोबर आपले घर कशाप्रकारे स्वच्छ व साफ दिसतील हे देखील पाहत असतात आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक देखील वापरत असतात. परंतु अनेक वेळा असे घडते की गॅसवर ठेवलेले दुधाचे भांडे ते तसेच राहून जाते किंवा इतर कोणता तरी पदार्थ तो तसाच गॅसवर ठेवलेला असतो.

 

आणि गडबडीच्या ओघात त्यांच्याकडून त्याकडे लक्ष देणे होत नाही आणि याच कारणामुळे ते पदार्थ किंवा दूध जळून खाक होते. हे जळलेले भांडे ते स्वच्छ करण्यासाठी खूप धडपडत असतात. कारण त्यांना घरातील भांडी ही स्वच्छही करायची असते. म्हणूनच आज आपण एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे जळले भांडे अगदी स्वच्छ होते. त्यासाठी आपल्याला धुण्याचा सोडा, बेकिंग सोडा, मीठ आणि पाणी या घटकांची आवश्यकता लागणार आहे.

 

प्रथम आपल्याला जळालेले भांडे घ्यायचे आहेत आणि त्या भांड्यामध्ये जितके भांडे जळाले आहेत तेवढे पाणी त्या भांड्यात घालावे व हे पाण्याने भरलेले भांडे गॅस ऑन करून गॅसवर ठेवावे व मंद आचेवर गॅस चालू ठेवावा. त्यानंतर त्यामध्ये धुण्याचा सोडा घालावा व त्याला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा घालावा. प्रत्येकाचे प्रमाण हे एक एक चमचा इतके असावे आणि चमच्याने ते भांडे हलवत राहावे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे. हे देखील एक चमचा इतकेच असावे.

 

मीठ यासाठी घालतात की जर ते दुधाचे भांडे असेल आणि जर आपण पुन्हा त्यामध्ये दूध तापवण्यास ठेवले तर ते खराब होऊ नये. यासाठी वापरले जाते. पंधरा ते वीस मिनिटं याला मंद आचेवर चांगला प्रकारे गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून भांडे खाली उतरून घ्यावे व पाणी गार होऊ द्यावे. गार झाल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने ते सर्व भांडी खरडून घ्यावे आणि स्वच्छ पाण्याने एकदा धुवावे.

 

धुतल्यानंतर भांडी स्वच्छ करण्याचा चोता घेऊन पुन्हा त्याला स्वच्छ घासावे. त्यानंतर आपण जो आपल्या अंगासाठी साबण लावत असतो तो साबण घेऊन त्या साबणाने हे भांडे स्वच्छ घासावी. असे केल्याने ते भांडे अगदी स्वच्छ व नवीन दिसते व चकचकु लागते.

 

अशाप्रकारे या साध्या उपायाने आपण जळालेले भांडे अगदी स्वच्छ करू शकतो. तेही काही मिनिटांमध्येच आपण भांडे अगदी नवीन वाटू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *