हृदय स्पर्शी विचार “आवडत्या व्यक्ती पासून मन दुःखी झाले ती फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा?

Uncategorized

मित्रांनो, मानवी मन हे अत्यंत भावक असत. जर आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जीव लागला आणि त्याबद्दल खूप जिवापाड प्रेम केले अशाच व्यक्तीच्या कृतीमुळे आपले हे मन अत्यंत दुखी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मन दुखी झाले तर अशावेळी आपण काय करावे. यासाठी आपण सुंदर विचारांची शिदोरी घेऊन जाणून घेणार आहे.

 

गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातूनन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की मग “पाण्याची चव आणि माणसाची नियत ” दोन्ही बदलतात. म्हणून सावध रहा.

जीवनात व्यापक अनुभव येण्यासाठी 3 गोष्टी करा • वाचन, पर्यटन आणि श्रवण.

प्रत्येकजण जग बदलायचा विचार करतो. पण स्वतःला बदलायचा विचार कुणीच करत नाही.

असूनही जी दिसत नाही, पण मनाला जाणवते, ती भावना. जे नजरेला दिसत तो व्यवहार.

सरलेल्या क्षणांना मुठीत घट्ट धरुन ठेवु नये मुठ उघडताच मुठीत काहीच उरत नाही. सगळे आरसे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवित खवित नाहीत. नाहीत.

गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नाही… त्यासाठी सावधान रहा… कारण… जास्त गोड बोलणारे पण इजा पोहचवु शकतात.

परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र सांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारे” मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.

गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा.. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच.. डोळे मागे न देता पुढे दिले आहेत..!!

प्रेमळ माणस ही इंजेक्शन सारखी असतात…. ते तुम्हाला कधी वेदना देतील ही.. पण त्यांचा उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो.

जीवन हे हार्मोनियम सारखे असते. सुखाच्या पट्टया पांढऱ्या, दुःखाच्या पट्टया काळ्या. पण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही..!!!!

जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही, कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळं नाही…..

“माणुस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम ‘वकील’ असतो, परंतु.. दुसर्याच्या चुकांसाठी सरळ ‘न्यायाधीश च बनतो…

आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो… इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो..अन् एकदा तुम्ही या खेळात पारंगत झाला की, प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो…”

आवडत्या व्यक्ति पासुन मन दुःखी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा । दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दुःख विसरा-”

पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण, पैशांचे रक्षण तुम्हाला करावे लागते आणि ज्ञान मात्र तुमचे रक्षण करते….

आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी.. आणि काही मुळांसारखी – न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी…..!

“माझं” म्हणून नाही. “आपलं” म्हणून ‘जगता’ आले पाहिजे… ‘जग’ खुप ‘चांगले’ आहे. फक्त..”चांगले वागता” आले पाहिजे..!!

जीवनातील सगळ्याच समस्या देवाच्या भरवशावर सोडून चालत नाही, कुणास ठाऊक त्या समस्या सोडवण्याकरिता देव तुमच्या भरवशावर बसला असेल..

जेथे दान देण्याची शिकवण असते तेथे संपत्तीची कमी नसते. आणि जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांची कमी नसते….

 

अशाप्रकारे हे काही सुंदर विचार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *