स्वामींच्या कुठल्याही मूर्तीला स्पर्श करा आणि बघा तुमच्या नशिबात काय आहे, स्वामींची अखंड कृपा तुझ्यावर राहील…..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक गोष्टीतून आपल्याला स्वामींचे संदेश ऐकणं खूप गरजेचे आहे. ते ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आज देखील आपण असाच एक स्वामी संदेश जाणून घेणार आहोत. स्वामीभक्त हो स्वामींचे रूप म्हटलं ना तर स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपलं मन मोहून टाकत असतात. स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जात असतात. पण तरीही आज स्वामींनी फक्त तुमच्यासाठी जे रूप धारण केलेले आहे त्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला काहीतरी संदेश देऊ पाहत आहे. तर तुम्हाला तुमच्या समोर जे तीन स्वामींचे फोटो दिसत असतील.

 

त्यापैकी कुठलाही स्वामींचे एक रूप निवडायचा आहे जे फक्त तुमच्यासाठी असणार आहे. आणि तुमच्यासाठी जर स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. स्वामींचे रूप तुम्ही फोटोमध्ये शोधा किंवा तुमच्या अंतर्मनामध्ये शोधा स्वामींचे दर्शनाला प्रत्येक रूपामध्ये होत असते आणि त्यातून ते आपल्याला कोणते ना कोणते संदेश हे देतच असतात. आज आपण जे तीन संदेश पाहणार आहोत ते तीन फोटोच्या साह्याने पाहणार आहोत.

 

 

ज्यांनी तीन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे, तुझ्यामध्ये बदल हे तुलाच घडवून आणायचे आहे. ते इतरांना बघून तुझ्या मध्ये आपोआप घडणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं तू स्वतःची तुलना कोणाशी करत आहे ते एकदा पडताळून बघ. कारण खूपदा ज्या व्यक्तीशी तुला करतो ती व्यक्तीच मुळात चुकीची असते. तर तुझ्या आयुष्यामध्ये तिचा अनुकरण करून कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहे याचा विचार तूच कर आणि मुळात तर तू कोणाशी तुलनाच करू नको. कारण तुझं आयुष्य वेगळं आहे. त्या व्यक्तीचा आयुष्य आहे त्याची कर्म वेगळी आहे. तो मनुष्य वेगळा आहे आणि जर त्याची कर्म वेगळी आहे तो मनुष्यच वेगळा आहे तर तुझं नशीब त्याच्या नशिबाशी घासायला जाऊ नकोस.याने त्रास फक्त तुलाच होणार आहे. समाधान मात्र कधीही तुला मिळणारच नाही. तुझं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व आहे. ते बाहेर काढायला शिक.

 

अरे प्रत्येकामध्ये सुप्त गुण दडलेले असतात. ते ओळखायला जमत नसेल तर आम्ही तुला सरळ हाताने मदत करू. पण त्यासाठी तुला आमच्याकडे एक पाऊल चालून यावं लागेल. तू एक पाऊल आमच्या दिशेने आम्ही दहा पावलं तुझ्या दिशेने चालत येऊ आणि तुझा हात धरू आयुष्य जगत असताना दुसऱ्याकडून शिकण्यासारखं असेल तर आवर्जून ते शिकावं. पण त्याच्यासारखंच जगायचं असा घट्ट करण म्हणजे साप चुकीचा आहे. तर मूर्खपणाचे लक्ष नाही. असं करणं म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करत आहात आणि तुम्ही तुमच्या स्वतःचाच अपमान देखील करून घेत आहेत. म्हणून तुला तुलना करायची असेल तर मग तुम्ही तुलना तू तुझ्या भूतकाळाशी आणि वर्तमान काळाची कर. म्हणजे तुझं तुलाच कळेल की तू भूतकाळामध्ये काय होतास आता वर्तमान काळामध्ये तो काय आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये जेव्हा तू तुलना करशील तेव्हा तुझे समोर असणार आहे आणि त्यातून एक अनुभव घेऊन तुला तुझ्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग देखील सापडणार आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने तुझ्या मार्गावर चालशील तेव्हा आम्ही तुला ऐकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!.

 

ज्यांनी दोन नंबरचा फोटो निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते जाणून घेऊयात, अरे स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नकोस. कारण कदाचित तुझ्यासारखा आयुष्य जगणं हे कोणाचं तरी स्वप्न असेल आणि म्हणूनच जे तुझ्या पदरी पडलेला आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिक. ती परिस्थिती आनंदाने स्वीकारायला शिक आणि त्यामध्ये समाधानी राहायला शिक. प्रयत्न जेवढे जास्त तेवढाच विजयी हा तुझा होणार आहे. जेवढे प्रयत्न तू जास्त करणार आहे तेवढा विजय तुझा मोठाही होणार आहे. एकदा प्रयत्न करून काहीही होत नाही अरे प्रयत्न तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही आणि माझं लक्ष तुझ्यावर आहे हे कधी विसरू नको. तू काळजी करू नकोस तू फक्त तुझे कर्म चांगले कर आणि तुझे प्रयत्न मात्र चालू ठेव बाकी सगळं आमच्यावर सोडून दे. तुला हवी ती सवय लावू शकतो. स्वतःला हवी ती सवय लावू शकतो तुझ्या मध्ये तेवढेच सामर्थ्य आम्ही दिले आहे .

 

फक्त प्रश्न एवढा आहे की तुला सवय कुठली लावायची आहे हेच तुला कळत नाही आणि जर तू वाईट सवय लावून घेत आहेस तर तुझा आयुष्य हे वाईटच होणार आहे. जर तू चांगली सवय लावून घेतलीस तर तुझा आयुष्य खूप चांगलाच घडणार आहे. सवय कुठली लावायची हा विचार करण्याचे स्वातंत्र्य मात्र आम्ही तुला दिलाय. आता तूच बघ तुला विचार करायचा जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो ना तो कधीच कमी पडत नाही. मी तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

 

ज्यांनी पहिला फोटो सिलेक्ट केला होता त्यांच्यासाठी स्वामी महाराज म्हणतात की, अरे या विश्वात असेल नसेल कोणी तुझं या विश्वात असेल नसेल कोणी तुझं कायम भरारी ठेवतो. बदलेल एक दिवस तुझा पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. स्वतःला कधीही कमी समजू नकोस. तुझा परमात्मा म्हणजेच आम्ही तुझ्या हृदयात विराजमान आहोत. आम्ही कधीच कोणाला सोडत नाही. आम्ही तुझ्यासोबत तुझ्या भूतकाळात होतो, आम्ही तुझ्यासोबत तुझ्या वर्तमानात आहोत, तुझ्यासोबत तुझ्या भविष्यातही कायम असणारच आहोत. एखादा रोप लावल्यानंतर त्याला फुल आणि फळ येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते.

 

ती विशिष्ट वेळेची गरज असते तेव्हा कुठे त्याला सुंदर फुल आणि फळ येतात. तसंच तुझ्या आयुष्याचा आहे. वेळोवेळी तुला तुझ्या चांगल्या कर्मांची आणि आमच्या नामाची त्याला जोड द्यायचे आहे. तेव्हा कुठे तुझा आयुष्य भरायला लागणार आहे आणि जेव्हा तुझ्या आयुष्याला चांगल्या कर्मांची आणि आमच्या नामस्मरणाची जोड देशील ना तेव्हा तुझा आयुष्य हे सोन्याहूनही मौल्यवान होणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव आम्हाला तू दान केलेला पैसा, तुझ्या महागड्या वस्तू कधीच आवडत नाही. तू स्वतःसाठी नक्कीच खूप मोठा हो खूप श्रीमंत हो पण त्यासोबतच दुसऱ्यांच्या जखमेवर घालायला देखील तू शिकायला हवं. त्याशिवाय तुला सुख अनुभवता येणार नाही आणि अशी जर तुझी वागणूक असेल तर आम्ही तुला फक्त एकच सांगू की भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.

 

स्वामींना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. फक्त चांगले करावे यासोबतच हे आयुष्य जगत असताना स्वामींचा सतत नामस्मान करावं. या दोन गोष्टी आपल्याकडे अपेक्षित असतात आणि आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणा असेल, आपले सातत्याने प्रयत्न असतील तर स्वामी महाराज आपली पाठ कधीही सोडणार नाही. स्वामी आपला हात कधीही सोडणार नाही.

 

अशाप्रकारे हे तीन संकेत स्वामी महाराजांनी फोटो च्या आधारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *