मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. कारण अनुभवातूनच माणूस अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या अपेक्षा जे वडीलधारी व्यक्ति आहेत ती नक्कीच आपल्याला सल्ला देत असतात. कारण अनेक अनुभव घेतलेल्या असतात. म्हणून आपल्यांना मोठ्या व्यक्तींचा वडीलधारा माणसांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे. कारण अनुभवातून माणूस खूप काही शिकत असतो आणि त्यातूनच ते आपल्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होईल. यासाठी आज आपण काही सुंदर सुविचार चांगले घेणार आहोत.
आयुष्यात आपल्या मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा आपलं मन समजून घेईल अशी व्यक्ती शोधा, आयुष्यात कधी कधी त्याही व्यक्तीवर प्रेम करा.. ज्या व्यक्तीला आपण आवडतो कारण प्रत्येकाला मन समजून घेणारी व्यक्ती ही हवी असते.
ज्या घरात बायकांचं राज्य चालतं त्या घरातील मुलं वडिलांच्या नातेवाईकांना कधीच आपलं मानत नाहीत..
जेव्हा कोणी तुम्हाला दुखावतं तेव्हा शांत राहणं चांगलं असतं, कारण वेळ त्यांना उत्तर देते, आपण नाही..
जेवढे एकट्याने संघर्ष कराल तेवढे ताकदवान राहाल, अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका.. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा.!
खूप संयम लागतो, नाते टिकवायला नाहीतर दुनिया तयारच असते.. कान भरून देऊन महाभारत पहायला.
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आधाराची गरज पडते म्हणून सत्येचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो.
वेळ सर्वांवर येते फक्त हे कधीच विसरू नका, की जे पेराल तेच उगवेल.!
देवावर विश्वास ठेवा. ज्यानं तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे तो इथून पुढेही घेऊन जाईल.
सल्याच्या शंभर शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते.
आयुष्य न्याय करत नाही म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार हा आपला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार असतो.
शब्द आणि व्यवहार हीच व्यक्तीची खरी ओळख आहे चेहरा आणि संपत्ती आज असते, उद्या नसते.
नेहमी सावध राहिले पाहिजे कारण आपल्या पाठीवर वार करणारे हे आपल्या जवळचेच असतात.
अव्यक्त राहून व्यक्त होणं आणि ते समोरच्याला समजून येणं, हे नवरा बायको यांना जमत असतं.. या अबोल नात्यातही प्रेमाचे बंध हे अतूट असतात…
स्वतः शिकलेली कला ही कधीच उपाशी मारत नाही..
अहंकार ही अशी गोष्ट आहे ती दुसऱ्याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाही दिसत..
सगळ्याच पुरुषांना व्यक्त होता येत नाही बऱ्याच वेळा जबाबदाऱ्याचं ओझं असतं.. भावनांच्या नाजूक फांद्यांना नकळत खोड बनवतात पण त्या खोडावर साधी रेघ मारली तरी ओलावा दिसून येतो.
सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्या हृदयात असते देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो.
कोणत्याच नात्यात जास्त झुकत बसायचं नाही कारण जास्त झुकत राहिलो, की लोकं आपल्याला कचरा समजायला लागतात.
दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते.
ज्याला काय मिळवायचं हे समजलं की तो कुठेच फसत नाही.
कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पाडतो तो म्हणजे गैरसमज हा एकदा मनात तयार झाला की सरळ माणसाच्या सरळ गोष्टी देखील वाकड्या वाटायला लागतात.
कधीकधी लोकांचा विचार न करता मनसोक्त रहा, कारण जास्त समजूतदारपणा हा आनंद हिरावून घेतो.
एखाद्याच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा स्वतःच्या कामधंद्याकडे लक्ष द्या, आणि मग दुसऱ्याला नावे ठेवत चला..
शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता.
समाज हा भावनांचा लिलाव करणारा एक घाऊक बाजार आहे.
अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तिमतला अंधार ओळखण्याचा प्रयत्न हा नेहमी केला पाहिजे..
जेव्हा तुमची परिस्थिती चांगली आहे तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो.
विचार मन आणि माती यांना योग्य वेळी आकार दिला नाही तर त्याचा चिखल होतो..
ज्याला मन नाही कळत त्याला प्रेम कळत नसतं..
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा, डोळ्यांना सगळेच छान दिसतात..
अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.