स्वार्थी मूर्ख आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे? एकदा नक्की वाचा ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की जे आपला त्यांच्या फायदा पुरता वापर करत असतात आणि हे आपल्याला कळत असून देखील त्या लोकांशी कसे वागावे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे ते लोक त्यांची मनमानी चालूच ठेवतात आणि भविष्यात या लोकांपासून आपले जगणे मुश्किल होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आपण असे काही पाच नियम जाणून घेणार आहोत की ज्यामुळे या लोकांपासून आपल्याला सावधगिरी पाळता येते.

 

पहिला नियम म्हणजे प्रत्येक माणसाची कमजोरी जाणून घ्या. हा नियम आपण एका छोटीशी गोष्टीतून समजून घेऊ. एक वडील होते ते गव्हर्मेंट नोकरी रिटायर्ड होते आणि त्यांची मुले परदेशात नोकरीसाठी होती. ते दोन्ही मुले त्यांच्या परिवारासोबत खूश होते. इकडे वडील त्यांची पत्नी म्हणजेच मुलांची आई मरण पावल्यानंतर एकटेच राहत होतो. यांना त्याची काहीही खंत नव्हती. परंतु दोन्ही मुलांनी आपलाच भेटावयास यावे असे त्यांना खूप वाटत होते. म्हणून ते फोन लावण्यात खूप जास्त पैसे खर्च होत होते म्हणून ते पत्र पाठवत होते.

 

परंतु ही दोन्ही मुले त्या पत्राचे काहीही उत्तर देत नव्हते. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितली. त्यांच्या मित्रांना हे कळाले व त्यांनी त्या दोन्ही मुलाला फोन लावला व सांगितले. की तुमच्या वडिलांची तब्येत खूप खूप बिघडली आहे आणि त्यांनी मृत्युपत्र बनवायचे ठरवले आहे आणि त्यांची सर्व संपत्ती ते दान करणार आहेत. हे ऐकल्यावर ती मुले अचानकपणे त्यांच्या वडिलांकडे येतात. वडिलांना धडधाकट पाहून ती मुले खूप आश्चर्यचकित होतात आणि ही सर्व गोष्ट त्यांना कळाल्यावर ते रागाने तेथून निघून जातात.

 

वडिलांना मुले भेटावयास आल्याचे खूप आनंद होतो व त्यांना समाधान होते. त्यांच्या मित्राला त्यांच्या मुलाचे कमजोरी समजली होती. जेणेकरून ते त्यांच्या वडिलांना भेटता येतील. अशाच प्रकारे आपण देखील समोरच्या व्यक्तीची कमजोरी समजून घेणे खूप गरजेचे आहे आणि वेळ पडल्यास त्याच कमजोरीवर आघात करावा. जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल.

 

दुसरा नियम म्हणजे कृती आणि ऍक्शन्स घेऊन स्वतला सिद्ध करा. वादविवाद आणि भांडण करून नाही. जर आपल्याला काही बनायचं असेल तर एखादी व्यक्ती आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करीन त्या व्यक्तीबरोबर आपण खूप अज्ञान आहोत हे दाखवावे आणि याच एनर्जीचा वापर आपण ते काम पूर्ण करण्यात लावावे. म्हणजेच जर आपल्याला काही करायचे असेल आणि त्याविषयी आपण इतरांशी बोलायला गेलो तर ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आणि या लोकांशी भांडण न करता स्वतःच्या मतावर ठाम रहा व त्यांना आपण खूप अज्ञानी आहोत असे दाखवा आणि तीच एनर्जी आपण करत असलेल्या कामांमध्ये लावा. जेणेकरून ती भविष्यामध्ये काम पूर्ण होईल व त्याच व्यक्तीला आपल्या बोलण्यातून नाही तर आपल्या कृतीतून आपले कर्तबगिरी दाखवावे.

 

तिसरा नियम म्हणजे तुम्ही कसे काम करता, कष्ट करता, हे कोणालाही कळू देऊ नका. भविष्यामध्ये जर तुम्हाला काही साफ करायचे असेल तर आपण जे काही काम करत आहोत, कष्ट करत आहोत जे काही फॉर्म्युलाच वापरत आहोत ते इतरांसोबत शेअर करू नका. कारण काही लोक आपलाच फॉर्मुला आपला विरुद्ध वापरण्याचा प्लॅन करत असतात आणि त्याचा फटका आपल्याला बसू शकतो. म्हणून कोणालाही सांगण्यापेक्षा ते आपला कृतीतून दाखवावे. करण्याआधीच कोणताही कामाचे नियम इतरांची शेअर करू नये.

 

चौथा नियम म्हणजे मूर्खासमोर मूर्खच बनून राहा. जर एखादी व्यक्ती स्वतःला खूप हुशार समजत असेल तर त्या व्यक्तीसमोर आपण मूर्ख बनवून राहावे. त्या व्यक्तीला असे दाखवा की त्याबद्दलचे आपल्याला काहीही ज्ञान नाही. तो जो काम करत आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला हे काम जमू शकते. आपल्याला हे काम जमणारच नाही. असे केल्याने तो व्यक्ती स्वतःला अजूनच महान समजेल आणि तो आपण काय करत आहोत काय नाही याच्याकडे लक्ष देणार नाही. त्याचाच फायदा घेऊन आपण आपले ध्येय सिद्ध करू शकतो व भविष्यात आपले काम बघून लोक आपल्याकडे आकर्षित होते व आपला समाजामध्ये मानसन्मान वाढेल.

 

शेवटचा नियम म्हणजे सतत उपलब्ध राहू नका. तुमच्या अनुपस्थितीची लोकांना किंमत कळू द्या. तुम्ही इतरांसाठी सतत उपलब्ध राहू नका. जर तुम्ही प्रत्येक वेळेला इतरांसाठी उपलब्ध राहिले त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला ते तुम्हाला बोलवतील त्या वेळेला तुम्ही जर सतत उपस्थित राहिला तर त्या ठिकाणी तुमची किंमत कमी होण्याची शक्यता असते. लोकांना असे वाटते की हा तर काय प्रत्येक ठिकाणी असतोच. यामुळे आपली किंमत कमी होण्याची शक्यता असते. समाजामध्ये जर आपल्याला मान सन्मान हवा असेल तर नक्कीच आपली किंमत काय आहे हे लोकांना दाखवून देणे गरजेचे असते. म्हणूनच सतत इतरांसाठी उपलब्ध राहू नका.

 

अशाप्रकारे हे काही पाच नियम आहेत. हे जर तुम्ही जर पाळले तर नक्कीच तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून तुमची सुटका होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *