स्वामी सांगतात कुठल्याही नंबर वर बोट ठेव आणी तुझं भाग्य बघ, स्वामी कृपेने सर्व ईच्छा पूर्ण होतील…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे. 5,9,7 या पैकी एक अंक मनामध्ये धरा आणि त्यानुसार तुमच्यासाठीच स्वामी संदेश काय आहे ते पाहू. ऐकून सोडून देऊ नका. त्यावर थोडासा विचार करा. अगदी 100% पटलं नाही तर हरकत नाही पण एखादा टक्का जरी तुम्हाला यातलं पटलं ना तर त्यावर विचार करा. ते त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. शेवटी स्वामी तर आपल्या पाठीशी नेहमीच आहे.

 

ज्यांनी 5 नंबरची निवड केली त्यांच्यासाठीच स्वामी अशा लोकांना सांगत आहे की, अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे एकच तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही, आम्ही तुझ्या वाट्याला फक्त आणि फक्त गरिबी दारिद्र्य लिहिलेला आहे. तुझं पैसा कमावतो तो तुला पुरतच नाही आणि लक्ष्मी काय तुझ्या घरी पाहतच नाही. अशी तक्रार नेहमीच तुझी असते व कधीही तू तुझ्या नशिबाला दोष देतो. तर कधीही तुझ्या पत्रिकेला दोष देतो. कधी कधी आमच्याकडेही शंकेने बघतो. तर कधी कधी स्वतःलाच विश्वास कमी करून घेतो आणि त्यामुळे आज आम्ही तुला अनमोल असा विचार सांगणार आहे बघ तुला पटत असेल तर त्यावर एकदा विचार आवर्जून कर. हे बघ तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त ठाऊक आहे आणि हो जर काही गोष्टी तुझ्या नशिबात नसतील दिलेल्या तर आम्ही तुला त्या मिळवून देऊ तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि तू जर आमच्या मार्गात आहे तर नक्कीच तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुला मिळणारच आहे.

 

पण तुझी ही सतत तक्रार करतो ना की तुझ्याकडे पैसा टिकत नाही, नशीब तुला साथ देत नाही तर तू बाहेर बघण्यापेक्षा तुझी पत्रिका बघण्यापेक्षा किंवा तू माझ्याकडे बघण्यापेक्षा तू स्वतःच्या अंतर्मनामध्ये थोडासा डोकावून बघ तुझा कुठेतरी चुकतंय का? आता तुझं काय चुकतंय हे तुला समजत नसेल तर आम्ही तुला सांगतो तर बघ तुझ्याकडे जो पैसा येतोय ना तो टिकत का नाही. त्याला जबाबदार तूच आहे. मी म्हणत नाही की तो खर्च करू नको. तू आवर्जून खर्च कर तुझी हाऊस माउस कर सगळं काही कर. शेवटी अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजा पूर्ण करणं आपलं कर्तव्य असलं तरीही किंवा आपल्यासाठी त्या तीन गरजा महत्त्वाच्या असल्या तरीही काळानुसार आता सगळं काही बदलत चाललेला आहे. जग बदलत चाललेला आहे. नवीन नवीन गोष्टी समोर येत आहे आणि या बदलत्या जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट हवी आहे. जे काही नवीन येत आहे ते तुला घ्यायचं आहे.

 

भलेही तुझे खिशामध्ये थोडासा पैसा कमी असला तरीही तुझा अट्टहास मात्र एवढाच असतो की नाही मी ते घेणार म्हणजे घेणारच. शेजारच्याने घेतले ना तर मग माझ्या पण घरात येणार. माझ्या मित्राने आणलाय ना तर मग मी पण आणणार. असा अट्टहास का करतो? बर तेही ठीक आहे तू महत्त्वकांक्षी आहे. हे मलाही आवडतं. परंतु ज्या गोष्टींचा तुला जास्त उपयोगच होत नाही फक्त दिखावा म्हणून त्या वस्तू तू जर तुझ्या जवळ ठेवत आहे आणि त्यावर खूप खर्च करत आहे तर मला सांग तुझा पैसा कसा काय टिकणार. जिथे तुझा पगार वर्षासाठी चार-पाच हजाराने वाढत आहे. तिथे तुझा खर्च मात्र वर्षासाठी 30 ते 40 हजाराने वाढत आहे. मग सांग ती लक्ष्मी माता तरी काय करणार.

 

आजकालची जीवनशैली बदलल्यामुळे सगळ्याच खर्च वाढला आहे. जसं की घरामध्ये एकाच व्यक्तीच्या चप्पल ची जोड चार ते पाच असतात. एकाच व्यक्तीच्या कपड्यांचं एक अख्ख कपाट असतं. पूर्वी तसं नव्हतं, एका कपाटामध्ये अख्या कुटुंबाचे सामान बसायचं. परंतु आज प्रत्येकासाठी वेगवेगळी कपाटा आहे आणि तेही आज कमी पडत आहे. मग मला सांग तुझा पैसा कमी पडणार नाही तर काय होणार. जुन्याकाळी फक्त आपल्या स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवलं जात होतं. पण आज तस राहिलं नाही आज दिवसाआड प्रत्येकाला बाहेरचं खाणं हवं आहे. हॉटेलमधलं खाना पिना हवा आहे. मग मला सांग तुझा पैसा तुला अपुरा पडणार नाही तर काय होणार आणि या सगळ्यांमध्ये वाढणाऱ्या दोन सगळ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे काय तर देखावा करणे.

 

आणि अपेक्षांचा ओझर या दोन गोष्टींच्या ऊर्जा खाली तू इतका दाबला जात आहेस की तुला वरती निघायला काहीही चान्सच मिळत नाही आणि त्यामुळे तुझ्या खर्चाचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.आणि मग शेवटी तू आमच्याकडे तक्रार करतो की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर नाही. अरे लक्ष्मी माता तुला भरभरून देत आहे. परंतु ती टिकवायची कशी ते वापरायचं कसं हे मात्र तू विसरून जात आहे. बघ पटत असेल तर या गोष्टीवर एकदा विचार कर आणि ज्या गोष्टी टाळण्यासारखा आहे. त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न कर नक्कीच तुम्ही सुखात राहशील, समाधानात राहशील.

 

आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजे 7 नंबर निवडला आहे. त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी सांगतात काही ठिकाणी बोलणं गरजेचं असतं नाहीतर आपण शांत बसलं की आपल्या शांततेचा फायदा आयुष्यभर घेतला जातो. ते कसं जाणून घेऊया. आज कालच्या युगात आपला स्वभाव काही लोकांसाठी तिखटच ठेवावा. कारण गोड लागणारा ऊस चावून चावून खातात. पण तिखट मिरची चावून खाण्याचे हिम्मत कधीही आणि कुणीही करत नाही. त्यामुळे तुम्ही कधी कधी मिरची सारखे वागले तर चुकीचे लोक तुमचा गैरफायदा घेणार नाही. जाणून-बुजून कोणाच्याही भावना अजिबात दुखावू नये, फसवू नये. कोणाला कारण त्याचा हिशोब आपल्या कर्मांमध्ये आपोआप लावला जातो.

 

पण जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून मात्र चार हात नेहमीच लांब रहावे. असं स्वामी नेहमीच सांगतात. आपल्या लोकांसाठी कुठे जुकण्याची वेळ आली ना तर आवर्जून जुकव. आपल्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली तर आवर्जून जुकाव. पण प्रत्येक वेळेस जर आपल्याला जूकावे लागत असेल. तर तिथे मात्र थांबावं. कारण प्रत्येक वेळेस आपण जुकल्याने आपली किंमत नेहमीच शून्य होत असते. सवडीने आणि आवडीने नाट्य सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला शिकलो तर नक्कीच आपली फसवणूक या जगाच्या पाठीवर कधीही आणि कोणीही करू शकत नाही.

 

त्यामुळे अशा लोकांना ओळखायला वेळच शिका. जी लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात. अशा लोकांना मनातच काय पण डोक्यातही ठेवू नका. कारण हीच लोक तुझ्या डोक्यातील सकारात्मक विचारांना मुलांपासून काढून टाकण्याचं काम करत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांब रहा. त्यांच्याशी तू वादही घालायला जाऊ नको आणि त्यांच्याशी फार गोडही बोलायला जाऊ नका. असं करण्यातच तुझा हित आहे. सांभाळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की प्रत्येक नातं सांभाळ तुझी कर्तव्य पार पाड पण त्या नात्यांकडून कधीही अपेक्षा ठेवू नको. कारण अपेक्षा या ठिकाणी कधीही कुणाच्याही पूर्ण होतच नाही त्यामुळे अपेक्षा ठेवल्या नाही तर तुला कधी दुःखाला सामोरच जावं लागणार नाही.

 

आता पुढचा ज्यांनी 9 नंबर निवडला आहे. त्यांच्यासाठी स्वामी सांगतात की रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला देव एक नवीन संधी प्रधान करत असतो. त्यामुळे सर्वप्रथम त्या देवाचे आभार मानायला शिक आणि नक्कीच आजचाही दिवस कालपेक्षा चांगला जाईल. यासाठी प्रयत्न कर. त्यासोबतच देवाकडे ही प्रार्थना कर. नक्की तुला रोजच्या रोज असे प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. जर निघून गेलेली वेळ तुला त्रास देत असेल, तुझ्या भावना दुखावून जात असेल तर त्या भूतकाळातल्या वाईट वेळेचा विचार करून भविष्य खराब करून घेण्यापेक्षा तू तुझं प्रारब्ध म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्यानंतर ते सोडून द्यायला शिक. भूतकाळातला फक्त अनुभव घे. वर्तमान जग आणि भविष्य कसा सुधरेल यासाठी प्रयत्न कर.

 

जेव्हा खूप रडावसं वाटेल ना तेव्हा नक्कीच तू खूप रड. फक्त तुझ्या एकांतात रड. अगदी या जगाच्या समोर रडू नको आणि तुझ्यासाठी एक हक्काची जागा आहे ती म्हणजे स्वामींचे दरबार. तुला खूप दुःख होत आहे, तुला खूप रडू येत आहे तर नक्कीच स्वामींच्या दरबारात येईल आणि मन मोकळेपणाने रड. नक्कीच स्वामी तुला आधाराचा खांदा देतील. आधाराचा हात देतील. पण या जगासमोर मात्र जाणार आहे तेव्हा हसतमुखाने सामोरे जा. कारण इथे तुझ्या अश्रूंची किंमतच होणार आहे, तुझं दुःख या ठिकाणी कोणालाही दिसणार नाही. त्याच्याशी कुणालाही या ठिकाणी घेणं देणं नाही. त्यामुळे तुझं दुःख फक्त स्वामी समजून घेऊ शकतात. या जगाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नको.

 

अशा प्रकारे स्वामी हा संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *