मित्रांनो, लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई-वडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवरा नवरा आणि सासर मिळावं, अशी आई-वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीला संसारसट/रुकवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते.
मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाहीत. कारण त्यामुळे सासर आणि माहेर मध्ये खूप वातावरण निर्माण होऊ शकते. मुलीला माहेर व सासर यांपैकी एक निवडण्याची वेळ देखील येऊ शकते. म्हणून अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या माहेरतून सासरी मुलींनी अजिबात घेऊन जाऊ नये. याची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
लोणचे – सासरी जात असलेल्या मुलीला लोणचे कधीही देऊ नये. याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि नातेसंबंध बिघडू शकतात. लोणच्याची चव आंबट असल्यानं ते भेट म्हणून देणं योग्य नाही. मुलीला हाताने बनवलेले लोणचे द्यायचे असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचे बनवा.
झाडू – झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये. असे मानले जाते की, जर तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचे जीवन दु:खाने भरलेले असते, असे मानले जाते.
सुई किंवा टोकदार वस्तू – मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्यासोबत देऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते, असे म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टी देणे टाळावे.
चाळणी – मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणीदेखील देऊ नये, असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करते तेव्हा त्यात 13 गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक. मात्र, चाळणी भेट देणे योग्य मानले जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात, असे मानले जाते.
अशाप्रकारे या चार वस्तू आहेत ज्या मुलींनी आपल्या माहेरातून सासरी कधीही घेऊन जाऊ नये.