मित्रांनो, जर तुम्हाला महिलांची मनातील ही गोष्ट ओळखली आली तर पहिल्या भेटीत तुम्ही तिच्या नजरेत भराल. आता तुम्ही म्हणाला अशी गोष्ट आहे तरी कोणती? ज्यामुळे ती पहिल्या भेटीत तुमच्यावर फिदा होईल. महिलांना पुरुषांमध्ये सर्वात चांगली आणि भावणारी गोष्ट काय असते ते समजून घेणे फार कठिण नाही. जर ही गोष्ट तुमच्यात असेल तर ती तुम्हाला मनातून काढून टाकणे अशक्यच. खरं तर ती तुमची पर्सनॅलिटी आणि पैशाकडे आकर्षित होत नाही. ती गोष्ट जरा वेगळी असते.
वयाच्या विशीतील प्रेमाची गुंतवणूक असते तोट्याची; जाणून घ्या त्यामागची कारणे एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी जोपासता त्यासाठी तुमचे राहणीमान कसे आहे? याचे उत्तर महिलांच्या नजरेत तुम्हाला सर्वोच्च स्थान देणारे असते. या लेखातून आपण पुरुषांमधील अशी सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे महिलांना सहज आकर्षित होऊ शकतात.
प्रत्येक स्त्रीला खरा आणि प्रमाणिक पुरुष खूप आवडतो. जो सांगतो की ‘होय, माझ्यात काही गोष्टींची कमतरता आहे, माझ्याकडूनही काही चुका होतात. पण मी सुधारेन. अशा स्वभावाचा पुरुष कोणत्याही स्त्रीच्या मनात सहज घर करु शकतो. तुम्ही जीवापाड प्रेम करता; पण तिला तो आठवतो? अशी ओळखा तिच्या मनातली गोष्ट असे म्हणता येईल की स्त्रियांना पुरुषांमधील प्रमाणिकपणा अधिक भावतो. ‘हा माणूस माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही’ हे तिला समजतं. तो संवेदनशील आहे. तो त्यांचे शब्द हलक्यात घेणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.
बहुतांश कुटुंबांमध्ये पुरुषांना जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जाते. गरज भासल्यास ते रुग्णाला दवाखान्यात घेऊन जातात. तुमच्याबाबतीतही असे होत असेल तर या चौकटीतून स्वत:ला बाहेर काढा. तुमच्यात दडलेली काळजी घेणारी व्यक्ती बाहेर येऊ देत. तुमच्या मनात एखाद्याबद्दल असणारी काळजी व्यक्त करायला शिका. तुम्हालाही कोणाची तरी काळजी घ्यायची आहे, ही भावना खूप महत्त्वाची असते.
काळजी घेणाऱ्या पुरुषाबद्दल महिलांच्या मनात एक वेगळे स्थान असते. तिला आपल्या हाताने भरवणे किंवा दुसरे काहीही नसल्यास, झोपताना ब्लँकेट अंगावर घालणे या बारिक-सारिक गोष्टीतून तुम्ही तिची काळजी घ्यावी, असे तिला वाटत असते. जर तिला तुमच्यात काळजी घेणारी व्यक्ती दिसली तर ती तुमच्यावर फिदा होईल.
हे सर्वज्ञात सत्य आहे की स्त्रियांना त्यांचे कौतुक करायला आवडते. पण जर तुम्ही तुमच्या संकोचात त्यांच्या चांगुलपणाची स्तुती केली नाही तर ते तुमच्याकडे कसे आकर्षित होतील. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या महिलेबद्दल काही आवडेल तेव्हा तिला हे नक्की सांगा. कधी कधी तिच्या सौंदर्याचे कौतुक करा. तू सुंदर दिसतेस हे शब्द तुमच्या खूप फायद्याचे ठरतील.
अशाप्रकारे पुरुषाने स्त्रीसोबत तीन कामे केली तर स्त्री त्याच्या आठवणीत दिवस रात्री तडपते.