चांगले लोकं नेहमीं दुःखी का असतात… आणि पापी लोकं नेहमी सुखी असण्याच खरं कारण….. श्रीमंत दासबोध …..!!!

Uncategorized

मित्रांनो, आपण पाहिलेले आहे की चांगले लोक नेहमी दुःख असतात आणि तापी लोक नेहमी सुखी असतात. याचं कारण काय हे आपल्याला कळतच नाही. जे लोक सतत सगळ्याशी चांगले राहत असतात त्यांच्याशी नेहमी वाईट का होत असते. अशा प्रश्नांना सगळ्यांनाच पडत असतो आणि जे लोक सर्वांसोबत वाईट वागतात त्यांच्यासोबतच का चांगले होते. हे देखील आपल्याला प्रश्न पडत असतात. म्हणूनच आज आपण एकत्र जाणून घेणार आहोत की जेणेकरून आपल्या या प्रश्नाचे उत्तरे आपल्याला मिळतील.

 

एका नगरामध्ये आपल्या तीन मुलींबरोबर एक विधवा स्त्री राहत होती. तिच्या मुली लहान असतानाच तिचा पती चा मृत्यू झाला होता. आणि तिन्ही मुलींच पालन पोषण करण्याची जबाबदारी तिच्यावरती आली होती. आपल्या मुलींना घेऊन ती स्त्री कुठे जानार. मुलींना एकट ठेवून ती कोणत काम पण करू शकत नव्हती. समाजातील दुष्ट विचारसरणीच्या लोकांचा तिला सामना करावा लागत असे. त्या गरीब असाह्य स्त्रीला कोणाचा आधार नव्हता. ती आपल्या मुलींना छोट मोठं काम करून सांभाळत होते. पण तिला आपल्या मुलींची खूपच काळजी वाटत होती.

 

एके दिवशी चिंता करून करून ती खूप आजारी पडली. आजारी पडल्यामुळे तिला खूपच भीती वाटत होती. की मला काही झालं, तर माझ्या तीन मुलींचं कसं होईल. कोण त्यांचं पालन पोषण करेल. याच गोष्टीचा विचार करून करून एके दिवशी तिची तब्येत खूपच खराब झाली आणि तिची शेवटची वेळ जवळ आली. मृत्यूच्या वेळी यम देवाचा एक यमदूत त्या स्त्रीचा प्राण घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. यम देवाचा दुत त्या स्त्रीचे प्राण घेण्यासाठीच आला होता, परंतु तिथली परिस्थिती पाहून तो द्विदा स्थितीत पडला. त्याने पाहिलं की ती विधवा स्त्री जमिनीवर निपचित पडलेली होती. आणि तिच्या तिन्ही मुली तिच्या जवळ बसून रडत होत्या. हे दृश्य पाहून यम देवाच्या दूताला त्यांची दया आली.

 

त्याला त्या छोट्या मुलींची अवस्था बघू वाटत नव्हती. तो विचार करू लागला की, “जर मी या स्त्रीचे प्राण घेऊन यमलोकात गेलो, तर या मुली अनाथ होतील. यांचं कोण पालन पोषण करेल.” काही वेळ विचार केल्यानंतर यम देवाचा दुत त्या विधवा स्त्रीचे प्राण न घेताच यमलोकात आला. यमलोकात आल्यानंतर यम लोकाचा राजान त्याला विचारलं, “तू रिकाम्या हाताने का आलास? तू तर त्या विधवा स्त्रीचे प्राण घेण्यासाठी गेला होतास.” तेव्हा यमदूत म्हणाला, “स्वामी माझ्या चुकीला क्षमा करा. मी त्या स्त्रीचे प्राण घेऊ इच्छित होतो, तरीपण मी तिचे प्राण घेऊ शकलो नाही. माझ्या ठिकाणी जर तुम्ही पण असता तर कदाचित तुम्ही त्या स्त्रीला जीवनदान दिलं असत. मला त्या विधवा स्त्रीच्या मासूम मुलींचे दुःख बघवलं नाही. जेव्हा मी प्राण घ्यायला गेलो, मी पाहिलं त्या विधवा स्त्रीच्या छोट्या छोट्या तीन मुली आहेत.

 

आणि त्या सर्व त्यांच्या आईच्याजवळ बसून रडत होत्या. जर मी त्या स्त्रीचे प्राण घेऊन आलो असतो, तर त्या मुलींच पालन पोषण कोण करतं? त्यांना जेवण कोण देतं? मृत्यू लोकात राहणारे मनुष्य खूपच स्वार्थी आणि मतलबी आहेत. कोणीही त्या मुलींची मदत केली नसती. हे यमदेवं माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या विधवा स्त्रीला काही वेळेसाठी जीवनदान द्या… म्हणजे ती आपल्या मुलींचं पालन पोषण करून त्यांना मोठं करेल. “यमदूताच बोलणं ऐकून यमदेव म्हणाला, हे दुत या सृष्टी मधल्या सर्व प्राण्यांचा मृत्यू निश्चित केलेला वेळेवरच होतो. ना कोणी कोणाचं आयुष्य कमी करू शकतं. ना कोणी वाढवू शकत. ना तू कोणाला जीवन देऊ शकतोस, ना तू वेळेच्या आधी कोणाचा प्राण घेऊ शकतोस. ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते योग्यच आहे. तू कोणाच्या नशिबाला बदलू शकत नाहीस. तू आज सृष्टीच्या नियमाचं उल्लंघन केल आहेस. तू खूप मोठा अपराध केला आहेस. त्यामुळे तुला तुझ्या चुकीची शिक्षा भोगावेच लागेल.

 

आता तू पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घे. आणि तू केलेल्या अपराधाच प्रायचित्य कर.” मग यमदूत म्हणाला, “हे प्रभू पृथ्वी लोकांतून माझा उद्धार केव्हा होईल आणि कसा होईल.” तेव्हा यमदेव म्हणतात, “हे दूत पृथ्वीवर जाऊन जेव्हा तू तीन वेळा तुझ्या मूर्खपणावर जोरजोरात हसशील तेव्हाच तुझी मुक्ती होईल.” एवढं म्हणून यमदेवांनी त्या दूताला पृथ्वीवरती ढकलून दिल. तो पृथ्वी लोकात मनुष्य शरीरात आला होता. त्याच्या शरीरावरती वस्त्र नव्हते. मृत्यू लोकाचा एक नियम आहे की, जेव्हा कोणी मनुष्य जन्म घेतो त्यावेळी तो निवस्त्र असतो. म्हणून तो दुत ही निवस्त्र एका रस्त्याच्या बाजूला थंडीमध्ये पडला होता. त्याचवेळी तिथून एक चांभार जात होता. तो चांभार थंडीपासून आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी कपडे आणि शाल घेण्यासाठी जात होता. रस्त्यात थंडीमध्ये एका नीवस्त्र माणसाला पाहून त्याला त्याची दया आली. त्याने आपल्या मुलांना कपडे घेतले नाही, पण त्या यमदूताला कपडे आणि शाल खरेदी करून दिले. तेव्हा यमदूत म्हणाला. “तुम्ही मला कपडे आणि शाल देऊन खूप मोठे उपकार केलं.

 

पण माला ना कुटुंब, ना माझ्याजवळ घर आहे आणि ना भोजनाचं काही साधन आहे.” तेव्हा चांभार म्हणाला, “तू माझ्या बरोबर चल, मी तुला जेवण आणि काम देतो. मग तो चांभार त्या यम दूताला घेऊन आपल्या घरी येतो. चांभाराच्या बायकोन बघितलं की तिचा नवरा मुलांसाठी कपडे घ्यायला गेला होता, पण घेऊन तर काहीच आला नाही उलट एका माणसाला घरी घेऊन आला. हे पाहून त्याच्या बायकोला खूप राग आला आणि त्या चांभाराबरोबर मोठमोठ्याने भांडायला लागली. त्याला वाईट बोलू लागली. हे पाहून तो यमदूत जोर जोरात हसू लागला. यम दूताला हसताना पाहून तो चांभार म्हणाला, “भावा तू हसत का आहेस? असं काय पाहिलं तुम्ही एवढ हसत आहात. तेव्हा यमदूत म्हणाला, “माझ्या हसण्याचं रहस्य मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आता तो यमदूत त्या चांभाराच्या घरी राहू लागला. त्याने चांभाराचं सगळं काम पण शिकलं. तो यमदूत त्या चांभाराच्या घरी काम करू लागला आणि खूपच सुंदर सुंदर बूट बनवू लागला. तेव्हापासून चांभाराच्या चप्पला खूप विकू लागल्या. चांभारच्या चप्पलांची चर्चा पूर्ण राज्यात होऊ लागली.

 

त्यामुळे चांभार पण खूप अधिक श्रीमंत झाला. एवढेच नव्हे तर मोठ मोठे राजा महाराजा पण त्या चांभाराकडून बूट चप्पल बनवून घेऊ लागले. जेव्हा पासून तो यमदूत त्याच्या घरी आला होता, तेव्हा पासून चांभाराचं नशीबच चमकलं होतं. त्याच्या घरात धनसंपत्तीची काहीच कमतरता राहिली नाही. नंतर एके दिवशी राजाचा एक सैनिक चमड घेऊन चांभाराजवळ आला. आणि म्हणाला, “हे बघ चांभार आमचे महाराज या चामड्यापासून बनवलेले बुट घालू इच्छित आहेत. हे चमड खूपच किंमती आहे. तू याच्यापासून चांगला एक बुटाचा जोड बनवून दे. हे चमड अजिबात खराब झालं नाही पाहिजे. लक्षात ठेव या चामड्यापासून चांगले बूट बनव.” राजाचा सैनिक चांभाराला ते चमड देऊन तिथून निघून गेला. मग चांभाराणे पण यमतुताला समजून सांगितल, “की हे महाराजांचे बूट आहेत यामध्ये काही चूक करू नकोस. चमड खूपच किंमती आहे. म्हणून याला खराब करू नकोस. राजाला याचे बूट हवे आहेत, म्हणून तू बूटच बनव.

 

चुकून जर चप्पल बनवलीस, तर राजा खूप क्रोधित होईल आणि आपल्याला कठोर दंड देण्यात येईल.” चांभारानं एवढं समजून सांगितलं, तरी पण यमदूताने जाणून बुजून त्या चमड्यापासून चप्पल बनवले. जेव्हा त्या चांभाराने चप्पल पाहिल त्याचा थर कापच उडाला. तो यम दूताला ओरडू लागला, एवढेच नव्हे तर काठी घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून गेला आणि म्हणाला, “अरे मूर्ख..! तू हे काय केलंस, तुला एवढं समजवून सांगितलं की या चमड्यापासून बूट बनवायचा आहे, पण तू याची चप्पल बनवलीस. आता राजा आपल्याला नाही सोडणार. तू पण मरणार आणि तुझ्याबरोबर मी पण मारला जाणार. तो माझ्या सगळ्या परिवाराला फाशी वरती चढवेल.” चांभाराला अत्यंत दुःखी पाहून यमदूत एकदम जोर जोरात हसू लागला.

 

त्याला हसताना पाहून चांभार म्हणाला, “अरे मूर्ख माणसा सारं काम खराब केलं आणि आता हसतोयस.” तेव्हा यमदूत म्हणाला, ते बघ बूट घेण्यासाठी राजाचा सैनिक येत आहे. सैनिकाला पाहून चांभाराचे हात पाय कापायला लागले. की आता हा बूट मागेल आणि मी कुठून देऊ. तोपर्यंत तो सैनिक जवळ आला आणि म्हणा, “हे चांभार दादा काल मी तुला जे चमड दिलं होतं त्याचे बूट बनवू नकोस, तर चप्पल बनव कारण राजाचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणची ही प्रथा आहे की मरणाऱ्या व्यक्तीला चमड्याचे चप्पल घालून अंतिम क्रिया केली जाते.” सैनिकाच बोलणं ऐकून चांभाराला असं वाटलं की मेलेल्या शरीरात परत जीव आला. त्याच्या हातातील काठी जमिनीवर पडली आणि त्याने यमदूताचे पाय पकडले. आणि त्याची माफी मागू लागला. चांभाराच्या या व्यवहारावर यमदूत खूप जोर जोरात हसत होता. चांभाराने विचारलं, “तू का हसत आहेस?” तेव्हा यमदूत म्हणाला, “वेळ आल्यानंतर मी माझ्या हसण्याचं कारण सांगेन.” नंतर एके दिवशी चांभाराच्या दुकानामध्ये तीन तरुणी एका म्हातारी बरोबर आल्या होत्या.

 

त्या तिन्ही मुलींचं लग्न होणार होतं. त्या आपल्यासाठी चप्पलच माप देण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींना पाहून यमदूतने ओळखलं, की या त्याच तीन मुली आहेत, ज्यांच्या आईला घेऊन न गेल्यामुळे आज मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे. त्या तिन्ही मुली खूप सुंदर दिसत होत्या. कोणत्यातरी चांगल्या घरात वाढलेल्या दिसत होत्या. तेव्हा यमदूतने त्या म्हातारीला विचारलं, “हे माता या तिन्ही कन्या कोण आहेत?” ती म्हातारी म्हणाली, “यांची आई या लहान असतानाच मरण पावली. यांना कोणाचा आधार नव्हता. म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवल. माझ्याजवळ करोडोची संपत्ती आहे, पण दुर्भाग्य की माझं कोणीच नाही. म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवलं. यांना लिहायला वाचायला शिकवलं. यांचा सांभाळ केला आणि आता खूपच मोठ्या घराण्यात यांचा विवाह होणार आहे.” मुलींचं नशीब पाहून यमदूत विचार करू लागला.

 

परमात्मा जो करतो चांगलंच करतो. जर त्यावेळी या मुलींच्या आईचा मृत्यू झाला नसता तर, या तिन्ही मुलींना खूप गरीब परिस्थितीत दिवस काढावे लागले असते. यांच्या आईच्या मृत्यूमुळेच मुली खूप मोठ्या घराण्याच्या सुना बनत आहेत आणि या म्हातारीच्या करोडो रुपयाच्या संपत्तीची मालकीण पण बनल्या आहेत. हा विचार करून यमदूत पहिल्यांदा केलेला आपला मूर्खपणा आठवून तो यमदूत पुन्हा जोरजोरात हसू लागला. आता तो तीन वेळा हसला होता. यमदूताला जोरजोरात हसताना पाहून चांभार म्हणाला, “आता तू का हसत आहेस, कृपा करून तुझ्या हसण्याचं रहस्य,सांग.” तेव्हा यमदूत म्हणाला, “अरे मी तीन वेळा हसलो आहे. आता मी तुला माझ्या हसण्याचं कारण सांगतो ऐक, “मी एक यमदूत आहे.

 

आत्ता ज्या तीन मुली चप्पलच माप देण्यासाठी आल्या होत्या. जेव्हा या तिघी पण छोट्या होत्या, तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला. या तिन्ही मुलींवरती दया दाखवून मी यांच्या आईचा प्राण घेऊन गेलो नाही. म्हणून यमदेवाने मला श्राप देऊन पृथ्वीवरती पाठवल. मी निवस्त्र एका रस्त्याच्या बाजूला पडलो होतो, तेव्हा तू तुझ्या घरी घेऊन आलास. घरी आल्यानंतर तुझी बायको तुझ्याबरोबर खूप भांडली होती. ते पण यासाठी, की तू तुझ्या मुलांच्या कपड्याच्या पैशापासून माझ्यासाठी कपडे आणि शाल खरेदी केलीस. तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या बायकोला पाहून खूप हसलो होतो. तुझी बायको जे तू माझ्यावरती खर्च केलेस म्हणून ओरडत होती पण तुझी बायको तो लाभ पाहू शकत नव्हतीजो मी आल्यामुळे तुझ्या घराचं नशीब बदलणार होतं. आणि दुसऱ्यांदा मी हसलो ते तुझा मूर्खपणा पाहून, जेव्हा तू मला राजासाठी बुटा ऐवजी चप्पल बनवली म्हणून ओरडत होतास.

 

तू फक्त त्या राजाच्या बुटांचा विचार करत होतास. परंतु तुला हे माहित नव्हतं, की राजा बरोबर काय घडल आहे. सगळ्या गावाला माहित होतं. की राज्याचा मृत्यू झालेला आहे. पण तुझं लक्ष तर राजाच्या बुटावरतीच होत. आपण तेच बघून दुःख किंवा आनंद मानतो जे आपण पाहतो. पण आपण हे नाही पाहत जे आपल्याला दिसत नाही पण होणार तर तेच असतं. किती वेळा परमात्मा आपल्या चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी आपल्याबरोबर काहीतरी वाईट करतात, पण आपण त्याच वाईट गोष्टीला पाहून परमात्माला कोसू लागतो. आपण त्या चांगल्या गोष्टीला नाही पाहू शकत ज्या भविष्यात आपल्याबरोबर होणार असतात. कितीतरी वेळा आपल्याबरोबर चांगलं होतं, पण भविष्यात आपल्याबरोबर वाईट होतं. त्या गोष्टीला आपण नाही पाहत.

 

कोणत्या गोष्टी बरोबर चांगलं किंवा वाईट हे दोन्ही ही प्रकारचे परिणाम एकमेकांशी जोडलेले असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेळेच समजून चाललं पाहिजे.” तर मित्रांनो चांगले लोक दुःखी का राहतात? याची दोन्ही कारण हेच आहेत, की पहिल्यांदा चांगल्या लोकांबरोबर वाईट होतं, कारण नंतर त्यांच्याबरोबर खूप चांगलं होणार असतं आणि दुसरं कारण आहे की, मनुष्याबरोबर जेव्हा वाईट होतं, तेव्हा तो देवाजवळ जातो. देवाचं नामस्मरण करतो. ज्यामुळे त्याच सर्व पाप आणिदोष नष्ट होतात. ईश्वरची भक्तीच मुक्तीचा खरा मार्ग आहे. जी चांगला लोकांनाच देवाचं नामस्मरण करण्याची पुन्हा पुन्हा संधी मिळते. अशा प्रकारे यमदुत त्या चांभाराला ही शिकवण देऊन तिथ तिथून यमलोक निघून गेला.

 

अशाप्रकारे या कथेतून आपल्याला चांगल्या व्यक्तीसोबत वाईट आणि वाईट व्यक्ती सोबत चांगले का होते याचे उत्तर मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *