मित्रांनो, आपला हिंदू धर्मशास्त्र मधील सर्वात मोठा सण दिवाळी. हा दिवाळी सण आपण वसुबारस पासून भाऊबीज पर्यंत साजरा करत असतो. या दिवाळीचा सण प्रत्येक खूप उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसांमध्ये आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो व दिव्यांनी सर्व घर उजळून टाकत असतो. अशा या मोठ्या सनामध्ये आपल्याला काही वस्तू इतरांना देणे टाळायला हवेत. कारण या वस्तू जर आपण इतरांना दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाईल व आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होईल. त्याचबरोबर काही पदार्थ खाणे देखील टाळायला हवेत. याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
दिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. कारण या दिवाळीमध्ये संपूर्ण घरामध्ये आपण दिव्यांनी रोषणाई करत असतो व माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो. या सणांमध्ये आपण माता लक्ष्मी स्वरूप असलेल्या सर्व वस्तूंची पदार्थांची पूजा केली जाते. ह्या सणाच्या दोन कहाण्या आपण लहानपणापासून ऐकत आलेला आहोत. त्यातली पहिली म्हणजे ज्यावेळी प्रभू श्री राम रावणाचा वध करून आयोध्या मध्ये बारा वर्षाच्या वनवासानंतर परत आले तर त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी ही दिव्यांनी उजळली होती.
दुसरी कहाणी म्हणजे ज्यावेळी समुद्रमंथन करण्यात आले त्यावेळी त्या मंथनातून माता लक्ष्मी देखील प्रकट झाल्या होत्या. त्यासाठी हा देखील सण साजरा केला जातो. या सणाला खास करून माता लक्ष्मीची संपूर्ण आराधना केली जाते. त्यांची पूजा केली जाते आणि माता लक्ष्मी स्वरूप असलेल्या सर्व पदार्थांची वस्तूंची देखील पूजा या दिवशी केली जाते. म्हणून या दिवाळीच्या सणामध्ये आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप असलेल्या कोणत्याही वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत.
जर आपण असे केले तर आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते व लक्ष्मी वास करून लागते आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र व अनेक आर्थिक अडचण उद्भवू शकते. म्हणून आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप असलेले झाडू कोणालाही द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर साखर, मीठ व तेल या वस्तू देखील कोणालाही द्यायच्या नाही आहे. त्याचबरोबर आपण या दिवाळीमध्ये धनाची पूजा करत असतो. धने देखील आपण कोणालाही द्यायचे नाही आहेत. त्याचबरोबर या दिवाळीच्या सणांमध्ये आपल्याला काळा रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाही आहेत व कोणत्याही प्रकारचे वाद विवाद आपल्याला कोणासोबतही करायचे नाही आहे.
घरातील वाहततावरण अगदी प्रसन्न नाही ठेवावे. घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद-विवाद होऊ देऊ नये. त्याचबरोबर लहान मुलांना देखील भांडणापासून लांब ठेवावे. लहान मुलांच्या देखील भांडणे होणार नाही त्याची दक्षता घ्यावी. कारण ज्या ठिकाणी शांतता व स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण असते त्याच ठिकाणी लक्ष्मी वास करत असते. त्याचबरोबर आपलाला या दिवसांमध्ये काही पदार्थ खाणे देखील वर्ज करायचे आहेत. त्यातील पहिला आहार म्हणजे मासाआहार आपल्याला या दिवाळीच्या सणांमध्ये अजिबात खायचा नाही आहे.
त्याचबरोबर तामसिक पदार्थ ज्यामध्ये लसूण आणि कांदा यांचा समावेश होतो. त्यांचे देखील आपल्याला अजिबात सेवन करायचे नाही आहे व मसूर डाळ याचे देखील सेवन करायचं नाही आहे. त्याचबरोबर या दिवसांमध्ये आपल्याला बाजारातून या दोन भाज्या देखील आणायचं नाही आहेत. त्या म्हणजे कोबी व दुसरी भाजी म्हणजे वांगी या दोन्ही भाषा देखील आपल्याला खाली टाळायचे आहे व घरात आणणे देखील टाळायचे आहे.
दिवाळी हा सण लक्ष्मी देवीच्या स्वागताचा असतो. लक्ष्मी देवीला स्वच्छता प्रिय असल्याने घर स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे. विशेषत: दिवाळीच्या आधी घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. लक्ष्मी पूजनाच्या आधी स्वच्छता करणे शुभ मानले जाते. दिवाळीच्या संध्याकाळी घरात दिवे लावणे अनिवार्य आहे. ही परंपरा नुसते शोभेकरता नाही, तर या दिव्यांनी घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. तेलाचे दिवे आणि पणत्या घराच्या सर्व ठिकाणी लावून घरातील अंधकार दूर करा.
दिवाळीच्या शुभ दिवशी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. गरजूंना अन्न, कपडे, किंवा पैसे दान करून त्यांना मदत करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते. धार्मिक मान्यतेनुसार, दान केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते. दिवाळी हा सण आपल्या जीवनात प्रकाश, आनंद, आणि समृद्धी घेऊन येतो. या दिवशी काही चुकांपासून स्वतःला दूर ठेवणे आणि योग्य उपाय करणे लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने आपल्या घरात संपन्नता आणू शकते. सणाच्या उत्साहात शांतता, स्वच्छता, आणि भक्तीभाव कायम ठेवून दिवाळी साजरी करावी.
अशाप्रकारे दिवाळी संपेपर्यंत आपल्याला या गोष्टी अजिबात करायचा नाही आहे.