मित्रांनो, विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्यासारख्या वाटत असतील तर आज आपण विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. परंतु मित्रांनो शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.
मित्रांनो जर एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि अडचणीच्या ठिकाणी हात घालता आणि मग अचानक खूप वेदांनांनी हात मागे घेता. वेदना इतक्या भयानक असतात की आपल्याला लगेच कळते आपल्याला विंचू चावला आहे. अर्थात जर तुम्ही डॉक्टरांकडे पोहचू शकत असाल तर पहिल्यांदा ते करावे. केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नये. प्रथमोपचार म्हणून तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता आणि विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात.
पण मित्रांनो अशा वेळी घाबरून न जाता आपण त्यावर काही घरगुती उपाय केले तर यामुळे विंचूचे विष आपल्या शरीरामध्ये पसरत नाही. ते लगेच उतरते. विंचू चावल्या मुळे ज्या वेदना होतात त्या वेदना देखील कमी होतात. तसेच तुम्हाला लगेच आराम देखील पडतो. तर मित्रांनो तुम्ही शेतामध्ये काम करत असताना किंवा इतरत्र कुठेही काम करत असताना जर अचानकपणे तुम्हाला विंचू चावला तर अशावेळी मित्रांनो आपण आपल्या घरामध्येच काही उपाय नक्की करू शकतो
मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जी वनस्पती लागणार आहे त्या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे आघाडा आघाडा आपल्याला सहजपणे कुठेही मिळून जाऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला साप किंवा विंचू चावला तर त्यासाठी तुम्ही दवाखान्यांमध्ये जाऊ पर्यंत खूप वेळ होतो व त्याचे विष आहे ते तुमच्या शरीरामध्ये आत मिक्स व्हायला देखील सुरुवात होते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर घरगुती उपाय केला तर तुमच्या वेदना देखील कमी होणार आहेत व तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत
मित्रांनो जर तुम्हाला सापाने चावले असेल तर त्या ठिकाणी ती व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला सापाने चावलेले आहे त्या ठिकाणी एका कापडामध्ये आघाड्याचे पाने घालून ते बांधून घ्यायच आहे याच्यामुळे विष आत मध्ये प्रवेश करत नाही म्हणजेच की शरीराच्या आत मध्ये विष जात नाही आघाड्याची आपल्याला सात ते आठ पाने घ्यायचे आहेत व त्याचे एकदम चेचून बारीक मिश्रण करून घ्यायच आहे व त्याचा जो काही रस निघालेला आहे तो कानामध्ये आणि नाकामध्ये घालायचा आहे तुम्हाला फक्त एकच वेळेस हे कानामध्ये आणि नाकामध्ये घालायचे आहे आणि थोड्या थोड्या वेळाने याचा रस देखील तुम्हाला प्यायचा आहे चार ते पाच थेंब तुम्हाला फक्त याचा रस प्यायचा आहे
मित्रांनो जर तुम्हाला विंचू ने चावले असेल तर या ठिकाणी तुम्हाला आघाड्याची पाने घ्यायची आहेत व ते कापडाच्या मदतीने पाने ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी तुम्हाला बांधून घ्यायच आहे आणि याचा रस देखील काढून घ्यायचा आहे व तो रस ज्या ठिकाणी विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावायचा आहे तर मित्रांनो साधे सोपे असे हे उपाय तुम्ही आवश्य करून बघायचे आहेत.