खर्च फक्त दहा रुपये आणि पहा वांग, काळे डाग, कायमचे मुळापासून नष्ट, होऊन चेहरा एकदम चार चौघात १००% उठून दिसणार फक्त दहा रुपयांत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटतच असते. आपण कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर तेथे आपण आकर्षक दिसावे असे वाटत असते. परंतु मित्रांनो काही वेळेस आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा म्हणजेच काळे डाग हे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा बनत असतात. आपण अनेक क्रीम्स लावतो. अनेक उपाय करतो. डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. परंतु मित्रांनो एवढे उपाय करून देखील आपणाला काहीच फरक पडत नाहीत. म्हणजेच त्या क्रीमचा उलट आपणाला साईड इफेक्ट देखील आपल्या चेहऱ्यावरती जाणवतो.

मग आपण कोणत्याही क्रीम्स किंवा उपाय करत नाही. परंतु मित्रांनो प्रत्येकालाच आकर्षक दिसावे असे वाटतच असते. तर मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग नष्ट करणारा असा घरगुती उपाय सांगणार आहे. या उपायासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. अगदी जास्तीत जास्त आपल्याला फक्त दहा रुपये खर्च येणार आहे.

परंतु मित्रांनो हे दहा रुपयेमध्ये आपणाला आपला चेहरा हा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे. तर मित्रांनो चला तर मग हा जाणून घेऊयात नेमका कोणता हा घरगुती उपाय आहे तो.

तर मित्रांनो या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि त्याचे प्रमाण किती घ्यायचे आहे याविषयी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो या उपायासाठी पहिला जो घटक लागणार आहे तो आहे दही. तर आपणाला यामध्ये दोन चमचा दही घ्यायच आहे. मित्रांनो हे दही आपण घरात लावावे. बाहेरून आणलेले दही आपण यामध्ये वापरू नये. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावरती क्लिजिंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे मित्रांनो घरी लावलेले दोन चमचा दही आपल्याला घ्यायचे आहे.

तर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसन पीठ. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की, बेसन पीठ हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. लहान बाळांना देखील बेसन पीठाणे चोळून अंघोळ घातली जाते. तर हे बेसन पीठ आपल्याला एक चमचा घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला यामध्ये एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे.

मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही वांगांचे डाग असतील किंवा काळे डाग असतील ते दूर करण्यासाठी लिंबूचा खूपच फायदेशीर असा उपयोग होतो.

तर मित्रांनो दोन चमचा दही, एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा लिंबूचा रस आपणाला हे घटक एकत्रित मिक्स करायचे आहेत. हे तिन्ही पदार्थ एकत्रित मिक्स केल्यामुळे याचे सर्व गुणधर्म एकत्रित होतात. यानंतर जो पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे तो म्हणजे हळद.

आपणाला पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद या तयार केलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे. हळदीचे देखील आपल्याला खूपच फायदे होतात. स्कीनसाठी हळद खूपच फायदेशीर ठरते. पी हळद हो गोरी अशी म्हण देखील तुम्ही ऐकली असेल. तर पाव चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही हळद घ्यायची आहे आणि आपण मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये ही हळद देखील मिक्स करायची आहे.

या तयार झालेल्या मिश्रणाने म्हणजेच फेस पॅकने आपणाला फेस मसाज करायचा आहे. फेस मसाज हा वेगवेगळ्या प्रकाराने केला जातो. पहिल्यांदा आपणाला आपला चेहरा थोडासा ओलसर करायचा आहे आणि जे काही आपण मिश्रण बनवलेला आहे म्हणजेच दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, अर्धा चमचा लिंबूचा रस आणि पाव किंवा अर्धा चमचा हळद टाकून जे मिश्रण आपण तयार केलेले आहे म्हणजे जी पेस्ट तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे.

नंतर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी म्हणजेच डोळ्याखाली किंवा संपूर्ण चेहऱ्यावरती काळे डाग, वांग असतील तेथे तुम्हाला ही पेस्ट लावून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटे आपल्या चेहऱ्यावरती हळुवारपणे मसाज करायचा आहे. दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही हा मसाज केल्यानंतर तुम्हाला अर्धा तासभर हे फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती तसेच राहू द्यायचे आहे.

नंतर अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारच्या सुरकुत्या आल्यासारखे जाणवेल. नंतर तुम्हाला थंड पाण्याने आपला चेहरा धुवायचा आहे आणि तुम्हाला त्यावेळेस नक्की जाणवेल की, आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच प्रकारचा ग्लो आलेला आहे.

तर मित्रांनो असा हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून एक वेळा तरी लावायचा आहे. हा एकदम कमी खर्चिक असा घरगुती उपाय आहे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काही काळे डाग असतील, वांग असतील हे सर्व काही दूर होणार आहेत. तर हा असा घरगुती, आयुर्वेदिक उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *