मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे किंवा चेहऱ्यावरती केमिकलयुक्त फेस वॉश लोशन क्रीम लावल्यामुळे देखील चेहऱ्यावरती वांग येऊ शकतात. चेहऱ्यावर पिंपल सुटल्यामुळे चेहऱ्यावरती काळे डाग येतात. मित्रांनो वेगवेगळी कारणं असतील पण चेहऱ्यावर वांग येतात, काळे डाग येतात आणि त्यामुळे सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते आणि प्रत्येकालाच वाटतं माझा चेहरा सुंदर मुलायम असावा. म्हणून मित्रांनो त्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आपण स्वस्तामध्ये एक रुपयांपेक्षाही कमी खर्च आहे आणि सर्वांना करता येण्याजोगा हा उपाय आहे.
आणि मित्रांनो वांग येण्याची कारण ही अनेक आहेत. मग ते पोटाचे विकार असतील, उन्हात फिरणे असेल, केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला लावणे तसेच प्रदूषण असे हार्मोन्स बॅलन्स असेल किंवा त्याची वेगळी कारणे असतात. चेहऱ्यावरील पिंपल्स फोडल्यामुळे देखील चेहऱ्यावरती काळे डाग येतात. पिंपल्स, काळे डाग, मुरूम घालवण्यासाठी साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला लिंबू, कोरफड, ताक हे सर्व पदार्थ लागणार आहेत. हे तिन्ही पदार्थ आयुर्वेदामध्ये सुंदरतेसाठी वापरले जातात आणि त्याला खूप महत्त्व आहे. आज आपण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत.
मित्रांनो, आपल्याला कोरफडीचा गर लागणार आहे. कोरफड विकतही मिळते. पण त्यात काय भेसळ असेल तर तुमच्या स्किन ला प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी आपण एका छोट्या छोट्या कुंडीतही कोरफड लावू शकता या कोरफडीचे एक पान घ्या. वरची साल काढून गर एका डिश मध्ये घालून व्यवस्थित ढवळून त्याचे जेल तयार करून घ्या. यामध्ये चार चमचे ताक आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. हे तिन्ही पदार्थ एकजीव करून घ्या हा तयार झाला तुमचा फेसपॅक.मित्रांनो वापरलेली सर्व पदार्थ एंटीबॅक्टरियल, एंटीफंगल, एंटीइनफ्लीमेंट्री असे उपयुक्त घटक असतात. आपली त्वचेचे आरोग्य व्यवस्थित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मित्रांनो, हे तयार झालेलं मिश्रण चेहऱ्यावर ती लावायचं कसं ते आपण पाहणार आहोत. प्रथम तुम्ही चेहरा साबणाने किंवा फेसवॉशने स्वच्छ धुऊन घ्या. टॉवेलने व्यवस्थित कोरडा करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावरती जिथे पिंपल्सचे डाग असतील किंवा वांग असेल त्या ठिकाणी हे मिश्रण बोटाने लावा लावताना ते सर्क्युलर मोशन मध्ये किंवा वर्तुळाकार मध्ये बोट गोल गोल फिरवत लावा. पाच मिनिटे मसाज काय त्यानंतर चेहरा अर्धा तास तसाच राहू द्या. अर्ध्या तासानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि टॉवेलने टिपून घ्या हा उपाय तुम्ही चेहऱ्यावरील वांगाचे डाग जाईपर्यंत करायचा आहे.
मित्रांनो, डोळ्याखालील काळी वर्तुळे असतील गालावर कुठे नाकावर काळे डाग असतील तर ती जाणार आहे. तर ते दोन ते तीन दिवसांमध्ये सलग सात दिवस तुम्ही हा उपाय करा. दोन-तीन दिवसांनी तुम्हाला फरक जाणवेल पण एक आठवडा हा उपाय करा तुम्ही कायमचे काळे डाग जाणार आहेत.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.