तुळशीची पूजा या तीन महिलांनी अजिबात करू नये ; नाहीतर लागते महापाप ! खूपच उपयुक्त अशी माहिती श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकाच्या घरात दररोज नित्य नियमाने माता तुळशीची पूजा केली जाते. घरातील महिला रोज संध्याकाळच्या वेळेस आपल्या तुळशीजवळ तुळशीवृंदावनात जवळ दिवा लावत असतात आणि सकाळच्या वेळेस तुळशीमध्ये पाणी अर्पित करत असतात म्हणजे जल अर्पित करत असतात. ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घराची बरकत होते. घरात धनसंपत्तीची कमतरता राहत नाही. लक्ष्मीची वास्तव्य राहते आणि उद्योग व्यवसाय नोकरी धंद्यात प्रगती ही होतेच होते. ज्या घरासमोर तुळशीचे रोपट असतं त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तसेच त्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात. तुळशीत असे अनेक औषधी गुणधर्म आहेत की, ज्यामुळे आधुनिक विज्ञानाने सुद्धा तुळशीचे महत्त्व मान्य केलेल आहे. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. आयुर्वेदातही तुळशीला, तुळशीच्या पानांना आणि तुळशीच्या बियांना महत्त्व आहे. तुळशीचे अनेक प्रकार असतात राम तुळस, शाम तुळस म्हणजेच कृष्ण तुळस आणि इतरही अनेक प्रकार मात्र आपल्या घरासमोर लावण्यासाठी राम तुळस किंवा श्याम म्हणजेच कृष्ण तुळस ही सर्वोत्तम मानली जाते.

मित्रांनो तुळशीचे पूजन जरी अत्यंत महत्त्वाचा असलं तरी सुद्धा अशा तीन महिला आहेत की ज्यांनी चुकूनही माता तुळशीची पूजा करू नये. अशा महिलांनी एकदा तुळशीची पूजा केली तर त्यांना पाप लागू शकतं.

मित्रांनो ज्या महिलांचा मासिक धर्म सुरू असतो त्या महिलांनी तुळशीची पूजा करू नये. अगदी महाभारत काळापासून एक प्रथा आणि परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. त्यानुसार मासिक धर्माच्या वेळी स्त्रियांची राहण्याची वेगळी व्यवस्था केली जाते. स्त्रियांना कोणत्याही स्वरूपाच्या धार्मिक कार्यात समाविष्ट केले जात नाही. धार्मिक कार्य किंवा पूजा पाठ किंवा देवपूजा त्यांना करता येत नाही. मासिक धर्म सुरू असताना तुळशीची चुकूनही पूजा करू नये कारण अशा प्रकारे केलेली पूजा ही अमान्य तर होतेच याउलट त्या महिलांना माता तुळशीच्या क्रोधास सामोरे जावे लागते आणि त्या महापापाच्या भागीदार बनू शकतात.

मित्रांनो, अनेक स्त्रियांनाही सवय असते की ज्या ठिकाणी तुळशी वृंदावन असतं त्या ठिकाणी त्या स्वतःचे केस विंचरतात किंवा त्या ठिकाणी धुतलेले कपडे वाळत घालतात. तसेच अजून एक वाईट सवय म्हणजे माता तुळशीजवळ किंवा तुळशी वृंदावनाजवळ मॉप म्हणजेच पोछा ठेवण्याची सवय. या सवयी अत्यंत वाईट आहेत. ज्या स्त्रियांना ज्या महिलांना अशा सवयी आहेत त्यांची पूजा माता तुळशी कधीच मान्य करत नाही. याउलट अशा स्त्रिया पापाच्या भागीदार बनतात.

मित्रांनो फ्लॅट संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनासाठी जागा नसते अशी लोक गॅलरीत किंवा बाल्कनीत एका कुंडीत तुळशीचे रोप लावतात. तुळशीचं रोप असेल त्या ठिकाणी केस विंचरणे किंवा त्या ठिकाणी कपडे वाळत घालणे किंवा इतर घाणेरड्या वस्तू किंवा भंगार तुळशीजवळ ठेवणे या गोष्टी आपण कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे.

मित्रांनो स्त्री असो किंवा पुरुष असो ही व्यक्ती चरित्रहीन असेल तर हे कृत्य धर्माच्या विरुद्ध आहे. तसंच जी व्यक्ती सतत दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार करते. दुसऱ्या बद्दल मनामध्ये द्वेष आणि मत्सर करत असतो अशा व्यक्तीने माता तुळशीचे पूजन करू नये. मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून तुळशी मातेची पूजा केली पाहिजे. कारण केवळ स्वच्छ आणि निर्मळ मनाने केलेली पूजाच माता तुळशीला मान्य होते.

मित्रांनो वरील तीन प्रकारचे व्यक्ती सोडल्यास कोणत्याही व्यक्तीने मनोभावे केलेली पूजा तुळशी मातेला मान्य होते. माता तुळस तुमच्यावरती प्रसन्न होते.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *