मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना गुडघेदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या समस्या असतात आणि या समस्या दूर व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण मित्रांनो ज्या व्यक्तीला कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यांसारखे त्रास असतात त्या व्यक्तीला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी देखील करणे अवघड होत असतं. त्यांना या दुखण्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. अशावेळी हे लोक डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टरांकडून त्यांना महागडी औषधे लिहून दिली जातात. परंतु इतकी महाग औषधे घेऊन सुद्धा आपल्यातील बऱ्याच जणांना त्याचा चांगला परिणाम दिसून येत नाही.
तर मित्रांनो अशावेळी डॉक्टरांनी लिहून दिलेली महागडी औषधे घेण्यापूर्वी जर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे आपल्या या वेदनेपासून आपल्याला नक्की आराम मिळू शकतो. तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबर दुखी यांसारख्या सर्व समस्यांपासून आपली सुटका होईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा आजचा प्रभावी उपाय.
मित्रांनो आज जो आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय पाहणार आहोत ह्या उपायांमध्ये आपल्याला एका तेलाने संपूर्ण शरीराची ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत त्या त्या ठिकाणी मालिश करायचे आहे. मित्रांनो या तेलामध्ये आपल्याला काही घटक सुद्धा मिक्स करायचे आहेत की, ज्यामुळे या तेलाचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम जास्त चांगल्या पद्धतीने होईल. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत ते तेल आणि त्यामध्ये कोणते घटक मिक्स करून आपल्याला त्या तेलाने आपल्या संपूर्ण शरीराची मालिश करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती. मित्रांनो हे तेल तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी एका कढईमध्ये साथ ते आठ चमचे तिळाचे तेल घ्यायचे आहे.
मित्रांनो आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना नष्ट करण्यासाठी हे तिळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दुसरा पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे ते म्हणजे आलं. आलं हे वेदना नाशक म्हणून काम करतं आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना दूर करण्याचे काम हे आलं करत असतं आणि यासाठीच हा उपाय करत असताना आपल्याला दोन चमचे आलं घ्यायचा आहे. मित्रांनो सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ चमचे तिळाचे तेल घ्यायच आहे. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे आलं आणि त्याचबरोबर एक चमचा लवंग सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायच आहे. मित्रांनो लवंग सुद्धा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी मदत करत.
त्यानंतर पुढचा घटक जो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे ते म्हणजे एक चमचा मेथी दाणे आणि एक चमचा लसूण, एक चमचा वेलची, एक चमचा जवस, आणि दोन चमचा तेजपान. मित्रांनो सर्व पदार्थ आपल्याला या तिळाच्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे तेल आपल्याला गॅसवर व्यवस्थितपणे उकळून घ्यायचे आहे. हे तेल उकळल्यानंतर आपल्याला ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर हे तेल आपल्याला गार करण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे तेल गार झाल्यानंतर पुन्हा एकदा ते गॅसवर तापवण्यासाठी ठेवायच आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका कापराचा चूरा आपल्याला टाकायचा आहे.
मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे आयुर्वेदिक तेल तयार झालेले आहे. मित्रांनो दररोज झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या शरीराच्या ज्या भागांना वेदना होत आहेत किंवा गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही ह्या तेलाने दररोज रात्री झोपण्यापूर्वी मालिश केली तर यामुळे तुमच्या गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्यांपासून त्वरित आराम मिळेल. मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने आयुर्वेदिक तेल तयार करून जर तुम्ही त्या तेलाने दररोज मालिश केली तर यामुळे तुमच्या कंबर दुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यांसारख्या समस्यांपासून कायमचीच सुटका होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.