मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा सामान करावा लागतो. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.
मित्रांनो ज्यावेळी आपण आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला त्यावर महागडी औषधे लिहून देतात किंवा एखादी सर्जरी करायला सांगतात. परंतु मित्रांनो अनेकदा आपल्याला ही सर्जरी करून घेणे किंवा ही औषधे घेणे परवडत नाही.
जरी आपण ही औषधी घेतली किंवा डॉक्टरांची सर्जरी देखील आपल्या चेहऱ्यावर करून घेतली तरीही त्याचा काही परिणाम होत नाही किंवा अनेकदा त्याचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर होतो. म्हणूनच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
म्हणूनच मित्रांनो जर आपण अशा आपल्या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा किंवा महागडी औषधी घेण्या अगोदर आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या लवकरात लवकर दूर होऊ शकतात.
तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग आपण कशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहिती नुसार घालवू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला महत्त्वाचा जो एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. मित्रांनो तांदूळ हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतं आणि त्याचाच उपयोग करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो कसा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि या तांदळाचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया.
तर मित्रांनो सर्वात आधी उपाय करत असताना तुम्हाला एक चमचा तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करताना दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दही. मित्रांनो एक चमचा दही सुद्धा आपल्याला या उपायसाठी लागणार आहे. मित्रांनो यामध्येही जास्त प्रमाणात अँटी बॅक्टरियल घटक असतात आणि म्हणूनच त्याचा वापर आपण या उपायासाठी करायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टोमॅटोची सुद्धा आवश्यकता आहे. मित्रांनो एक टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ करून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या साह्याने आपल्याला त्या टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक वाटेवर तांदूळ सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे.
म्हणजेच जे तांदूळ आपण घेतलेले होते ते आपल्याला पावडर स्वरूपात दोन चमचे तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच तांदळाची दोन चमचे पावडर सुद्धा आपल्याला या उपायासाठी करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे अर्धा लिंबूचा रस.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला एक ते दोन चमचा दही घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा तांदळाची पावडर जी आपण तयार केली होती ती घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन चमचा टोमॅटोची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती घ्यायची आहे.
सर्वात शेवटी एक चमचा किंवा अर्धा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला याची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो ही पेस्ट कापसाच्या साहाय्याने आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि वीस ते तीस मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे. काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावर असणारे सर्व काळे डाग, सुरकुत्या, वांग, मुरूम निघून जातील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.