चांगलं वागून सुद्धा लोक तुमच्याशी वाईट वागत असतील तर काय करायच ? श्री स्वामीं समर्थानी दिले हे उत्तर ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो बऱ्याचदा असे घडते की आपण कितीही चांगले वागले तरी आपल्याशी काही लोक वाईटच वागत असतात. कधी कधी अशी वेळ येते की या जगात कसं वागायचं तेच कळत नाही. कुणाशी कसं बोलायचं हे समजत नाही. जास्त चांगलं वागायला गेलो तर काही लोक त्रास देतात. आपल्या कामामध्ये आडकाठी आणतात आणि जास्त वाईट वागलो तरी लोक नाव ठेवतात. मनात बरेच प्रश्न येतात आपण समोरच्या व्यक्ती बरोबर चांगले वागतो पण त्याच व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतात. नक्की कुणाशी आणि कसं कोणत्या पद्धतीने कसं वागावं याचा प्रश्न पडतो. चांगलं काय आणि वाईट काय कळत नाही.

मित्रांनो यासाठीच आपण एका गुरूने शिष्याला सांगितलेल्या एका कथेची माहिती आजच्या या लेखामध्ये करून घेणार आहोत. ती कथा कोणती आहे ती आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो एके दिवशी नदी किनारी एक शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो तुम्ही आम्हाला एवढी चांगली शिकवण देता पण या जगात आम्ही वागायचे कसे ? आम्ही जास्त चांगले वागण्याचा प्रयत्न केला तरी लोक त्याचा फायदा घेतात. आमच्या कामांमध्ये अडचणी निर्माण करतात. आजच्या काळात चांगले काम करण्याची सुद्धा लोक निंदा करतात. आम्ही वागावे तरी तरी कसे आणि जगावे तरी कसे ? गुरुदेव कृपया आम्हाला मार्गदर्शन करा.

यावर गुरु म्हणतात मी तुम्हाला गोष्ट किंवा कथा न सांगता तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवतो त्यामुळे तुम्हाला कसे जगायचे याचा गुरुमंत्र समजेल.

गुरु तीन समान काठ्या घेतात. त्यामधली पहिली काही शिष्याला देतात आणि ते म्हणतात या काठीला समोर काटा लावून आणि त्या काट्याला पीठ लावून मासे पकडून घेऊन ये. म्हणून शिष्य त्या काठीला काटा लावून ती काठी पाण्यात टाकतो थोड्याच वेळात मासा अडकतो. गुरु शिष्याला म्हणतात शक्ती लावता येईल तेवढी लाव. म्हणून शिष्य आपली पूर्ण ताकत लावून बाहेर काढतो. पण शक्ती लावल्यामुळे ती काठी तुटून जाते.

गुरु मग त्याला दुसरी काठी देतात आणि सांगत की आता मासा गळाला लागला तर जास्त ताकद लावू नकोस. शिष्य म्हणतो ठीक आहे आणि मग ती काठी पाण्यात टाकतो. आता शिष्य गुरुने सांगितल्याप्रमाणे अजिबात ताकद लावली नाही. त्यामुळे मग तो मासा त्या काठीला आतमध्ये ओढून नेतो.

आता गुरु त्याला तिसरी काठी देतात आणि सांगतात आता तू जास्त पण ताकद लावायची नाही आणि कमी पण लावायची नाही. शिष्य गुरूने सांगितल्याप्रमाणे जास्त किंवा कमी ताकद लावत नाही आणि आता मासा बरोबर पकडला जातो.

गुरु त्या शिष्याला विचारतात की या कृतीवरून तुला काही समजले का ? शिष्य म्हणतो मला तर काहीच नाही समजले नाही. तेव्हा गुरु म्हणतात, हे जग असेच आहे जेव्हा तू अजिबात शक्तीचा प्रयोग करणार नाही तेव्हा लोक तुला कमजोर समजतील आणि तू जास्त शक्तीचा प्रयोग करशील तर लोक तुझी निंदा चालू करायला सुरुवात करतील की हा माणूस चांगला नाहीये. पण तू स्वतःच्या रक्षणासाठी, लोकांच्या भल्यासाठी काही काम करत असशील तरी लोक तुला विरोध करत असतील, तुझ्या मार्गामध्ये आडकाठी निर्माण करत असतील, तर तिथे आवश्यक असलेल्या शक्तीचा उपयोग करणे अधिक योग्य आहे.

तेव्हा तु तुझे काम करू शकतो पण तू असाच गप्प बसून राहशील तर आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस. त्यामुळे गरज असेल तिथे शक्तीचा वापर करणे अधिक योग्य आहे. जास्त चांगलं वागायचा प्रयत्न करशील तर लोक त्याचा फायदा उचलतात आणि जास्त वाईट होशील. म्हणून लोकं सांगतील तसं न वागता तुम्ही मधला रस्ता आहे त्याचा वापर करायला शिका.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही कोठेही संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *