मित्रांनो, आपल्यापैकी बरेचजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी स्वामींची सेवा ती अगदी मनोभावे व श्रद्धेने करीत असतात. मित्रांनो स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि कोणत्याही संकटातून ते आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रत्येक स्वामी भक्तांना असतोच. तर मित्रांनो गुरुवारचे जे व्रत असते म्हणजेच आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो. तसेच अनेक जण हे दररोज म्हणजे आठवड्यातून येणारा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी व्रत हे करीतच असतात. परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे? त्याची मांडणी कशी आहे? याविषयी सांगणार आहे.
मित्रांनो स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत केल्याने अनेक भक्तांना याची प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो आपण ज्यावेळेस स्वामींचे ११ गुरुवारचे व्रत करणार आहोत त्याच्या अगोदर आपणाला संकल्प करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा याविषयी जाणून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस स्वामींचे 11 गुरुवार करणार आहात त्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला बुधवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी गुरुवार करायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी म्हणजे गुरुवारी. बुधवारी किंवा गुरुवारी तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचे आहे.
जर तुमच्या घराजवळ दत्त महाराजांचे मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील गेला तरीही चालत आणि जाताना मित्रांनो आपणाला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचे आहे आणि स्वामी समर्थांपुढे तुम्हाला ही खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थांना सांगायचे आहे की मी उद्यापासून म्हणजे जर तुम्ही बुधवारी केंद्रामध्ये गेला असाल तर उद्यापासून म्हणायचे. जर तुम्ही गुरुवारीच गेला असाल तर आजपासून तुमचे अकरा गुरुवारचे व्रत करायला सुरुवात करणार आहे. तर ही सेवा मी मनोभावे करीन आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. असे आपण स्वामींना सांगायचे आहे.
तर मित्रांनो असा हा संकल्प आपल्याला मंदिरात करायचा आहे आणि घरात आल्यावरही आपणाला संकल्प करायचा असतो. तर मित्रांनो प्रथम आपणाला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही स्वामींचे ११ गुरुवारची व्रत करणार आहात त्याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे.
त्या पाठावर आपणाला कोणत्याही रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. परंतु काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात अंथरायचे नाही. तसेच आपल्या स्वामी समर्थांना आणि दत्त महाराजांना पिवळा रंग आवडतो. तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील पाठावर अंथरू शकता.
मित्रांनो त्या चौरंगावर किंवा पाठावर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो ठेवायचा आहे. जर मित्रांनो तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्हाला तो खरेदी करून आणावा लागेल. तर मित्रांनो स्वामी समर्थांचा फोटो ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या उजव्या हाताला तुम्हाला घंटा ठेवायची आहे.
शंख आणि घंटा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दोघांच्या मध्ये प्रसाद ठेवायचा आहे. अगदी तुम्ही दूध साखरेचा प्रसाद ठेवू शकता किंवा फक्त साखर जरी ठेवली तरीही चालते.
एका ग्लासमध्ये आपल्याला थोडेसे पाणी ठेवायचे आहे आणि एखादे फळ देखील आपण स्वामींच्या पुढे ठेवायचे आहे. जो दूध साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे त्यामध्ये आपणाला तुळशीपत्र घालायचे आहे. तसेच मित्रांनो तुमच्याकडे स्वामी समर्थांचे सारामृत हा ग्रंथ असायला हवा. हा ग्रंथ देखील तुम्हाला स्वामींसमोर ठेवायचे आहे.
तसेच जपमाळ आपल्याला स्वामींच्या समोर ठेवायचे आहे. तसेच मित्रांनो एका कागदावरती तुम्ही तारक मंत्र लिहून तो कागद तुम्हाला स्वामींच्या पुढे ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पूजेची मांडणी करायची आहे. तर मित्रांनो ही पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये संकल्प करायचा आहे.
तर मित्रांनो एक ताम्हण आपणाला घ्यायच आहे आणि मित्रांनो आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये फुल ठेवायचे आहे आणि जी काही आपली इच्छा असेल आणि आपण हे 11 गुरुवारचे व्रत का करत आहोत आपल्या नेमक्या समस्या काय आहेत या सर्व आपणाला स्वामींना सांगायच्या आहेत आणि त्यामुळेच मी अकरा गुरुवारचे व्रत चालू करणार आहे आणि या समस्यातून माझी सुटका व्हावी असे आपण स्वामींना सांगून मनोभावे नमस्कार करायचा आहे.
जे आपले हातातील म्हणजे उजव्या हातामध्ये जे आपण पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला ताम्हनामध्ये सोडायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर तुम्हाला ही पूजा म्हणजेच अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे याविषयी जाणून घेऊ. तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला तारक मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे.
जर मित्रांनो तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही किमान अर्धा तास तरी देखील स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो हा जप करून झाल्यानंतर आपल्याला सारामृत मध्ये एकूण 21 अध्याय असतात आणि हे 21 अध्याय आपणाला या दिवशी वाचायचे आहेत. म्हणजेच पहिल्यांदा तारक मंत्राचा जप 11 वेळेस आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप हा 11 माळी करायचा आहे. तो झाल्यानंतर तुम्हाला सारामृत मधील 21 अध्याय एकाच वेळी वाचायचे आहेत. म्हणजेच एकाच दिवशी वाचायचे आहेत.
तर मित्रांनो या सर्व मंत्रांचा जप आपल्याला एकाच दिवशी करायचा आहे. अनेक जण म्हणतील की सकाळी मी स्वामींचा जप करतो नंतर दुपारी अध्याय वाचतो. परंतु अजिबात हे चालणार नाही. तर मित्रांनो हे सेवा करीत असताना तुम्हाला वेळ काढून या तिन्ही गोष्टी करायच्या आहेत.
बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आम्हाला अडचण आल्यानंतर नेमके काय करायचे? तर मित्रांनो अशा महिलांनी ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस तुम्ही त्या दिवशी गुरुवारचा उपवास करायचा. परंतु तो दिवस तुम्ही त्या अकरा गुरुवार मध्ये अजिबात धरायचा नाही.
तसेच मित्रांनो अनेक जणांना प्रश्न असतो की, आम्हाला बीपी, शुगरचा त्रास आहे आणि आम्ही उपवास कसे करणार तर मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे कधीही तुम्हाला उपवास करण्यास सांगत नाही. तर स्वामी समर्थांना तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा यावर ते खूप खुश होतात.
त्यामुळे मित्रांनो ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालतो. परंतु अगदी मनोभावे व श्रद्धेने मात्र हे सर्व विधी पूजा करायची आहे.
तर मित्रांनो या अकरा गुरुवारची व्रत केल्यानंतर याचे उद्यापन कसे करायचे? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तर मित्रांनो याचे उद्यापन आपणाला अकराव्या गुरुवारी करायच आहे. म्हणजेच अकराव्या गुरुवारी तुम्हाला विधिवत पूजा वगैरे करायची आहे आणि संध्याकाळी मित्रांनो जर तुम्हाला सुवासिनी भेटल्या म्हणजे सात, पाच किंवा 11 सुवासिनींना तुम्ही जेवायला बोलवावे किंवा लहान मुलांना तुम्ही देखील या दिवशी जेवायला बोलवू शकता पाच असू दे साथ असू दे किंवा अकरा.
तर मित्रांनो जर तुम्हाला सुवासिनीना, पाच मुलांना देखील जर जेवण्यास बोलवायचे झाले नाही तर तुम्ही त्या दिवशी पक्षांना अन्न खाऊ घालावे किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथे दक्षिणा देखील ठेवू शकता किंवा एखाद्या गरिबाला देखील तुम्ही त्या दिवशी अन्नदान करू शकता.
तर मित्रांनो अशा प्रकारे स्वामींचे हे अकरा गुरुवारचे व्रत खूपच प्रभावशाली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. यामुळे तुमच्या अडचणी सर्व काही दूर होतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि याची प्रचिती बऱ्याच जणांना आलेली आहे.
मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.