मित्रांनो स्वप्नील हा स्वामी समर्थांचा आपल्यासारखाच एक स्वामींचा सेवेकरी आणि भक्त आहे. आणि मित्रांनो स्वप्निल जोशी हा सुद्धा आपल्या स्वामी समर्थांचे अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा पूजा करत असतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने स्वामींची सेवा करत असताना स्वप्निल जोशीलाही स्वामींबद्दल अनुभव आलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वामींची प्रचिती आलेली आहे, आणि मित्रांनो स्वामींबद्दल स्वप्निल जोशी यांना कोणता अनुभव किंवा कोणती प्रचिती आलेली आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वप्नील जोशी यांच्या शब्दातच आज आपण हा अनुभव सांगणार आहोत.
मित्रांनो एका मुलाखतीमध्ये स्वप्निल जोशी हे आपल्याला आलेल्या स्वामी अनुभवाबद्दल आणि स्वामींचे प्रचिती बद्दल सांगत असताना असे म्हणतात की, स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी बोलण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी आभारी आहे. मला असे वाटते की स्वामींचे आणि माझे नाते हे माझ्या जन्माच्या आधीपासून आहे कारण माझे आईबाबा दोघेही खूप दिवसापासून किंबहुना दशकांपासून स्वामींची सेवा करत आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्यावरची त्यांची श्रद्धा आहे. माझ्या वडिलांचे नाव मोहन जोशी मी त्यांना बाबा म्हणतो. तर बाबा गेली पन्नास वर्षे स्वामींची सेवा करत आहेत. मला आठवत आम्ही गिरगावात झांबवत गावात राहायला होतो. पण तेथे स्वामींचे मंदिर अथवा आज आहेत तशी केंद्रे नवती. कांदेवादी येथे स्वामींचा एक मठ होता.
आणि माझ्या बाबांची दिनचर्या अशी होती की सकाळी उठायचे, आंघोळ करायची. त्यावेळी गिरगावमध्ये पहाटे पाच वाजायच्या आसपास पानी यायचे. पानी वैगेरे आवारल्यानंतर बाबा स्वामींच्या मठात रोज न चुकता दर्शनाला जायचे. मी जेव्हा उठायचो तेव्हा डोळे चोळत आईला विचारायचो,’बाबा कुठे गेले’. बाबा स्वामींचे दर्शन घायला गेलेत हे उत्तर ठरलेले असायचे. आणि कधीकधी मीही पहाटे उठायचो तेव्हा अनेकदा बाबा मला सोबत घेऊन स्वामींच्या दर्शनाला घेऊन जायचे. रामायण आणि महाभारत यामध्ये काम केल्यामुळे धार्मिक आणि अभ्यासू व्यक्तींशी माझा संबंध आला होता. यामुळे माझ्या कानावर देखील चांगले काहीतरी पडायचे आणि कदाचित यामुळेच मला स्वामींची गोडी लागली.
आणि या कलियुगात देवापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपं उपाय म्हणजे नामस्मरण ! मला हे सांगताना खूप छान वाटते की लहानपणापासूनच मी हे सगळं पाहत आलोय, करतही आलोय. माझ्या आईवडिलांची कृपा की मला माहिती आहे की नामस्मरणामध्ये काय विलक्षण ताकद आहे. मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो. पण मी तुम्हाला असे सांगेल की तुम्हाला ज्या पूजनीय देवाचे अथवा संतांचे नामस्मरण करावे वाटत असेल त्यांचे तुम्ही करा. नामस्मरणामुळे विलक्षण अशी ऊर्जा तुम्हाला मिळते. अल्ला, गुरूंनानक, पांडुरंग, बसवेश्वर जो कोणता देव तुमच्या मनात आहे त्याची पूर्ण विश्वासाने आणि मनाने सेवा करा तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही.
मला अनेकदा असे वाटते की भयानक संकटात सापडलो आहे, पुढे काही मार्ग दिसत नाही. समोर अंधार आहे आणि आता आपली यातून सुटका नाही. पण अशा संकटामधून मी सहीसलामत सुटतो. जर तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला त्या या जन्मीच फेडायच्या आहेत. स्वामीभक्तांना माहिती असेलच की, जर आपण काही चुकीचे केले तर ‘फटका’ आपल्याला लगेच मिळतो. आपल्याला लगेच कळते की आपल्या वाईट कामाची शिक्षा स्वामींनी आपल्याला दिली आहे आणि त्यांचे अस्तित्व आपल्याला लगेच जाणवते.
माझ्याकडे सांगायला काही चमत्कार अथवा जगावेगळा अनुभव नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की स्वामींच्या नामस्मरणाने विलक्षण शांति मिळते. तुम्ही व्यायाम करता ना ! मग दिवसातले पाच मिनिटे काढा आणि आत्म्याचा व्यायाम करा. हे पाच मिनिटे तुमच्या आतल्या शांतिसाठी आहेत. या पाच मिनिटात तुम्ही नामस्मरन करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात बादल जाणवेल आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिति बदलायला लागेल. तुमच्यापुढे समस्या असतील पण तुम्ही त्या पार करून तुम्हाला हवी तशी परिस्थिति निर्माण करू शकाल.
स्वामींच्या भक्तीने तुमचे आयुष्य सुखी समाधानी होईल. आपल्या आयुष्यात आपणच हीरो असतो आणि आयुष्य आपल्याला खूप संधी देत असते. या संधीचे सोने करून आपण सोन्यासारखे चमकू शकतो. आपण नामस्मरण आणि भक्ति यांची जोड देऊन आपले आयुष्य सुखी करून घेतले पाहिजे. भक्ति ही मनापासून असेल तर प्रचिती ही येतेच ! तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वप्निल जोशीला स्वामी समर्थांबद्दल आलेला जो काही अनुभव किंवा प्रचिती आहे याबद्दलची माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.