हे चार विषारी साप चावल्यानंतर ही माहिती तुम्हांला असणे अत्यंत गरजेचं आहे, या चार विषारी सापांची माहिती ; चावल्यावर प्रथम उपचार काय करावे? महत्वपूर्ण माहीती ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या भारतात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस व फुरसे. घोणस सापाच्या दंशामुळे भारतात सर्वाधिक लोक मरतात, सर्पदंशावर योग्य उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. सर्पदंशाच्या वेळी काही गोष्टींची योग्य वेळी काळजी घेतल्यास कोणत्याही व्यक्तीचा जीव वाचू शकतो. तर मित्रांनो आज आपण नाग, मण्यार, घोणस व फुरसे या चार प्रकारच्या सापांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हे साप चावल्यानंतर आपण त्याच्यावर कोणकोणते घरगुती उपचार करू शकतो. याबद्दलही आज आपण घेणार आहोत.

तर मित्रांनो नाग साप आणि मण्यार साप या दोन्ही सापांमध्ये एकाच प्रकारचे विष असते त्याला निरोटॉक्सिक असं म्हटलं जातं. त्याचबरोबर घोणस व फुरसे या दोन सापांच्या प्रजातीमध्ये हिमोटॉक्सिक या प्रकारचे विष आढळते. तर मित्रांनो अशा पद्धतीने या दोन्ही प्रकारच्या सापांवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रथम उपचार आपल्याला घरामध्ये करता येतात.

तर मित्रांनो अशा वेळी जर तुम्हाला नाग साप किंवा मण्यार साप चावला तर यावर आपल्याला वेगळ्या प्रकारचा प्रथमोपचार करायचा आहे आणि त्याचबरोबर घोणस व फुरसे या प्रकारच्या सापांवर वेगळ्या पद्धतीचा प्रथमोपचार आपण आपल्या घरामध्ये करू शकतो.

तर मित्रांनो ज्यावेळी आपल्याला नाग साप चावतो किंवा मण्यार साप चावतो अशावेळी यांचे जे वीस असते त्याला निरोपिक्सिक असे म्हटले जाते आणि हे विष आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या शिरांमधून आपल्या हृदयाकडे आणि मेंदूकडे जात असते.

म्हणूनच मित्रांनो अशावेळी आपण बँडेज पट्टी जी असते ती आपल्या शरीरावर बांधणे योग्य ठरते. कारण मित्रांनो ज्यावेळी आपल्याला पायाला घोट्याजवळ या पद्धतीचा चावतो त्यावेळी आपण आपल्या घोट्यापासून पेंड्री पर्यंत घट्ट बँडेज पट्टी बांधायची आहे. यामुळे आपल्या शिरामधून जो रक्त प्रवाह आपल्या मेंदूकडे किंवा हृदया कडे होणार आहे तो हळू होईल किंवा तो काही अंशी कमी होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ही पट्टी बांधण्यापूर्वी आपल्याला ती जखम स्वच्छ पाण्याने व डेटॉलने धुवून घ्यायचे आहे.

मित्रांनो जेव्हा आपल्याला घोणस किंवा फुरसे हे दोन सापांपैकी एक साप चावतो त्यावेळी यामध्ये घटक असतो आणि हे विष अत्यंत घातक असतं आणि यामुळे अनेकदा माणसाला आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो घोणस च्या सर्पदंशामुळे अनेक जण घाबरतात हे तुम्ही पाहिले असेल.

पण अशा परिस्थितीत तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. शांत झाल्यावर सर्वप्रथम तुमच्या कुटुंबीयांना कळवा. सापाच्या चावलेल्या भागात सूज येताच प्रथम अंगठी किंवा घड्याळ यांसारख्या वस्तू काढून टाका. त्या व्यक्तीला लवकरात लवकर सरकारी किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये घेऊन जाणेच योग्य ठरते. कारण घोणस चे विष अत्यंत घातक असते.

म्हणूनच मित्रांनो ज्यावेळी घोणस हा साप आपल्याला चावतो तेव्हा त्याचा दौश आपल्याला होतो. तेव्हा त्याचे विष हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता खूप दाट असते. म्हणूनच अशावेळी आपण कोणतेही उपाययोजना घरामध्ये न करता त्या रुग्णाला तातडीने दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याची योग्य ठरते.

त्यानंतर डॉक्टर त्याच्यावर पुढील ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीने सुरू करतील. तर मित्रांनो अशा या चार सापांविषयी आज आपण माहिती जाणून घेतली आणि त्यांचा दौश झाल्यानंतर काय प्रथमोपचार करावा हेही आपण आज आपण जाणून घेतलेले आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *