12 वर्ष भाडेच्या जागेत काढली पण 11 गुरुवार अनुष्टान केल आणि दुसऱ्या गुरुवारीच 40 लाखाची जागा खरेदी केली रुपाली मोहिते ताईंना आलेला स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी दूर व्हाव्यात, प्रत्येक संकटातून आपण बाहेर पडावे तसेच आपल्या कुटुंबीयांचे रक्षण व्हावे यासाठी आपण मनोमन प्रार्थना करीत असतो. मित्रांनो स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची प्रार्थना कायमच ऐकतात. त्यांनी केलेल्या मनोभावे भक्तीला ते कायमच प्रतिसाद देत असतात. कायमच त्यांची अडचणीतून सुटका तसेच मार्ग दाखवीत असतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायमच सांगत असतात.

मित्रांनो बरेच जण हे स्वामींच्या केंद्रांमध्ये, मठात जाऊन स्वामींची सेवा अगदी मनोभावे करीत असतात. तर मित्रांनो बऱ्याच जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या अडचणीतून अनेकांना स्वामींनी बाहेर काढलेले आहे. तर मित्रांनो असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच या ताईंना जो अनुभव आलेला आहे हा त्यांच्याच भाषेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात त्या ताईंचा अनुभव त्यांच्याच भाषेत.

नमस्कार मित्रांनो, मी रुपाली मोहिते. मी उज्जैन येथून आहे खरंतर माझं गाव हे नगर आहे परंतु माझे सासरे हे खूप आधीपासूनच फॉरेस्ट खात्यात असल्याने ते उज्जैन येथेच येथेच असायचे. त्यामुळे आम्ही सर्वच जण तिकडे गेलो आणि तिथेच स्थायिक झालो. आमच्या घरी मिस्टर, माझी दोन मुले, सासरे तसेच एक लहान दीर असा आमचा छोटासा परंतु सर्वजण एका मताने राहणारा परिवार होता.

आमच्या घरामध्ये कधीही भांडणे झाली नाहीत. सर्वजण एकमेकांच्या मताने सर्व निर्णय घेत होते. माझे मिस्टर आणि दीर हे जॉब करत होते आणि सासरे भरपूर वर्षे नोकरी करून ते रिटायर झाले. आम्ही ज्या घरामध्ये राहतो ते घर आमचं भाड्याने होतं. बारा वर्षे आम्ही भाड्याच्या घरात राहिलो होतो. परंतु आम्हाला स्वतःचं घर घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही इतरत्र जागा शोधत होतो.

परंतु आम्हाला हवे तसे घर मिळत नव्हते. उज्जैन मध्ये घर विकत घेण्यासाठी खूप जास्त पैसे लागणार होते. परंतु आम्हाला घर हे घ्यावच लागणार होतं. कारण दोन मुले,मिस्टर, सासरे, दीर यामुळे आम्हाला स्वतःचं घर किंवा जागा तरी घ्यायचीच होती. परंतु आम्ही जागा शोधत होतो परंतु हवी तशी जागा ही आम्हाला मिळतच नव्हती.

तसेच आम्ही फ्लॅट देखील काही ठिकाणी बघितले. परंतु तिथे पाण्याचा किंवा काही ना काही अडचणीमुळे आम्हाला फ्लॅट देखील म्हणावा तसा मिळत नव्हता. आमच्या घरातील सर्वच जण हे स्वामींचे सेवेकरी होते. परंतु कोणत्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आम्ही स्वामींची सेवा कधीच केली नाही. आम्ही स्वामींचे सारांमृत वाचायचं तसेच जपमाळ देखील करत होतो.परंतु स्वामींची विशेष अशी सेवा कधी आमच्या हातून झाली नाही.

मग हे सर्व अडचणी बघून मीच मनोमन ठरवले आणि स्वामींना साकडे घातले की, मला आम्हाला हवी तशी जागा मिळू दे. मी अकरा गुरुवारचे व्रत करीन आणि त्या दिवशी गुरुवारच होता आणि त्या गुरुवारी मी असा संकल्प केला आणि अकरा गुरुवारच्या व्रतास प्रारंभ देखील केला. मित्रांनो पहिल्याच गुरुवारी मला स्वामींची प्रचिती आली. ज्या दिवशी पहिला गुरुवार होता त्याच दिवशी माझ्या देवघरातील दिव्यामध्ये एक फुल तयार झालेले होते आणि संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान आमच्या बाहेर एक गाय आली आणि इतकी वर्ष त्या रूममध्ये म्हणजेच भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते तिथे मी कधीच एकदाही गाय पाहिली नाही.

परंतु त्या दिवशी गायीचे दर्शन मला झाले. म्हणून मी दूध आणि पोळी त्या गाईला खाऊ घातली. तसेच दुसऱ्याच गुरुवारी मिस्टरानी संध्याकाळी येऊन मला सांगितलं की आपणाला हवी तशी जागा मिळालेली आहे. त्याची कागदपत्रे ही व्यवस्थित आहेत आणि भविष्यात या जागेचा आपल्याला फायदा देखील होईल आणि या जागेची मी डील करून आलेलो आहे आणि चेक देखील मी त्यांना दिलेला आहे.

हे ऐकून एकदम मला आश्चर्यच वाटले. कारण दुसऱ्याच गुरुवारी स्वामींनी मला प्रचिती दिली होती. नंतर आम्ही त्या जागेवर आमचे स्वतःचे घर बांधले आणि आमचे जे काही घराच्या बांधकामाचा मुहूर्त होता तो देखील गुरूवारच्या दिवशीच आला होता. तसेच आम्ही त्या घरांमध्ये गृहप्रवेश देखील गुरुवारीच केला. यामागे स्वामींचीच अशी इच्छा असेल.

तर असे हे अकरा गुरुवारचे व्रत केल्यानंतर पहिल्याच गुरुवारपासून स्वामींनी आपला चमत्कार खरंच दाखवला. स्वामींची कृपा ही खूपच अपार आहे. स्वामी हे आपल्या भक्ताला कधीच दुखवत नाहीत. ते आपल्या भक्ताला अडचणीतून मार्ग नक्कीच दाखवतात आणि याची प्रचिती मला आली.

आता आम्ही स्वतःच्या घरामध्ये अगदी गुण्यागोविंदाने सर्वजण एकत्र राहत आहोत. म्हणजेच शून्यातून 40 लाखांच्या जागेपर्यंतचा हा व्यवहार सोपा नव्हता. परंतु स्वामींनी अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवली.

मित्रांनो असा होता या ताईंचा अनुभव या अनुभवातून तुम्हाला देखील प्रचिती आली असेल की, आपण देखील जर स्वामींची मनोभावे आणि श्रद्धेने जर सेवा केली अगदी निस्वार्थ भावनेने जर सेवा केली तर स्वामी नक्कीच आपल्यावर कृपा करतात. म्हणजेच आपल्या जीवनामधील जे काही अशक्य गोष्टी आहेत त्या गोष्टी स्वामी महाराज शक्य नक्कीच करून दाखवतील. त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील स्वामी समर्थांवर अगदी मनोभावे, श्रद्धेने, विश्वासाने स्वामींची सेवा करीत रहा. स्वामी आपणाला नक्कीच शुभफळ देतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *