देशभरात प्रचंड चर्चा होत आहे या योजनेची… महिलांना मिळणार १५ हजार रुपये पोस्ट ऑफिसची नवीन योजना…!

Uncategorized

मित्रांनो, सरकार पोस्ट मार्फत अनेक योजना राबवित आहे. ज्याचा लाभ सर्वसामान्य माणसांना तसेच इतर नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. महिलांसाठी तर अनेक योजना निघाल्या आहेत त्यातील एक अशी योजना आहे की, ज्याच्या सहाय्याने महिलांना पंधरा हजार रुपये दिले जात आहेत. ही योजना कोणती? या योजनेचा अर्ज कशा प्रकारे करावा? योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती व या योजनेची पात्रता कोणती? त्यांची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

महिलांकडे पॅन कार्ड असेल तर, या योजना अंतर्गत तुम्ही पॅन कार्ड द्वारे पंधरा हजार रुपये मिळवू शकता. या योजनेची अंमलबजावणी भारत सरकारने एप्रिल 2023 मध्ये केलेली आहे. या योजनेची सुरुवात देखील दोन-तीन महिन्यापूर्वीच झालेले आहे. परंतु याचा इतका विस्तार न झाल्यामुळे त्याची माहिती जास्त महिलांना नाही. देशातील महिलांचे सबलीकरण व्हावे या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीता रमण यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पनेत या योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी देखील केली आहे.

 

तर या अंतर्गत एका महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी त्या महिलेचे पोस्टात खाते असणे गरजेचे आहे आणि त्या खात्यामध्ये त्यांना ही रक्कम मिळणार आहे. या योजनेचे नाव आहे ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना’. या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील घेतलेला आहे. ही योजना एक छोटी बचत योजना आहे. या अंतर्गत महिला पोस्टमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

या बचतीवर चांगले व्याज देखील मिळवू शकता. चांगले नाहीत तर सर्वाधिक व्याज या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाते. ही योजना 2025 पर्यंतच अस्तित्वात आहे. या योजने अंतर्गत जी बचत केली जाते तिची मर्यादा ही दोन लाख रुपये पर्यंत आहे. यावर मिळणारे व्याजदर हे 7.5% इतके आहे. म्हणजेच दोन लाख रुपये जर आपण बचत खातावर ठेवले तर त्याचे व्याजदर हे आपल्याला 15,427 रुपये मिळतात.

 

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या बचतीला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. ही बचत सुरक्षित स्वरूपाचे असते. याचा कालावधी हा दोन वर्ष इतका आहे. या योजनेत आपण मुदतीपूर्वी देखील पैसे काढू शकतो. इतर योजनांपेक्षा जास्त लवकर या योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो. या योजनेअंतर्गत जर आपण गुंतवणूक केली तर, महिलांना आर्थिक सक्षम मिळते. पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची महिला यामध्ये सहभागी होऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी. कागदपत्रांची आवश्यकता या योजनांचा अर्ज करण्यासाठी आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेली महिला यामध्ये गुंतवणूक करू शकते व या योजनेचा लाभ घेऊ शकते.

 

अशाप्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता. पोस्ट खात्यामध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *